महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ६, अंक २६(२)] बुधवार, सप्टेंबर १६, २०२०/भाद्र २५, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३.--- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम. . . . . . . . . . .
पृष्ठे १-४ दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
भूपेन्द्र मु. गुरव, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;
२०१७ चा महा. ४३. २०२० चा महा.अध्या. ११.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तिवात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक १० जुलै २०२० रोजी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२०, हा प्रख्यापित केला होता ;
(१)
भाग चार ४०-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १६, २०२०/भाद्र २५, शके १९४२ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---
१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०२०, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) कलम १ दिनांक १० जुलै २०२० रोजी अंमलात आले असल्याचे मानण्यात येईल.
(३) अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, उर्वरित कलमे, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियत करील अशा दिनांकास अंमलात येतील.
२०१७ चा महा. ४३.
२. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ (यात यापुढे ज्याचा निर्देश "" मुख्य अधिनियम "" असा करण्यात आला आहे), याच्या कलम २ मधील, खंड (११४) मध्ये, उप-खंड (ग) व (घ) याऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येतील :---
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २ ची सुधारणा.
""(ग) दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव ;
(घ) लडाख;"".
३. मुख्य अधिनियमाच्या कलम १० मधील, पोट-कलम (२) मध्ये,--
(क) खंड (ख) मधील, "" वस्तुंचा "" या मजकुरानंतर "" किंवा सेवांचा "" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १० ची सुधारणा.
(ख) खंड (ग) मधील, "" वस्तुंचा "" या मजकुरानंतर "" किंवा सेवांचा "" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;
(ग) खंड (घ) मधील, "" वस्तुंचा "" या मजकुरानंतर "" किंवा सेवांचा "" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.
४. मुख्य अधिनियमाच्या कलम १६ मधील, पोट-कलम (४) मध्ये, "" अशा नावे पत्राच्या संबंधातील बीजक "" या ऐवजी "" नावे पत्र, "" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १६ ची सुधारणा.
५. मुख्य अधिनियमाच्या कलम २९ मधील, पोट-कलम (१) मध्ये, खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:---
"" (ग) करपात्र व्यक्ती, कलम २२ किंवा कलम २४ या अन्वये यापुढे नोंदणी करण्यास पात्र नसेल सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २९ ची सुधारणा.
अथवा कलम २५ च्या पोट-कलम (३) अन्वये स्वेच्छेने केलेली नोंदणी रद्द करण्याचा इरादा असेल."".
६. मुख्य अधिनियमाच्या कलम ३० मधील, पोट-कलम (१) मध्ये, परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल:---
"" परंतु, असा कालावधी, पुरेसे कारण दर्शविल्यावर, आणि लेखी कारणे नोंदवून,--
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३० ची सुधारणा.
(क) राज्य कर अपर आयुक्ताद्वारे, किंवा यथास्थिति, राज्य कर सहआयुक्ताद्वारे तीस दिवसांपेक्षा अधिक नसेल अशा कालावधीसाठी,
(ख) राज्य कर आयुक्ताद्वारे, खंड (क) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधी पलीकडे, तीस दिवसांपेक्षा अधिक नसेल अशा आणखी कालावधीसाठी,
वाढविता येईल."".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १६, २०२०/भाद्र २५, शके १९४२ ३७. मुख्य अधिनियमाच्या कलम ३१ मधील, पोट-कलम (२) मध्ये, परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल:---
"" परंतु, शासनास, परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे,---
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३१ ची सुधारणा.
(क) ज्यांच्या बाबतीत कर बीजक देण्यात येईल अशा सेवांचे किंवा पुरवठयांचे प्रवर्ग, विहित करण्यात येईल अशा कालावधीत व अशा रीतीने, विर्िनदिष्ट करता येतील;
(ख) ज्यांच्या बाबतीत,---
(एक) पुरवठयाच्या संबंधात दिलेला अन्य कोणताही दस्तऐवज, कर बीजक असल्याचे
मानण्यात येईल; किंवा
(दोन) कर बीजक देता येणार नाही,
अशा सेवांचे प्रवर्ग त्यात नमूद केलेल्या शर्तीस अधीन राहून, विर्िनदिष्ट करता येतील."".
८. मुख्य अधिनियमाच्या कलम ५१ मधील,---
(क) पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल:---
""(३) मूळ स्रोतातून कपात केलेल्या कराचे प्रमाणपत्र, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५१ ची सुधारणा.
व अशा रीतीने देण्यात येईल."";
(ख) पोट-कलम (४) वगळण्यात येईल.
९. मुख्य अधिनियमाच्या कलम १२२ मधील, पोट-कलम (१) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल:---
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १२२ ची सुधारणा.
""(१क) जी कोणतीही व्यक्ती, पोट-कलम (१) चे खंड (एक), (दोन), (सात) किंवा खंड (नऊ) यांखाली समाविष्ट असलेल्या व्यवहाराचा लाभ ठेवून घेते आणि जिच्या सुचनेवरून असा व्यवहार केला जातो ती व्यक्ती, चुकविलेल्या कराच्या किंवा लाभ घेतलेल्या किंवा अग्रेषित केलेल्या निविष्टी कराच्या जमा रकमेइतक्या शास्तीस पात्र असेल."".
१०. मुख्य अधिनियमाच्या कलम १३२ मधील, पोट-कलम (१) मध्ये,--
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १३२ ची सुधारणा.
