RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ६, अंक १०१] गुरुवार, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ [पृष्ठे १६, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २५३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिम(cid:५९७)ण विभाग
मादाम कामा माग(cid:१७१), हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक २२ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
महारा(cid:२०५)(cid:२८०) गृहनिम(cid:५९७)ण व (cid:१६९)े(cid:२८५)विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.९७/गृनिभू .--- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र- २८) याच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "विधी सहायक" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोटकलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचणाचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दिनांक ०५ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या हरकती वा सूचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
भाग चार-ब---२५३-१
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२सेवा प्रवेश नियमाचा मसुदा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.९७/गृनिभू.---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र- २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "विधी सहायक" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:-
प्रारूप सेवा प्रवेश नियम
१. या नियमांना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "विधी सहा(cid:२००)यक (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणावे.
२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-
(अ) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.
(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र अधि. २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
(क) "पदवी " म्हणजे कोणत्याही संविधिमान्य विद्यापीठाची पदवी.
३. प्राधिकरणाच्या विधि विभागातील विधि सहा(cid:२००)यक या पदावरील नियुक्ती पुढील व्यक्तींमधून नामनिर्देशनाव्दारे करण्यात येईल.
(१) ज्या उमेदवारांचे वय १९ वर्षांपेक्षा कमी नसेल, आणि खुल्या वर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षापेक्षा व मागासवर्गीय व्यक्तींसाठी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसेल; आणि;
(२) कायद्याची पदवी धारण के लेली असावी तसेच;
(३) पदवी प्राप्त के ल्यानंतर सॉलिसीटर फर्ममधील अथवा शासनाच्या विधी विभागामध्ये अथवा सरकारी उपक्रमामध्ये कायदेविषयक मसुदे तयार करण्याचा ३ वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीचा अनुभव असावा.
परंतु, मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक तो अनुभव असलेले उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध नाहीत असे कोणत्याही वेळी निवड प्राधिकाऱ्याचे मत झाल्यास अशा निवडीच्या बाबतीत निवड प्राधिकाऱ्यास अनुभवाच्या कालावधीबाबतची अट शिथिल करता येईल आणि अशा जातीमधील किंवा जमातीमधील योग्य उमेदवारांची निवड करता येईल.
४. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत वेळोवेळी करण्यात आलेल्या नियमानुसार, विभागीय परीक्षा ( आवश्यक असल्यास किंवा भविष्यात अनिवार्य के ल्यास ), उत्तीर्ण के ली नसेल किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल तर, सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ ३५. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, हिंदी व मराठी भाषा परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण के लेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल, तर तिला सदर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
६. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित के लेले संगणक संचलन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
७. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांनी ठरविल्यानुसार प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही मंडळात/ कार्यालयात , बदलीस पात्र राहील.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
रा. क(cid:५३५). धनावडे,
शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब---२५३-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२
गृहनिम(cid:५९७)ण विभाग
मादाम कामा माग(cid:१७१), हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक २२ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
महारा(cid:२०५)(cid:२८०) गृहनिम(cid:५९७)ण व (cid:१६९)े(cid:२८५)विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.९७/गृनिभू - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोटकलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचणाचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि. ०५ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या हरकती वा सूचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
सेवा प्रवेश नियमाचा मसुदा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.९७/गृनिभू .---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:-
प्रारूप सेवा प्रवेश नियम
१. या नियमांना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "सहायक विधि स(cid:४९८)ागार (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणावे.
२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,---
(अ) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ ५(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र अधि. २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
(क) "पदवी " म्हणजे कोणत्याही संविधिमान्य विद्यापीठाची पदवी.
