Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IKDS Ext. no. 51

Published 23 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २३, २०२०/कर्ातिक १, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ३२] शुक्रवार, ऑक्टोबर २३, २०२०/कर्ातिक १, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ५१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांजकडून

वाचले :---

(१) मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६.

(२) शासन, गृह विभागाकडील अधिसूचना क्र. एमव्हीए ०५८९/सीआर-१०६१/टीआरए-२, दिनांक १९ मे १९९०.

(३) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र क्र. महाड/प्रशा/४६१६, दिनांक १ जुलै २०१९.

(४) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्रमांक गृह/एमएजी-१/जड.वाह.बंदी आंबेत पूल/२०१९, दिनांक ४ ऑक्टोबर २०१९.

(५) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांचेकडील पत्र क्र. मवि/का-३ (२)/४८३५, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९.

(६) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्रमांक गृह/एमएजी-१/जड.वाह.बंदी आंबेत पूल/२०१९, दिनांक ११ नोव्हेंबर २०१९.

(७) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र जा.क्र.महाड/प्रशा/५१९८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१९.

(८) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्रमांक गृह/एमएजी-१/जड.वाह.बंदी आंबेत पूल/२०१९, दिनांक १३ डिसेंबर २०१९.

(९) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र जा.क्र.महाड/प्रशा/८१६, दिनांक २९ फेब्रुवारी २०२०.

(१०) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्रमांक गृह/एमएजी-१/वाहतुक बंदी आंबेत पूल/२०२०, दिनांक २३ मार्च २०२०.

(११) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र जा.क्र.महाड/प्रशा/१००१, दिनांक १७ मार्च २०२०.

(१२) या कार्यालयाकडील मंजूर टिपणी दिनांक २७ एप्रिल २०२०.

सुधारित अवजड वाहतूक बंदी अधिसूचना

क्रमांक गृह/एमएजी-१/अवजड वाहतुक बंदी आंबेत पुल/२०२०.----ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाडयांनी उपोद्घातातील अ. क्र. ३, ५ व ७ कडील पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अनुक्रमे उपोद्घातातील अ.क्र.४ व ६ रोजीच्या अधिसूचन्वये सदर अधिसूचनेच्या दिनांकापासून १ महा करीता व अ.क्र.८ रोजीच्या अधिसूचन्वये सदर अधिसूचनेच्या दिनांकापासून ३ महाकरीता म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील (रा.मा.१०१) सावित्री खाडीवरील कि.मी.०/८०० मधील आंबेत पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व प्रकारची अवजड वाहतुक जसे बस, ट्रक, टेम्पो इ. वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबतचे (१) भाग एक (को.वि.पु.)—५१--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २३, २०२०/कर्ातिक १, शके १९४२ आदेश जारी करण्यात आलेले आहेत. तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपोद्घातातील अ.क्र.९ कडील पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील उपोद्घातातील अ.क्र.१० रोजीच्या अधिसुचनेन्वये सदर अधिसूचनेच्या दिनांकापासून माहे १५ जुनपयर्ंत म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यांवरील (रा.मा.१०१) सावित्री खाडीवरील कि.मी.०/८०० मधील आंबेत पुलावरुन सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपोद्घातातील अ.क्र.११ कडील पत्रान्वये (या कार्यालयाकडे दिनांक २४ मार्च २०२० रोजी ई-मेलद्वारे प्राप्त) फेरी बोट सेवा सुरु होईपयर्ंत एखादी प्रवाशी लाँच सुरू करून, तात्पुरती पर्यायी जलवाहतुक व्यवस्था सुरू करणेसाठी आंबेत आणि म्हाप्रळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या दृष्टीने दि. ११ मार्च २०२० रोजी प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रत्नागिरी आणि कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, महाड यांनी म्हाप्रळ येथे प्रत्यक्ष गावभेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी फक्त प्रवाशी लाँच सुरू करणेस प्रखर विरोध दर्शविला व जोपयर्ंत रो-रो जलवाहतुक सेवा सुरू होत नाही, तोपयर्ंत पुलावरील सद्या चालू असलेली हलक्या वाहनांची वाहतुक बंद करून नये असे सुचविले. रो-रो जलवाहतुक सेवा सुरु करणेसाठी उतरत्या धक्क्यांचे बांधकाम होण्यासाठी किमान दोन महिने इतका कालावधी लागणार आहे असे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकायांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुलावरील हलक्या वाहनांची वाहतूक सद्य:स्थितीत जशी चालु आहे, तशीच पुढे रो-रो जलवाहतूक सेवा सुरू होईपयर्ंत चालु ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी कृपया आंबेत पुलावरुन अवजड वाहतुक बंद करुन फ हलक्या वाहनांची वाहतुक आता जशी आहे तशी पुढील ३ महाकरीता चालू ठेवणेबाबत अधिसूचना आपलेकडून जारी होणेस" अशी विनंती केलेली आहे.

आणि ज्याअर्थी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सदर खाडीवर जोपयर्ंत प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रत्नागिरी यांचेकडून रो-रो जलवाहतुक सेवा सुरू होत नाही तोपयर्ंत म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील (रा.मा.१०१) सावित्री खाडीवरील कि.मी.०/८०० मधील आंबेत पुलावरुन यापुर्वी ज्याप्रमाणे दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व प्रकारची अवजड वाहतुक जसे बस, ट्रक, टेम्पो इ. वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी, निधी चौधरी, जिल्हादंडाधिकारी, रायगड उपोद्घातातील अ.क्र.१ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून ३ महापयर्ंत म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील (रा.मा.१०१) सावित्री खाडीवरील कि.मी.०/८०० मधील आंबेत पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरि सर्व प्रकारची अवजड वाहतुक जसे बस, ट्रक, टेम्पो इ. वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबतचे आदेश जारी करीत आहे.

अलिबाग, दिनांक २७ एप्रिल २०२०.

निधी चौधरी, जिल्हादंडाधिकारी, रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIO NERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.