Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार (असाधारण) क्र. 38, सन 2020 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21, महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, 1970 यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

Published 15 September 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-09-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १५, २०२०/भाद्र २४, शके १९४२ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक २५(२)] मंगळवार, सप्टेंबर १५, २०२०/भाद्र २४, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१.--- महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, १९७० यात आणखी सुधारणा

पृष्ठे १ ते ३ करण्यासाठी अधिनियम. . .

दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, १९७० यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१९७१ चा महा. १५.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम , १९७० यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास , महाराष्ट्र वेश्म मालकी ( सुधारणा ) अधिनियम, २०२० असे म्हणावे .

२. महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, १९७० ( यात यापुढे ज्याचा निर्देश, " मुख्य अधिनियम " असा करण्यात १९७१ चा महा.१५. आला आहे ) याच्या कलम ३ मध्ये,----

सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ३ ची सुधारणा.

(१)

भाग चार ३८-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १५, २०२०/भाद्र २४, शके १९४२ (क) खंड (आय) नंतर , पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :---

" (आय - एक) " सहकार न्यायालय " याचा अर्थ , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० १९६१ चा महा. २४.

अन्वये घटित केलेले सहकार न्यायालय , असा आहे ;"; (ख) खंड (र) नंतर , पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :---

" ( स ) " निबंधक " याचा अर्थ , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० याच्या १९६१ चा महा. २४.

तरतुदींअन्वये सहकारी संस्थांचा निबंधक म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती, असा आहे ;" .

३. मुख्य अधिनियमाच्या कलम १२ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :---

सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ यामध्ये नवीन कलम १२ अ समाविष्ट करणे.

" १२अ. वेश्म मालकांस , वेश्म मालकांच्या संघाच्या विशेष सभेमध्ये बहुमताने संमत केलेल्या ठरावाद्वारे प्रतिज्ञापनाच्या किंवा वेश्म विलेखाच्या तपशिलांमध्ये बदल किंवा सुधारणा करता येईल .".

प्रतिज्ञापनाच्या किंवा वेश्म विलेखाच्या तपशिलांमध्ये सुधारणा करणे.

४. मुख्य अधिनियमाच्या कलम १६ नंतर , पुढील कलमे समाविष्ट करण्यात येतील :----

सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ यामध्ये नवीन कलमे १६अ व १६ब समाविष्ट करणे.

प्राधिकायाकडे तक्रार दाखल करणे.

" १६अ. कोणत्याही व्यथित वेश्म मालकास , वेश्म मालकांच्या संघास , या अधिनियमाच्या तरतुदींचा किंवा त्याखाली केलेल्या नियमांचा कोणताही भंग केल्याबाबत किंवा उल्लंघन केल्याबाबत , कोणत्याही वेश्म मालकाविरुद्ध किंवा एकमेव मालकाविरुद्ध किंवा मालमत्तेच्या सर्व मालकांविरुद्ध , निबंधकाकडे तक्रार दाखल करता येईल. निबंधक , अशी तक्रार, शक्य होईल तेथवर तीस दिवसांच्या आत निकाली काढील :

परंतु असे की , निबंधकास अशी तक्रार तीस दिवसांच्या आत निकालात काढणे शक्य न झाल्यास, निबंधक, त्याबाबतीत या विलंबाची कारणे नमूद करील .

सहकार न्यायालयाकडे अपील.

१६ब. (१) निबंधक, सहकारी संस्था यांच्या कोणत्याही निदेशाने किंवा आदेशाने किंवा निर्णयाने व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, सहकार न्यायालयाकडे (यापुढे या कलमात ज्याचा निर्देश, " अपील प्राधिकरण " असा केला आहे ) अपील दाखल करता येईल.

स्पष्टीकरण.-- या कलमाच्या प्रयोजनार्थ, " व्यक्ती " याचा अर्थ, वेश्म मालक, वेश्म मालकांचा संघ, एकमेव मालक, किंवा मालमत्तेचे सर्व मालक, असा आहे .

(२) पोट-कलम (१) खालील प्रत्येक अपील हे, निबंधकाने दिलेल्या निदेशाची, आदेशाची किंवा निर्णयाची प्रत, व्यथित व्यक्तीस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या कालावधीत, दाखल करता येईल :

परंतु , त्या कालावधीत अपील दाखल न करण्यास पुरेसे कारण होते अशी अपील प्राधिकरणाची खात्री पटली तर, त्यास, साठ दिवसांच्या समाप्तीनंतर कोणतेही अपील, दाखल करून घेता येईल .

(३) अपील प्राधिकरण, पोट-कलम (१) खाली अपील प्राप्त झाल्यावर, पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर, त्यास योग्य वाटतील असे आदेश पारित करील.

(४) अपील प्राधिकरण, त्याने पारित केलेल्या प्रत्येक आदेशाची प्रत, पक्षकारांना व निबंधकाला पाठवील.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १५, २०२०/भाद्र २४, शके १९४२ ३

( ५ ) पोट-कलम (१) अन्वये दाखल केलेल्या अपिलावर, अपील प्राधिकरणाकडून, शक्य तितक्या शीघ्रतेने कार्यवाही करण्यात येईल आणि अपील प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसांच्या आत, अपील अंतिमतः निकालात काढण्यासाठी त्याच्याकडून प्रयत्नांची शिकस्त करण्यात येईल . " .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 September 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-09-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-09-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.