३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल :-
(अ) प्राधिकरणामध्ये विधि सहा(cid:२००)यक हे पद धारण करणाऱ्या ज्या व्यक्तींना त्या पदावरील नियमित सेवेचा पाच वर्षांपेक्षा कमी नसेल इतका अनुभव असेल अशा व्यक्तींमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीला पदो(cid:४००)ती देऊन ;
किंवा
(ब) पुढील व्यक्तींमधून नामनिर्देशनाद्वारे -
(१) ज्या उमेदवारांचे वय १९ वर्षांपेक्षा कमी नसेल, आणि खुल्या वर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षांपेक्षा व मागासवर्गीय व्यक्तींसाठी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसेल; आणि;
(२) ज्यांने कायद्याची पदव्युत्तर पदवी धारण के लेली असेल तसेच;
(३) ज्याला पदव्युत्तर पदवी प्राप्त के ल्यानंतर कोणत्याही उच्च न्यायालय अथवा समकक्ष न्यायालयातील वकीलीचा विशेषत: भूधारणा (Land Tenures), मालमत्तेचे हस्तांतरण, घरबांधणी, मालकी हक्काचे (cid:१९६)लॅ(cid:१८५)स, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर प्राधिकरणाशी संबंधित असलेल्या कामांचा पाच वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव असेल.
परंतु, मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक तो अनुभव असलेले उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध नाहीत असे कोणत्याही वेळी निवड प्राधिकाऱ्याचे मत झाल्यास अशा निवडीच्या बाबतीत निवड प्राधिकाऱ्यास अनुभवाच्या कालावधीबाबतची अट शिथिल करता येईल आणि अशा जातीमधील किंवा जमातीमधील योग्य उमेदवारांची निवड करता येईल.
४. नियम ३ येथे नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने व नामनिर्देशनान्वये करावयाची नियुक्ती यांचे प्रमाण ५०:५० असे राहील.
५. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत वेळोवेळी करण्यात आलेल्या नियमानुसार, विभागीय परीक्षा ( आवश्यक असल्यास किंवा भविष्यात अनिवार्य के ल्यास ), उत्तीर्ण के ली नसेल किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल तर, सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
६. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, हिंदी व मराठी भाषा परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण के लेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल, तर तिला सदर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
७. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित के लेले संगणक संचलन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२८. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांनी ठरविल्यानुसार प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही मंडळात/ कार्यालयात , बदलीस पात्र राहील.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
रा. क(cid:५३५). धनावडे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ ७गृहनिम(cid:५९७)ण विभाग
मादाम कामा माग(cid:१७१), हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक २२ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
महारा(cid:२०५)(cid:२८०) गृहनिम(cid:५९७)ण व (cid:१६९)े(cid:२८५)विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि. २०२०/प्र.क्र.९७/गृनिभू - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "उप विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तिंच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि. ५ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तिकडून ज्या हरकती वा सूचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
सेवा प्रवेश नियमाचा मसुदा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि. २०२०/प्र.क्र.९७/गृनिभू महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "उप विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे :---
प्रारूप सेवा प्रवेश नियम
१. या नियमांस, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "उप विधी स(cid:४९८)ागार (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणता येईल.
२. या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,---
(अ) "शासन" म्हणजे महाराष्ट्र शासन.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "उप विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील नियुक्ती प्राधिकरणामध्ये "सहायक विधी स(cid:४९८)ागार" हे पद धारण करणाऱ्या ज्या व्यक्तींना त्या पदावरील नियमित सेवेचा पाच वर्षांपेक्षा कमी नसेल इतका अनुभव असेल अशा व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीला पदो(cid:४००)ती देऊन करण्यात येईल.
४. नियम ३ येथे नमूद पदावर पदो(cid:४००)तीने नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, विभागीय परीक्षा ( आवश्यक असल्यास), उत्तीर्ण के ली नसेल किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल तर, सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
५. नियम ३ येथे नमूद पदावर पदो(cid:४००)तीने नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, हिंदी व मराठी भाषा परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण के लेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल, तर तिला सदर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
६. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने नेमणूक झालेल्या व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित के लेले संगणक संचलन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
७. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांनी ठरविल्यानुसार प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही मंडळात/ कार्यालयात , बदलीस पात्र राहील.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
रा. क(cid:५३५). धनावडे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ ९गृहनिम(cid:५९७)ण विभाग
मादाम कामा माग(cid:१७१), हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक २२ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
महारा(cid:२०५)(cid:२८०) गृहनिम(cid:५९७)ण व (cid:१६९)े(cid:२८५)विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि.२०२०/प्र.क्र.९७/गृनिभू - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तिंच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि. ०५ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तिकडून ज्या हरकती वा सूचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
सेवा प्रवेश नियमाचा मसुदा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि. २०२०/प्र.क्र.९७/गृनिभू.---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे :---
प्रारूप सेवा प्रवेश नियम
१. या नियमांस, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "विधी स(cid:४९८)ागार (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणता येईल.
