Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. 46 (27-10-2020) Maharashtra Ordinance No. XVI of 2020

Published 27 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009 /35530

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

मंगळवार , ऑक्टोबर २७ , २०२०/कार्तिक ५ , शके १ ९ ४२

वर्ष ६, अंक ३०]

[पृष्ठे ५ , किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ४६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे

१-५ सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १६.- मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९६५ यांत आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश .

नगरविकास विभाग

मंत्रालय , मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २७ ऑक्टोबर २०२० .

MAHARASHTRA ORDINANCE No. XVI OF 2020 .

AN ORDINANCE FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT, THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT AND THE MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965 .

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १६ .

मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ यांत आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश .

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही;

(१)

भाग चार- ४६-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर २७ , २०२०/ कार्तिक ५ , शके १ ९ ४२

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता , महाराष्ट्राच्या राज्यपालांनी , मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी १८८८ चा अधिनियम , १ ९ ६५ यांत आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी १ ९४ ९ चा परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ; ३ . ५९ .

१९ ६५ चा त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या महा . ४० . अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे , पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :-

प्रकरण एक

प्रारंभिक.

संक्षिप्त नाव व १. ( १ ) या अध्यादेशास , मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , प्रारंभ . नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा) अध्यादेश , २०२० असे म्हणावे.

( २ ) तो , तात्काळ अंमलात येईल .

प्रकरण दोन

मुंबई महानगरपालिका अधिनियम याची सुधारणा.

१८८८ चा २. मुंबई महानगरपालिका अधिनियम याच्या कलम १४४ फ मधील , पोट -कलम ( १ ) मध्ये , पुढील १८८८ चा याच्या कलम परंतुक समाविष्ट करण्यात येईल आणि ते १ एप्रिल २०२० पासून समाविष्ट करण्यात आले असल्याचे मानण्यात ३.

सन अधिनियम क्रमांक ३ १४४फ ची येईल :- सुधारणा.

१ ९ ५८ चा " परंतु , स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री , देणगी व फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये बसवावयाच्या मुद्रांक शुल्कात , शहरात स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेशी ६०.

संबंधित असणा- या अशा कोणत्याही संलेखाच्या बाबतीत,-

(क) १ एप्रिल २०२० पासून सुरू होणा - या व ३१ मार्च २०२२ रोजी संपणा- या कालावधीकरिता , या पोट-कलमान्वये कोणताही अधिभार वाढविण्यात येणार नाही ;

(ख ) १ एप्रिल २०२२ पासून , महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये , राज्य शासनाने , मुद्रांक शुल्कात १ ९ ५८ चा कपात केल्यास किंवा सूट दिल्यास , अशा बाबतीत , या पोट-कलमान्वये राज्य शासन , राजपत्रातील ६०० आदेशाद्वारे , विनिर्दिष्ट करील अशा दराने , अधिभारात कपात करील किंवा सूट देईल . " .

प्रकरण तीन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याची सुधारणा.

सन १ ९ ४९ चा

१ ९ ४ ९ चा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( यात यापुढे ज्याचा निर्देश , " महानगरपालिका अधिनियम " ३. असा करण्यात आला आहे ) , याच्या कलम १४ ९अ मधील , पोट - कलम ( १ ) मध्ये, पुढील परंतुक समाविष्ट ५ ९ . करण्यात येईल आणि ते १ सप्टेंबर २०२० पासून समाविष्ट करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल :-

अधिनियम क्रमांक ५ ९ याच्या कलम १४ ९अ ची

सुधारणा.

" परंतु, स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री , देणगी व फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये बसवावयाच्या मुद्रांक शुल्कात , शहरात स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेशी १ ९ ५८ चा संबंधित असणा- या अशा कोणत्याही संलेखाच्या बाबतीत,- ६०.

(अ) १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणा- या आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणा-या कालावधीकरिता , या पोट- कलमान्वये , कोणताही अधिभार वाढविण्यात येणार नाही ;

(ब) १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणा- या व ३१ मार्च २०२१ रोजी संपणा - या कालावधीकरिता, या पोट-कलमान्वये अर्धा टक्का दराने अधिभारात कपात करण्यात येईल ;

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर २७ , २०२०/ कार्तिक ५ , शके १ ९ ४२

१९ ५८ चा

६०.

