महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ६०] शुक्रवार, ऑक्टोबर १६, २०२०/आश्िवन २४, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक मत्स्यआ-२०१९/प्र.क्र. ६०/पदुम-१२.-----भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ खालील परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि यासंबंधीत अस्तित्वात असलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश अधिक्रमित करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील मत्स्यव्यवसाय आयुक्तालयातील महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय सेवेतील प्रादेशिक उप आयुक्त मत्स्यव्यवसाय आणि उप आयुक्त (अर्थ व नियोजन), गट-अ (तांत्रिक) (राजपत्रित), पदाच्या सेवाभरतीचे विनियम करणारे पुढील नियम करीत आहेत:----
१. या नियमांना महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय सेवेतील प्रादेशिक उप आयुक्त मत्स्यव्यवसाय आणि उप आयुक्त (अर्थ व नियोजन), गट-अ (तांत्रिक) (राजपत्रित), (सेवाप्रवेश) नियम, २०२० असे संबोधण्यात यावे.
२. या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,----
(क) "आयोग" याचा अर्थ महाराष्ट्र लोकसेवा आयोग ;
(ख) "आयुक्तालय" याचा अर्थ महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय ;
(ग) "विभाग" याचा अर्थ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग ;
(घ) "शासन" याचा अर्थ महाराष्ट्र शासन.
(१)
भाग चार-अ----९६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, ऑक्टोबर १६, २०२०/आश्िवन २४, शके १९४२ ३. प्रादेशिक उप आयुक्त मत्स्यव्यवसाय आणि उप आयुक्त (अर्थ व नियोजन) (तांत्रिक) (राजपत्रित), गट-अ या पदावरील नियुक्ती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) (राजपत्रित), गट-अ हे पद धारण करणाया व या पदावर किमान तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेने काटेकोर निवडीच्या आधारे पदोन्नतीने करण्यात येईल.
४. नियम ३ मध्ये नमूद पदावर नियुक्त उमेदवाराने यासंबंधी तयार केलेल्या नियमानुसार, मराठी व हिंदी भाषा परीक्षा यापूर्वी उत्तीर्ण केली नसल्यास वा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसल्यास त्याला सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
५. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी संबंधीचे प्रमाणपत्र विहित मुदतीत धारण करणे आवश्यक राहील.
६. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोठेही बदलीस पात्र राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनूप कुमार,
शासनाचे प्रधान सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, ऑक्टोबर १६, २०२०/आश्िवन २४, शके १९४२ ३AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT AND
FISHERIES, DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400032, date the 15th October 2020.
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. Matsya-2019/C.R. 60/ADF-12.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders or instruments made in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the post of Regional Deputy Commissioner of Fisheries and Deputy Commissioner (Budget and Planning) (Techinical) (Gazzetted), Group-A in Maharashtra Fisheries Services in Commissionerate of Fisheries under the Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department of Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the Regional Deputy Commissioner of Fisheries and Deputy Commissioner (Budget and Planning) (Technical) (Gazzetted), Group-A in Maharashtra Fisheries Services (Recruitment) Rules, 2020.
2. In these rules, unless the context requires otherwise,—
(a) "Commission" means the Maharashtra Public Service Commission ;
(b) "Commissionerate" means the Commissionerate of Fisheries under the Agriculture, Animal Husbandary, Dairy Development and Fisheries Department, Government of Maharashtra ;
(c) "Department" means the Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries, Department of Government of Maharashtra ;
(d) "Government" means the Government of Maharashtra.
3. Appointment to the post of the Regional Deputy Commissioner of Fisheries and Deputy Commissioner (Budget and Planning) (Technical) (Gazzetted), Group-A shall be made by promotion of a suitable person on the basis of strict selection with due regard to seniority from amongst the persons holding the post of Assistant Commissioner Fisheries (Technical) (Gazzetted), Group-A having not less than three years of regular service on that post.
4. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be required to pass the examinations in Marathi and Hindi languages according to the rules made in that behalf, unless he has already passed, or has been exempted from passing these examinations.
5. A person appointed to the post mentioned in rule 3 shall possess a certificate in computer operation within the period as prescribed by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra from time to time.
6. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable for transfer anywhere in the State of Maharashtra.
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
ANOOP KUMAR,
Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४ AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.