२. या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,---
(अ) "शासन" म्हणजे महाराष्ट्र शासन.
भाग चार-ब---२५३-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ (ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "विधी स(cid:४९८)ागार" या पदावरील नियुक्ती प्राधिकरणामध्ये "उप विधी स(cid:४९८)ागार" हे पद धारण करणाऱ्या ज्या व्यक्तींना त्या पदावरील नियमित सेवेचा सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतका अनुभव असेल अशा व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीला पदो(cid:४००)ती देऊन करण्यात येईल.
४. नियम ३ येथे नमूद पदावर पदो(cid:४००)तीने नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, विभागीय परीक्षा ( आवश्यक असल्यास), उत्तीर्ण के ली नसेल किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल तर, सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
५. नियम ३ येथे नमूद पदावर पदो(cid:४००)तीने नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, हिंदी व मराठी भाषा परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण के लेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल, तर तिला सदर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
६. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने नेमणूक झालेल्या व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित के लेले संगणक संचलन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
७. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांनी ठरविल्यानुसार प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही मंडळात/ कार्यालयात , बदलीस पात्र राहील.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
रा. क(cid:५३५). धनावडे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ ११गृहनिम(cid:५९७)ण विभाग
मादाम कामा माग(cid:१७१), हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक २२ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
महारा(cid:२०५)(cid:२८०) गृहनिम(cid:५९७)ण व (cid:१६९)े(cid:२८५)विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक : सेप्रनि. २०२०/प्र.क्र.१०८/गृनिभू.---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९ च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम,१९७६ च्या कलम ६५ अन्वये शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सक्षम प्राधिकारी" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तिंच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडू न दि. ५ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तिकडून ज्या हरकती वा सूचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
सेवा प्रवेश नियमाचा मसुदा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक : सेप्रनि. २०२०/प्र.क्र.१०८/गृनिभू.---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९ च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सक्षम प्राधिकारी" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:---
१. या नियमांना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "सक्षम प्राधिकारी (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणावे.
२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-
(अ) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.
भाग चार-ब---२५३-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ (ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
३. प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकारी या पदावरील नियुक्ती महाराष्ट्र राज्य शासनाकडून उप जिल्हाधिकारी किंवा दिवाणी न्यायाधीश यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल असे पद धारण करणाऱ्या किंवा असे पद ज्याने धारण के ले असेल अश्या अधिकाऱ्याची नेमणूक शासनाच्या प्रतिनियुक्ती धोरणानुसार तसेच विभागाने वेळोवेळी शासन निर्णय/ परिपत्रक/ आदेश इत्यादी अन्वये विहित के लेल्या प्रतिनियुक्तीच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.
शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागाकडू न अथवा कार्यालयाकडून या पदावर गृहनिर्माण विभागाच्या मान्यतेशिवाय / संमतीशिवाय परस्पर नियुक्ती देता येणार नाही.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
रा. क(cid:५३५). धनावडे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ १३गृहनिम(cid:५९७)ण विभाग
मादाम कामा माग(cid:१७१), हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक २२ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
महारा(cid:२०५)(cid:२८०) गृहनिम(cid:५९७)ण व (cid:१६९)े(cid:२८५)विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक : सेप्रनि-२०२०/प्र.क्र.१०९/गृनिभू.--- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९ च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "जनसंपर्क अधिकारी" या पदावरील सेवाप्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि. ०५ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तिकडून ज्या हरकती वा सुचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई - ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सुचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
सेवा प्रवेश नियमाचा मसुदा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक : सेप्रनि-२०२०/प्र.क्र.१०९/गृनिभू.---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र- २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "जनसंपर्क अधिकारी" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:-
१. या नियमांना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "जनसंपर्क अधिकारी" (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणावे.
२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,---
(अ) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.
(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२(क) "पदवी" म्हणजे एखाद्या संविधिमान्य विद्यापीठाची पदवी
३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "जनसंपर्क अधिकारी" या पदावरील नियुक्ती पुढील व्यक्तींमधून नामनिर्देशनाव्दारे करण्यात येईल :-
(एक) ज्या उमेदवारांचे वय १९ वर्षांपेक्षा कमी नसेल, आणि खुल्या वर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्षापेक्षा व मागासवर्गिय व्यक्तींसाठी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसेल; आणि
(दोन) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा,
(तीन) ज्यांनी पत्रकारितेमधील पदवी किंवा पदविका धारण के लेली असेल,
(चार) वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण के ल्यानंतर उपरोक्त पदासाठी ५ वर्षांचा अनुभव खाली प्रमाणे असेल,
(अ) बातमीदारी व जनसंपर्काशी संबंधित पत्रकारिता किंवा
(ब) दैनंदिन वर्तमानपत्रात किंवा नामांकित एजन्सीमध्ये काम के लेले असावे, किंवा
(क) शासकीय /निमशासकीय/सुप्रस्थापित कं पनीमध्ये संपादकीय विभागात काम के लेले असावे,
उच्चतम शैक्षणिक अर्हता व असाधारण अनुभव असणाऱ्या उमेदवारास वयोमर्यादा किंवा अनुभव किंवा दोन्ही शिथिल करता येईल.
४. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, विभागीय परिक्षा ( आवश्यक असल्यास), उत्तीर्ण के ली नसेल किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल तर, सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
५. नियम ३ येथे नमूद पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार, हिंदी व मराठी भाषा परीक्षा, अगोदरच उत्तीर्ण के लेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल, तर तिला सदर परिक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
६ नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित के लेले संगणक संचलन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
७. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांनी ठरविल्यानुसार प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही मंडळात/ कार्यालयात, बदलीस पात्र राहील.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
रा. क(cid:५३५). धनावडे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ १५गृहनिम(cid:५९७)ण विभाग
मादाम कामा माग(cid:१७१), हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक २२ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
महारा(cid:२०५)(cid:२८०) गृहनिम(cid:५९७)ण व (cid:१६९)े(cid:२८५)विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक : सेप्रनि.२०२०/प्र.क्र.१०९/गृनिभू .---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९ च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील उप मुख्य अधिकारी (पणन), मु ंबई गृहनिर्माण मंडळ वगळता, "मुख्य जनसंपर्क अधिकारी" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तिंच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि.
०५ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तिकडून ज्या हरकती वा सूचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
सेवा प्रवेश नियमाचा मसुदा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक : सेप्रनि-२०२०/प्र.क्र.१०९/गृनिभू.---महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र- २८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "मुख्य जनसंपर्क अधिकारी" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:-
१. या नियमांना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "मुख्य जनसंपर्क अधिकारी (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणावे.
२. या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,
(अ) "शासन" म्हणजे महाराष्ट्र शासन.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास अधिनियम, १९७६(सन १९७७ चा महा. अधि. २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
(क) " पदवी" याचा अर्थ सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित के लेली अन्य कोणतीही अर्हता
३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "मुख्य जनसंपर्क अधिकारी" या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल :-
प्राधिकरणामध्ये "जनसंपर्क अधिकारी" हे पद धारण करणाऱ्या ज्या व्यक्तींना त्या पदावरील नियमित सेवेचा तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या वर्षांचा अनुभव आहे अशा व्यक्तीला पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे पदो(cid:४००)ती देऊन;
४. नियम ३ मध्ये नमूद के लेल्या पदावर पदो(cid:४००)तीने नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांनी ठरविल्यानुसार प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही मंडळात/ कार्यालयात, बदलीस पात्र राहील.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
रा. क(cid:५३५). धनावडे,
शासनाचे उप सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.