Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-II (Ex.53) (Dated 8th October 2020) (ठाणे महानगरपालिका,ठाणे ) (शहर विकास विभाग) जाहिर सूचना (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये) (क्रमांक ठामपा/मुख्या.1/शविवि-29/वियोअंक/424

Published 08 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ८, २०२०/आश्विन १६, शके १९४२ १

RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ६, अंक ३८] गुरूवार, ऑक्टोबर ८, २०२०/आश्विन १६, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ५३

प्राधिकृत प्रकाशन

ठाणे महानगरपालिका, ठाणे

शहर विकास विभाग

जाहिर सूचना

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये) क्रमांक ठामपा/मुख्या.१/शविवि-२९/वियोअंक/४२४

ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारीत विकास योजना शासन निर्णय क्रमांक टिपीएस/१२९७/१३१९/सी.आर.१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर, १९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारीत विकास योजनेतील वगळलेल्या क्षेत्राची (Excluded portion) विकास योजना शासन निर्णय क्रमांक टिपीएस/१२०१/२७४/सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल, २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे, २००३ पासून अंमलात आली आहे. (यापूढे ""उक्त मंजूर विकास योजना"" असे संबोधिले आहे.) आणि ज्याअर्थी, ठाणे शहराच्या मंजूर सुधारित विकास आराखडयातील सेक्टर क्र. ६ मध्ये मौजे वडवली येथे गावठाणाकरिता वाईड प्लॅन नं. बी ६ दर्शविला असून, उर्वरित भाग नियमित मंजूर विकास आराखडयात आहे. तथापि २०.०० मी. रुंद रस्ता जो ओवळा येथून वडवली गावात जातो त्याच्या आखणीत नियमित विकास आराखडा व वाईड प्लान क्र. बी ६ यामध्ये तफावत आहे. सदर तफावत काढण्याच्या दृष्टीने दोन्ही नकाशांपैकी एका नकाशातील २०.०० मी. रुंद रस्त्याची रेषा कायम ठेवून, दुस-या नकाशात सुधारणा करणे आवश्यक आहे. सदरमुळे नियमित विकास आराखडयातील २०.०० मी. रुंद रस्त्याची रेषा कायम ठेवून वाईड प्लान नं. बी ६ मधील २०.०० मी. रुंद रस्त्याची रेषा सुधारीत करण्याकरिता आणि त्यास अनुसरुन सदर रस्त्यालगत असलेल्या ९.०० मी. रुंद रस्ता व म्युनिसिपल मार्केट आ.क्र. ५ हे आरक्षण यामध्ये सुधारणा प्रस्तावित करण्यात येत आहे. सदर प्रस्तावित बदलामुळे मार्केट आरक्षणाचे विकास योजना पुस्तिकेमध्ये दर्शविल्यानुसार क्षेत्राएवढे क्षेत्र प्राप्त होत आहे. सदर प्रस्तावित २०.०० मी. डि.पी. रस्त्याच्या आखणीमुळे वाईड प्लॅन नं. बी ६ नकाशामध्ये दर्शविलेला २०.०० मी. रस्त्याच्या व ९.०० मी. रस्त्याचा काही भाग मार्केट आरक्षणामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. तसेच सदर आखणी कायम करणेसाठी मार्केट आरक्षणाच्या पश्चिम बाजूकडील ९.०० मी. रस्त्याचे काही क्षेत्र सुद्धा प्रस्तावित २०.०० मी. डि.पी. रुंद रस्त्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, वरीलप्रमाणे प्रस्तावित केलेल्या बदलामुळे मंजूर विकास योजनेतील २०.०० मी. रुंद रस्ता हा वाईड प्लॅन नं. बी ६ मधील ९.०० मी. रस्त्यास योग्य रितीने जोडला जाईल. त्यानुसार मंजूर सुधारीत विकास आराखडयातील सेक्टर क्र. ६ मधील मौजे वडवली येथील २०.०० मी. रुंद रस्त्याची प्रस्तावित आखणी कायम करणे व त्याकरिता वाईड प्लॅन नं. बी ६ मध्ये दर्शविलेले म्युनिसिपल मार्केट आरक्षण क्र. ५

(१)

भाग दोन-----५३--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ८, २०२०/आश्विन १६, शके १९४२ मध्ये तसेच सदर नकाशातील ९.०० मी. व २०.०० मी. रुंद रस्त्यामध्ये होणा-या बदलाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल आवश्यक आहे व अशा फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. महासभा ठराव क्र. २७८, दिनांक २० नोव्हेंबर २०१९ अन्वये मान्यता दिलेली आहे. (यापुढे ""उक्त फेरबदल"" असे संबोधिले आहे).

आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतूदीनुसार ""उक्त मंजुर विकास योजनेत"" ""उक्त फेरबदलाबाबत"" आम जनतेच्या सूचना/हरकती मागविणेसाठी ही जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक, नगररचना, ठाणे महानगरपालिका, ""महापालिका भवन"", सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर व खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना/हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी ही सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे अथवा Email ID - [email protected] वर सादर करावी.

संकेत स्थळ www.thanecity.gov.in

ठाणे, दिनांक ६ ऑक्टोबर २०२०.

श्रीकांत देशमुख, सहायक संचालक, नगररचना, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ८, २०२०/आश्विन १६, शके १९४२ ३

THANE MUNICIPAL CORPORATION, THANE

TOWN PLANNING DEPARTMENT

Notice

(U/s. 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)

No.TMC Hq.1/TDD-29/DPIC/424

Whereas, the Revised Development Plan of the city of Thane has been Sanctioned by Government vide Notification No.TPS/1297/1319/CR-148/97/UD-12, Dated 4th October,1999 and came into force from 22nd November, 1999. Also the Development Plan for Excluded portion (EP) from Revised Development plan was sanctioned vide Government's Notification No. TPS/1201/274/CR-28/2009/UD-12, Dated 3rd April, 2003 and came into force from 14th May, 2003 (Hereinafter referred to as "The said Sanctioned Development plan").

And whereas, the Gaothan area for Village Vadavali in Sector 6 is shown by Wide Plan No.B6 and remaining part is shown in Sanctioned Development Plan for Thane City. The alignment of 20 mt. wide D.P.Road, passing from Owale to Vadavali village, as shown in Sanctioned Development Plan and in Wide Plan No.B6 differ from each other and the road alignment has to be finalised as shown in the one of the above two plans and thereby revision of other plan becomes necessary. Due to this the alignment of 20 mt. wide road shown in regular Sanctioned Development Plan is proposed to be finalised and 20 mt. wide road alignment shown in Wide plan No.B6 has to be revised. Hence, modification for 9.00 mt. wide road and Municipal Market Reservation No.5 shown along this road is proposed. Due to the proposed changes the total area available under the market reservation will be as in the report book of the Development Plan. Due to the proposed 20 mt. wide DP Road, the area under 20.00 mt. wide road and 9.00 mt. wide road shown in wide Plan No.B6 has to be included in the Market Reservation and some portion of the 9 mt. wide road on west side of Market Reservation has to be included in proposed alignment of 20 mt. Wide DP Road.

And whereas, due to the above proposed modification, the 20 mt. wide Development Plan road will be connected to 9 mt. wide road shown in wide plan No.B6, hence the alignment of 20 mt. wide DP Road shown in Sanctioned Development Plan of Sector No.6 is proposed for finalisation and due to this the affected part of 9 mt. wide DP Road and 20 mt. wide DP road and Municipal Market Reservation No.5 shown in wide plan No.B6 is proposed for modification as per the Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Hon. General Body of Thane Municipal Corporation has accorded sanctioned vide it's resolution no.278, Dated 20th November 2019 (hereinafter called as 'said Modification') And therefore, this notice is published for inviting suggestions/objections from the public to carry out "The said Modification in The said Sanctioned Development Plan" as per the provisions under section 37(1) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966. The Plan showing "The said modification" is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, "Mahapalika Bhavan", Sarsenani General Arunkumar Vaidy Marg, Chandanvadi, Panchpakhadi, Thane and also published on website mentioned below. Any person who wants to submit suggestion may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane or on the Email ID - [email protected]

Web Site : www.thanecity.gov.in

Place : Thane,

SHRIKANT M. DESHMUKH, dated 6th October 2020.

Asst. Director Town Planning,

Thane Municipal Corporation, Thane.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.