Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील सातारा जिल्ह्यातील कराड नगरपरिषदेच्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेबाबतची अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील अधिनियम, 2013, कलम 19 (1) भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेश. (4) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (5) कार्यकारी दंडाधिकारी, तथा सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (6) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्हा ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खाली ड्रोन कॅमेराद्वारे चित्रिकरण करण्यास प्रतिबंध आदेश. (7) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) व (3) बाबतचा आदेश. (8) उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा उपविभाग, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, गडहिंग्लज विभाग, कोल्हापूर, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (9) जिल्हादंडाधिकारी, सांगली तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याचे अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश. (10) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश.
Published 27 August 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.