(एक) ""जी कोणतीही व्यक्ती, पुढीलपैकी कोणतेही अपराध करील,-"" या मजकुराऐवजी ""जी कोणतीही व्यक्ती, पुढीलपैकी कोणतेही अपराध करील, किंवा करण्याची व्यवस्था करील आणि त्यातून उद्भवणारे लाभ ठेवून घेईल,-"" हा मजकूर दाखल करण्यात येईल;
(दोन) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:--
"" (ग) खंड (ख) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या बीजकाचा किंवा देयकाचा वापर करून निविष्टी कराच्या जमा रकमेचा लाभ घेईल किंवा कोणत्याही बीजकाशिवाय किंवा देयकाशिवाय लबाडीने निविष्टी कराच्या जमा रकमेचा लाभ घेईल;"";
(तीन) खंड (ङ) मधील, "" लबाडीने निविष्टी कराच्या जमा रकमेचा लाभ घेईल "" हा मजकूर वगळण्यात येईल.
११. मुख्य अधिनियमाच्या कलम १४० मधील,----
(क) पोट-कलम (१) मध्ये, "" विहित करण्यात येईल "" या मजकुरानंतर, ""अशा मुदतीत व"" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल आणि तो दिनांक १ जुलै २०१७ पासून समाविष्ट करण्यात आला
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १४० ची सुधारणा.
असल्याचे मानण्यात येईल;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १६, २०२०/भाद्र २५, शके १९४२(ख) पोट-कलम (२) मध्ये, "" विहित करण्यात येईल "" या मजकुरानंतर, ""अशा मुदतीत व"" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल आणि तो दिनांक १ जुलै २०१७ पासून समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल;
(ग) पोट-कलम (३) मध्ये, "" पुढील शर्तीच्या अधीन राहून, "" या मजकुराऐवजी, ""पुढील शर्तीच्या अधीन राहून, विहित करण्यात येईल अशा मुदतीत व अशा रीतीने "" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो दिनांक १ जुलै २०१७ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल;
(घ) पोट-कलम (५) मध्ये, "" मूल्यर्वधित कर व प्रवेश कर "" या मजकुरानंतर, "" विहित करण्यात येईल अशा मुदतीत व अशा रीतीने "" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो दिनांक १ जुलै २०१७ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल;
(ङ) पोट-कलम (६) मध्ये, "" पुढे दिलेल्या शर्तीच्या अधीन राहून, नियत दिवशी "" या मजकुराऐवजी, "" पुढे दिलेल्या शर्तीच्या अधीन राहून, विहित करण्यात येईल अशा मुदतीत व अशा रीतीने, नियत दिवशी "" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो दिनांक १ जुलै २०१७ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
१२. मुख्य अधिनियमाच्या कलम १७२ मधील, पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये, "" तीन वषार्ंचा "" या मजकुराऐवजी "" पाच वषार्ंचा "" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १७२ ची सुधारणा.
१३. मुख्य अधिनियमाच्या अनुसूची दोन मधील, परिच्छेद ४ मध्ये, ""-मग त्यांचा मोबदला घेतलेला असो किंवा नसो, "" हा मजकूर, ज्या दोन ठिकाणी आला आहे तेथून तो वगळण्यात येईल आणि तो, दिनांक १ जुलै २०१७ पासून वगळण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या अनुसूची दोनची सुधारणा.
विवक्षित प्रकरणी राज्य करातून पूर्वलक्षी सूट, किंवा त्याची आकारणी किंवा वसुली.
१४. (१) मुख्य अधिनियमाच्या कलम ९ च्या पोट-कलम (१) खालील अधिकारांचा वापर करून, परिषदेच्या शिफारशींवरून, महाराष्ट्र शासनाने काढलेली, शासकीय अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक- एमजीएसटी- १०१७/प्र. क्र. १०४/ कराधान- १, दिनांक २९ जून २०१७ यामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी,---
(एक) दिनांक १ जुलै २०१७ पासून प्रारंभ होणाया आणि दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपणाया कालावधीमध्ये (दोन्ही दिवस धरून), मत्स्य चूर्णाच्या (शीर्ष २३०१ खाली येणाया) पुरवठयाच्या बाबतीत, कोणताही राज्य कर, आकारण्यात किंवा वसूल करण्यात येणार नाही;
(दोन) दिनांक १ जुलै २०१७ पासून प्रारंभ होणाया आणि दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपणाया कालावधीमध्ये (दोन्ही दिवस धरून) कृषी यंत्रसामग्रीचे भाग (शीर्षे ८४३२, ८४३३ व ८४३६ याखाली येणारे) म्हणून वापरलेल्या कप्प्या, चाके व इतर भाग (शीर्ष ८४८३ खाली येणारे) यांच्या पुरवठयाच्या बाबतीत, सहा टक्के दराने राज्य कर, आकारण्यात येईल किंवा वसूल करण्यात येईल. (२) जो कर वसूल करण्यात आलेला आहे परंतु, सर्व भौतिक वेळी, पोट-कलम (१) अंमलात राहिले असते तर, जो अशाप्रकारे वसूल करता आला नसता, अशा सर्व कराचा परतावा देण्यात येणार नाही.
१५. (१) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२० हा, याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२०२० चा महा. अध्या ११.
सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ११ याचे निरसन व व्यावृत्ती. (२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती कार्यवाही किंवा, यथास्थिती, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTOR- ATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.