(क) १ एप्रिल २०२१ पासून , महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये , राज्य शासनाने , मुद्रांक शुल्कात कपात केल्यास किंवा सूट दिल्यास अशा बाबतीत , या पोट- कलमान्वये , राज्य शासन , राजपत्रातील आदेशाद्वारे , विनिर्दिष्ट करील अशा दराने , अधिभारात कपात करील किंवा सूट देईल . " .

सन १ ९ ४ ९ चा अधिनियम क्रमांक ४. महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४ ९ब मधील, पोट -कलम ( १ ) मध्ये , पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल आणि ते १ एप्रिल २०२० पासून समाविष्ट करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल :-

४९ याच्या कलम १४ ९ब ची सुधारणा.

१९ ५८ चा

६०. परंतु , स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री , देणगी व फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये बसवावयाच्या मुद्रांक शुल्कात, शहरात स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित असणा- या अशा कोणत्याही संलेखाच्या बाबतीत,-

(अ ) १ एप्रिल २०२० पासून सुरू होणा - या व ३१ मार्च २०२२ रोजी संपणा- या कालावधीकरिता , या पोट-कलमान्वये, कोणताही अधिभार वाढविण्यात येणार नाही ;

१९ ५८ चा

६०. (ब ) १ एप्रिल २०२२ पासून , महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये , राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्यास किंवा सूट दिल्यास , अशा बाबतीत , या पोट - कलमान्वये , राज्य शासन , राजपत्रातील आदेशाद्वारे , विनिर्दिष्ट करील अशा दराने , अधिभारात कपात करील किंवा सूट देईल. " .

प्रकरण चार

महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ याची सुधारणा.

१९ ६५ चा

अधिनियम क्रमांक महाराष्ट्र ४० याच्या कलम

सन १ ९ ६५ चा ५. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ याच्या कलम १४७ अ महा. ४०० मधील , पोट - कलम ( १ ) मध्ये , पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल आणि ते १ सप्टेंबर २०२० पासून समाविष्ट करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल:-

१४७अ ची " परंतु, स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री , देणगी व फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांवर सुधारणा .

१९ ५८ चा

६०. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये बसवावयाच्या मुद्रांक शुल्कात , शहरात स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित असणा- या अशा कोणत्याही संलेखाच्या बाबतीत,-

( अ ) १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणा-या व ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणा-या कालावधीकरिता, या पोट-कलमान्वये, कोणताही अधिभार वाढविण्यात येणार नाही ;

( ब) १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणा - या व ३१ मार्च २०२१ रोजी संपणा- या कालावधीकरिता , या पोट- कलमान्वये अर्धा टक्का दराने अधिभारात कपात करण्यात येईल ;

१९ ५८ चा

६०. (क) १ एप्रिल २०२१ पासून , महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये , राज्य शासनाने , मुद्रांक शुल्कात कपात केल्यास किंवा सूट दिल्यास , अशा बाबतीत , या पोट- कलमान्वये राज्य शासन , राजपत्रातील आदेशाद्वारे , विनिर्दिष्ट करील अशा दराने , अधिभारात कपात करील किंवा सूट देईल . " .

प्रकरण पाच

संकीर्ण.

बसविलेल्या आणि

वसूल केलेल्या अध्या. १६ .

शुल्काचे अतिरिक्त मुद्रांक विधिग्राह्यीकरण .

१८८८

१९ ४९ चा ५९ .

महा . ४० .

६. ( १ ) कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयात , हुकूमनाम्यात किंवा आदेशात एत‌द्विरुद्ध २०२० चा काहीही अंतर्भूत असले तरी , मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, महा नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा) अध्यादेश , २०२० ( यात यापुढे ज्याचा निर्देश , " सुधारणा चा ३. अध्यादेश " असा करण्यात आला आहे ) , याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी , मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चा १ ९ ६५ ( यात यापुढे ज्याचा निर्देश , " मुख्य महानगरपालिका अधिनियम " असा करण्यात आला आहे ) , यांच्या तरतुदींखालील विक्री , देणगी आणि फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांच्या निष्पादनाच्या संबंधातील अतिरिक्त भाग चार- ४६-२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर २७ , २०२०/ कार्तिक ५ , शके १ ९ ४२

