महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -- मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक ३६] बुधवार, सप्टेंबर ९, २०२० / भाद्र १८, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ४४
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
राजशिष्टाचार शाखा, ३रा मजला, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ९ सप्टेंबर २०२०
अधिसूचना
| क्रमांक डीआयपी. २०२०/प्र.क्र. ९३/३०.—महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार श्री. अनिल रामकिसन राठोड यांचे बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी अहमदनगर येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण के ली. माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार श्री. अनिल रामकिसन राठोड यांचे बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी अहमदनगर येथे निधन झाले. माजी आमदार राठोड यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने लढवÈया आणि सर्व सामान्यांशी नाळ जोडलेला उमदा नेता राज्याने गमावला आहे. श्री. राठोड यांचा जन्म दिनांक १२ मार्च १९५० रोजी सर्व सामान्य अशा राजपूत कु टु ंबात झाला. त्यांचे बी. कॉम, एल. एल. बी. पयȊत शिक्षण झाले होते. त्यांनी तरुण वयातच सामाजिक कार्याला प्रारंभ के ला. सर्व सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते हिरीरीने पुढे असत. त्यांनी विधिमंडळात १९९० ते ९५, १९९५ ते ९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९ आणि २००९ ते २०१४ असे पाच वेळा विधानसभा सदस्य म्हणून अहमदनगर शहर मतदार- स ंघातून निर्वाचित झाले होते. त्यांनी १९९५ ते ९७ या दरम्यान अƐ व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून काम के ले होते. श्री. राठोड यांनी मातोश्री ट्रस्ट आणि विविध संस्था, संघटना यांच्या माध्यमातून अनेकविध सामाजिक कार्यातही योगदान दिले होते. शिवसेना उपनेते, जिल्हा प्रमुख आणि अहमदनगर शहर प्रमुख अशा संघटनात्मक पातळीवरही त्यांनी काम के ले होते. | ||
| श्री. अनिल रामकिसन राठोड यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दु:ख व्यक्त करीत आहे आणि त्यांच्या क ु टु ंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची ताकद कु टु ंबीयांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने व्यक्त के लेल्या भावना श्री. राठोड यांच्या कु टु ंबीयांना कळविण्यात याव्यात. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, संजय कु मार, शासनाचे मु°य सचिव. | ||