RNI No. MAHBIL /2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ६ , अंक ५४ ]
गुरुवार, सप्टेंबर २४ , २०२० /आश्विन २ , शके १ ९ ४२ [पृष्ठे ३ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०००३२ .
दिनांक २४ सप्टेंबर २०२० .
अधिसूचना
स्थावर संपदा (विनियमन व विकास ) अधिनियम , २०१६ .
क्रमांक स्थासंअ २०१८/प्र.क्र.१०६ ( भाग -१ )/ दुवपु-२ . स्थावर संपदा (विनियमन व विकास ) अधिनियम , २०१६ याच्या कलम ८४ च्या पोट- कलम ( १ ) व पोट- कलम ( २ ) च्या खंड ( य च ) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे , महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण ( सदस्य , अधिकारी व कर्मचारी ) ( नियुक्ती व सेवाशर्ती ) नियम , २०१७ यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे : -
१. संक्षिप्त नाव व प्रारंभ. - ( १ ) या नियमांस, महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण ( सदस्य, अधिकारी व कर्मचारी ) ( नियुक्ती व सेवाशर्ती ) नियम , २०२० असे म्हणावे.
(२ ) ते, राजपत्रात , त्यांची प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण ( सदस्य , अधिकारी व कर्मचारी ) ( नियुक्ती व सेवाशर्ती) नियम , २०१७ च्या नियम ६ च्या पोट - नियम ( ३ ) मध्ये , पुढीलप्रमाणे मजकूर बदली दाखल करण्यात येईल : -
( ३ ) " रजेची सूचना:
(क) अपील न्यायाधिकरणाचा अध्यक्ष , त्याच्या / तिच्या रजा गृहनिर्माण विभागास कळवील; आणि
(ख ) अपील न्यायाधिकरणाचे सदस्य, त्यांच्या रजा, अपील न्यायाधिकरणाच्या अध्यक्षाला कळवतील . " .
(१)
भाग चार- अ-८६-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, सप्टेंबर २४ , २०२० /आश्विन २ , शके १९ ४२
३. महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण ( सदस्य , अधिकारी व कर्मचारी ) ( नियुक्ती व सेवाशर्ती ) नियम , २०१७ च्या नियम १६ ची पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येईल : -
" १६. अवशिष्ट तरतुदी.- अध्यक्षाच्या किंवा सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती यांच्याशी संबंधित असणारी बाब , जो न्यायाधिकरणाच्या स्तरावर सलोख्याने सोडवला जाऊ शकलेला नाही असा , अध्यक्ष आणि/किंवा सदस्य यांच्यामधील प्रशासकीय बाबींवरील कोणताही विवाद किंवा जिच्या बाबतीत या नियमांमध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली नाही अशी , न्यायाधिकरणास योग्य वाटेल अशी अन्य कोणतीही बाब , न्यायाधिकरणाद्वारे , निर्णयार्थ राज्य शासनाकडे निर्देशित करण्यात येतील आणि त्यांवरील राज्य शासनाचा निर्णय , अध्यक्षावर , किंवा यथास्थिति , सदस्यांवर बंधनकारक असेल. " .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. कों. धनावडे , शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, सप्टेंबर २४ , २०२०/ आश्विन २ , शके १ ९ ४२
HOUSING DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 ,
dated the 24th September 2020
NOTIFICATION
REAL ESTATE ( REGULATION AND DEVELOPMENT) ACT , 2016 .
No. RERA 2018/C.R.106 ( Part - 1 )/RR-2.-In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) and clause ( zf) of sub - section ( 2) of section 84 of the Real Estate ( Regulation and Development) Act, 2016 ( 16 of2016) , and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra , hereby makes the following rules to amend the Maharashtra Real Estate Appellate Tribunal ( Members , Officers and Employees ) (Appointment and Service Conditions) Rules , 2017 namely :-
1. ( 1 ) Short title and commencement.-( 1 ) The Rules may be called the Maharashtra Real Estate Appellate Tribunal ( Members , Officers and Employees ) ( Appointment and Service Conditions ) Rules, 2020.
(2) They shall come into force on the date of their publication in the Official Gazette.
2. In Sub- rule ( 3 ) of Rule 6 of the Maharashtra Real Estate Appellate Tribunal ( Members , Officers and Employees) ( Appointment and Service Conditions ) Rules , 2017 shall be replaced as follows:
" Leave Intimation :
(a) The Chairperson of the Appellate Tribunal , shall intimate his / her leaves to the Housing Department ; and
(b) TheMembers of the Appellate Tribunal , shall intimate their leaves to Chairperson of the Appellate Tribunal . "
3. The Rule 16 of Maharashtra Real Estate Appellate Tribunal ( Members , Officers and Employees) (Appointment and Service Conditions ) Rules , 2017 shall be amended as follows : -
" 16. Residuary provisions . Matter relating to the terms and conditions of service of the Chairperson or Members , any dispute between the Chairperson and / or members on administrative matters which could not be resolved amicably at Tribunal level or any other matter which the Tribunal level or any other matter which the Tribunal may think it fit , with respect to which no express provision has been made in these Rules , shall be referred by the Appellate Tribunal to the State Government for decision and the decision of State Government theron shall be binding on the Chairperson or Members , as the case may be . " .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
R. K. DHANAWADE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .