Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 18 DATE 09 Oct 2020 जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- नगरपरिषद कुंडलवाडी अंतर्गत अध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवाराचा तपशील.

Published 09 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-09.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ असाधारण |ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. १८] शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२० : आश्विन १७, शके १९४२ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१ जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून

वाचा :-

१. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१.

२. महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक एएमसी ५००७/प्र.क्र.२५/नवि ३२ दिनांक १० जुन २००९.

३. महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग एक -अ अधिसूचना दिनांक २७.०३.२०१७.

४. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील पत्र क्र.

रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.७/का-६ दिनांक ०८.०९.२०२०.

५. अवर सचिव नगर विकास विभाग यांचेकडील पत्र कोरोना -२०२०/ प्र.क्र.७६/निव-१४ दिनांक ०९.०९.२०२०.

६. या कार्यालयाचे पत्र क्र. २०२०/नपाप्र/अपोनि/का-१/टे-७/सिआर- दिनांक १८.०९.२०२०.

७. पिठासीन अधिकारी नगरपरिषद कुंडलवाडी यांचा अहवाल क्र.कुंनपा/ अपोनिवडणूक/निवडणूक/२०२०/निवडणूक/२०२०/१०८५ दिनांक ०१.१०.२०२०.

आदेश

क्र.२०२०/नपाप्र/अपोनि/का-१/टे-७/सिआर दिनांक ०७.१०.२०२०.- ज्याअर्थी नांदेड जिल्ह्यतील कुंडलवाडी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी उक्त वाचा १ च्या अधिनियमातील तरतूदीनुसार व वाचा ४ व ५ मधील निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडील अधिसूचनेमधील निश्चित केलेल्या अध्यक्ष पदाच्या आरक्षाणानूसार, या कार्यालयाचे पत्र वाचा ६ अन्वये नगरपरिषद कुंडलवाडीमध्ये अध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी दिनांक ०१.१०.२०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये, पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी वाचा ७ अन्वये सदर सभेमध्ये अध्यक्षाची निवड झाल्याबाबत, सभेचा कार्यवृत्तांत या कार्यालयास सादर केला आहे.

त्याअर्थी मी, विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड, उक्त वाचा २ अन्वये प्राप्त अधिकारानूसार याद्वारे असे जाहिर करतो की, नंादेड जिल्ह्यतील नगरपरिषद कुंडलवाडीमध्ये अध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी दिनांक ०१.१०.२०२० रोजी आयोजित विशेष सभेत खालील दर्शविल्याप्रमाणे नगरपरिषदेच्या नावासमोरील उमेदवार नगरपरिषदेच्या उर्वरीत कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

अध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवाराचा तपशिल

अ.क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव अध्यक्षपदासाठी आरक्षणाचा प्रवर्ग
१. क डलवाडी ं ु सुरेखा नरेंद्र जिटटावार नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

ठिकाण : नांदेड

डॉ. विपीन इटनकर (भाप्रसे)दिनांक : ०७.१०.२०२० जिल्हाधिकारी, नांदेड औ.भाग १ अ (असा.) १८ १ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-09.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-09.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.