RNI No. MAHBIL / 2009/ 31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
गुरुवार , सप्टेंबर १० , २०२० / भाद्र १९ , शके १ ९ ४२
वर्ष ६, अंक ४९]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक आरोग्य विभाग
गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार , १० वा मजला मंत्रालय, मुंबई ४०० ००१ , दिनांक १० सप्टेंबर २०२०.
अधिसूचनेचा मसुदा
क्रमांक राकायो . २०१५ /प्र.क्र. १५० /राकावि-२. कर्मचारी राज्य विमा अधिनियम , १ ९ ४८ ( १९ ४८ चा ३४ ) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ( १ ) च्या पोट- कलम ( ५ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि आस्थापनांमध्ये कामावर ठेवलेल्या व्यक्तींच्या संख्येच्या संदर्भात, याबाबतीत काढलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांचे अंशतः अधिक्रमण करून , कर्मचारी राज्य विमा महामंडळाशी विचारविनिमय करून आणि केंद्र सरकारची मान्यता घेऊन , कलम १ च्या उक्त पोट- कलम ( ५ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे एक महिन्याची नोटीस देऊन, उक्त अधिनियमाच्या कलम (१ ) च्या पोट-कलम ( ३ ) अन्वये, ज्या क्षेत्रांमध्ये उक्त अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यात आल्या आहेत त्या क्षेत्रांमध्ये स्थित आहेत अशा आणि जेथे दहा किंवा त्याहून अधिक व्यक्ती कामावर ठेवलेल्या असतील , किंवा मागील बारा महिन्यांच्या काळात कोणत्याही दिवशी कामावर ठेवलेल्या होत्या अशा , यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( २ ) मध्ये नमूद केलेल्या आस्थापनांच्या वर्गांना उक्त अधिनियमाच्या सर्व तरतुदी ज्या दिनांकास लागू करण्यात येतील तो दिनांक म्हणून १ ऑक्टोबर २०२० हा दिनांक याद्वारे नियत करीत आहे.
अनुसूची
अनुक्रमांक (१)
आस्थापनांचे वर्ग
(२)
१
दुकाने
२
हॉटेले
३
उपाहारगृहे
४
मार्ग मोटार परिवहन आस्थापना
५
पुनर्विलोकन नाट्यगृहांसह सिनेमा
६
श्रमिक पत्रकार व अन्य वृत्तपत्र कर्मचारी ( सेवाशर्ती) आणि संकीर्ण उपबंध अधिनियम ( १ ९ ५५ चा ४५ ) याच्या कलम २ (घ) मध्ये व्याख्या केलेल्या वृत्तपत्र आस्थापना.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
र. र . गढरी, शासनाचे उप सचिव .
(१)
भाग चार-अ- ८०-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, सप्टेंबर १० , २०२० / भाद्र १ ९ , शके १ ९४२
PUBLIC HEALTH DEPARTMENT
Gokuldas Tejpal Hospital Complex , 10th Floor , Mantralaya Mumbai 400 001 , dated the 10th September 2020 .
DRAFT NOTIFICATION
No. ESIS 2015 /C.R. 150/ RAKAVI - 2.- In exercise of the powers conferred by sub - section (5) of section 1 of the Employees ' State Insurance Act, 1948 ( 34 of 1948 ) , in its application to the State of Maharashtra and in partial supersession of all earlier notifications issued in this behalf with respect to the number of persons employed in the establishments , the Government of Maharashtra , in consultation with Employees ' State Insurance Corporation and with the approval of the Central Government , after having given one month notice as required by said sub - section (5) of section 1 , hereby appoints the date 1st October 2020 , to be the date on which all the provisions of the said Act shall extend to the classes of establishments mentioned in column ( 2 ) of the Schedule appended hereto wherein ten or more persons are employed , or were employed on any day of the preceding twelve months situated in the areas in which the provisions of said Act have been brought into force under sub - section (3) of section 1 of the said Act .
Schedule
Sr. No. (1)
Classes of Establishments
(2)
1
Shops
2
Hotels
3
Restaurants
4
Road Motor Transport Establishments
5
Cinema including preview theatres
6
Newspaper establishments as defined in section 2 ( d) of the Working Journalists (Condition of Service ) and Miscellaneous Provisions Act ( 45 of 1995 ) .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
R. R. GADHARI , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .