महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -- मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक ३४] सोमवार, सप्टेंबर ७, २०२० / भाद्र १६, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ४१
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
राजशिष्टाचार शाखा, ३रा मजला, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ७ सप्टेंबर २०२०
अधिसूचना
| क्रमांक डीआयपी. २०२०/प्र.क्र. ९३/३०.—महाराष्ट्र राज्याचे माजी मु°यमंत्री डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील-निलंगेकर यांचे बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी पुणे येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य म ंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करुन श्रद्धांजली अर्पण के ली. महाराष्ट्र राज्याचे माजी मु°यमंत्री डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील-निलंगेकर यांचे बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी पुणे येथे निधन झाले. डॉ. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने देशाच्या स्वातंĂय संग्रामासह, हैद्राबाद मुक्तीसंग्रामात योगदान देणारे, कणखर, राज्याच्या विकासाची तळमळ असणारे दूरदर्शी, दोन पिǺांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व राज्याने गमावले आहे. डॉ. पाटील यांचा जन्म दिनांक ९ फे ब्रुवारी १९३१ रोजी निलंगा येथे झाला. ते उच्चविद्या विभूषित होते. त्यांनी एम.ए. राज्यशाǥ आणि विधि शाखेची (एल.एल.बी.) पीएच.डी. संपादन के ली होती. सेवा दल संघटना, आर्य सभा, महाराष्ट्र परिषद यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंĂय संग्रामातही सहभाग घेतला होता. हैद्राबाद मुक्ती स ंग्रामातही ते सक्रीय होते. त्यांनी दिनांक ३ जून १९८५ ते दिनांक ७ मार्च १९८६ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे मु°यमंत्रीपद भ ुषविले होते. विधिमंडळात ते १९६२ ते ६७, १९६७ ते ७२, १९७२ ते ७८, १९७८ ते ८०,१९८० ते ८५, १९८५ ते ८६, १९८७ ते ९०, १९९० ते ९५, १९९९ ते २००४ आणि २००९ ते २०१४ असे दहा वेळा ते विधानसभा सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते. डॉ. पाटील यांनी महसूल व पुनर्वसन व संसदीय कायदा राज्यमंत्री आणि त्यापुढे जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य व कु टु ंब कल्याण मंत्री, संसदीय कार्य, कायदे व न्याÈय आणि सहकार, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य उद्योग, तंत्र शिक्षण आणि प्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, क्षेत्र विकास प्राधिकरण, पुनर्वसन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम के ले आहे. | ||
| निलंगा येथे महाराष्ट्र शिक्षण समितीची स्थापना करून परिसरात विविध शाखांचे शिक्षण देणाऱ्या २६ श ैक्षणिक शाखांची उभारणी के ली आहे. जलसिंचनात त्यांनी राज्यातील अनेक मोǸा व लघु प्रकल्पांची निर्मितीत योगदान दिले आहे. किल्लारी सहकारी साखर कारखाना (अंबुलगा बु.), जवाहर सहकारी सुतगिरणी (लातूर) यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही संस्थांचे जाळे निर्माण के ले आहे. मु°यमंत्री पदाच्या कालावधीत त्यांनी मराठवाडा, कोकण आणि विदर्भ यांच्यासाठी विकास कार्यक्रम राबविणे सुरू के ले होते. रोजगार हमीवरील मजुरांना मजुरी सोबतच दररोज अर्धा किलो ज्वारी देण्याची योजनाही त्यांनी राबविली. लोकन्यायालयांची स्थापना, प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना, तालुक्यांच्या ठिकाणी औद्योगिक वसाहतींची निर्मिती यामध्ये त्यांचा प ुढाकार होता. लातूर आणि जालना जिल्ह्यांची निर्मिती, औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापना यातही त्यांचे योगदान होते. मु ंबई शहराच्या समस्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजना आखण्यात ते पुढे होते. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक पातळीवरही काम के ले होते. माजी मु°यमंत्री डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील-निलंगेकर यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दु:ख व्यक्त करीत आहे आणि त्यांच्या कु टु ंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची ताकद कु टु ंबीयांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने व्यक्त के लेल्या भावना डॉ.पाटील यांच्या कु टु ंबीयांना कळविण्यात याव्यात. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, संजय कु मार, शासनाचे मु°य सचिव. | ||
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,