Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असाधारण क्र. ३६ दिनांक १४ सप्टेंबर २०२० सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९

Published 14 September 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-09-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १४, २०२०/भाद्र २३, शके १९४२ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक २४] सोमवार, सप्टेंबर १४, २०२०/भाद्र २३, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९.----महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ यात

पृष्ठे १-२ आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम . . . . . .

दिनांक १२ सप्टेंबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ यात आणखी सुधारणा

करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

१९६६ चा महा. ३७. आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती, आणि, म्हणून, त्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित केला होता ; २०२० चा महा. अध्या. १५. भाग चार---३६---१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १४, २०२०/भाद्र २३, शके १९४२ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) अधिनियम, २०२० संक्षिप्त नाव व प्रारंभ.

असे म्हणावे.

(२) तो, दिनांक २३ मार्च २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

१९६६ चा महा. ३७.

सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम २६ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम २६ मधील, पोट-कलम (१) मध्ये, तिसया परंतुकामधील, खंड (दोन) मध्ये, " महानगरपालिकांच्या बाबतीत, " या मजकुराऐवजी, " महानगरपालिकेच्या किंवा, यथास्थिति, नियोजन प्राधिकरणाच्या बाबतीत, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम १४८-अ ची सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम १४८-अ मधील, " कोणत्याही निवडणुकीच्या बाबतीत, भारताच्या निवडणूक आयोगाकडून किंवा राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही आचारसंहिता लागू झाल्यामुळे " या मजकुरानंतर, " किंवा देशामध्ये किंवा राज्यामध्ये उद्भवणाया कोणत्याही महामारीच्या किंवा साथीच्या रोगाच्या फैलावास किंवा आपत्तीजन्य परिस्थितीस प्रतिबंध करण्याकरिता, भारत सरकारने किंवा, यथास्थिति, राज्य शासनाने केलेल्या कोणत्याही मार्गदर्शक तवांच्या किंवा टाळेबंदी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

४. (१) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) अध्यादेश, २०२० हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

२०२० चा महा. अध्या. १५.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १५ याचे निरसन व व्यावृत्ती.

(२) असे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही (काढलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या, मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिती, काढलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 September 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-09-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-09-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.