मुद्रांक शुल्काची किंवा अधिभाराची कोणतीही आकारणी, पुनर्विलोकन , बसवणी किंवा वसुली किंवा अशा मुद्रांक शुल्काच्या किंवा अधिभाराच्या आकारणीच्या, पुनर्विलोकनाच्या, बसवणीच्या किंवा वसुलीच्या संबंधात केलेली कोणतीही कार्यवाही किंवा गोष्ट ही, जणू काही मुद्रांक शुल्काची किंवा अधिभाराची अशी आकारणी , पुनर्विलोकन, बसवणी किंवा वसुली किंवा त्यासंबंधात केलेली अशी कार्यवाही किंवा गोष्ट, सुधारणा अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य महानगरपालिका अधिनियमांन्वये यथोचितरीत्या केलेली , करण्यात आलेली किंवा झालेली आहे , असे समजून वैध असल्याचे व परिणामकारक असल्याचे मानण्यात येईल , आणि ती त्यानुसार ,-

( अ ) सर्व प्रयोजनांसाठी , अशा मुद्रांक शुल्काच्या व अधिभाराच्या आकारणीच्या , पुनर्विलोकनाच्या , बसवणीच्या किंवा वसुलीच्या किंवा त्यासंबंधातील कार्यवाहीच्या किंवा गोष्टीच्या संबंधात , कोणत्याही प्राधिका-याकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही अधिका- याकडून करण्यात आलेल्या सर्व कृती , कार्यवाही किंवा गोष्टी या, कायद्यानुसार असल्याचे आणि त्या सर्ववेळी अशा रितीने करण्यात आल्या असल्याचे मानण्यात येईल ;

(ब ) अशा भरणा केलेल्या मुद्रांक शुल्काच्या किंवा अधिभाराच्या परताव्यासाठी कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही न्यायाधिकरण, अधिकारी किंवा प्राधिकारी यांच्यासमोर , कोणताही दावा, अपील , अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करता येणार नाही किंवा चालविता येणार नाही किंवा चालू ठेवता येणार नाही ; आणि

(क) कोणतेही न्यायालय , न्यायाधिकरण , अधिकारी किंवा इतर प्राधिकारी अशा शुल्काच्या किंवा अधिभाराच्या परताव्याचा निदेश देणारा कोणताही हुकूमनामा किंवा आदेश जारी करणार नाही .

( २ ) शंका निरसनार्थ, याद्वारे असे घोषित करण्यात येते की , पोट-कलम ( १ ) मधील कोणतीही गोष्ट, एखाद्या व्यक्तीला,-

(अ ) पोट - कलम ( १ ) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अशा मुद्रांक शुल्काच्या किंवा अधिभाराच्या आकारणीस, पुनर्विलोकनास, बसवणीस किंवा वसुलीस , सुधारणा अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य महानगरपालिका अधिनियमांच्या तरतुदींनुसार हरकत घेण्यास ; किंवा

(ब ) सुधारणा अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य महानगरपालिका अधिनियमांन्वये मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात तिच्याकडून देय असलेल्या रकमेपेक्षा तिने अधिक भरणा केलेल्या कोणत्याही मुद्रांक शुल्काच्या किंवा अधिभाराच्या परताव्याची मागणी करण्यास,

प्रतिबंध करते , असा तिचा अन्वयार्थ लावण्यात येणार नाही .

( ३ ) सुधारणा अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य महानगरपालिका अधिनियमांतील कोणत्याही गोष्टीमुळे , कोणतीही व्यक्ती, सुधारणा अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी , तिने केलेली किंवा करण्याचे वर्जिलेली जी कोणतीही गोष्ट संबंधित दिनांकास मुख्य महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा अध्यादेशाद्वारे अशी सुधारणा करण्यात आली नसती तर , मुख्य महानगरपालिका अधिनियमांन्वये अपराध ठरली नसती अशा कोणत्याही कृती किंवा अकृती संबंधातील कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरविले जाण्यास पात्र ठरविले जाणार नाही अथवा कोणतीही व्यक्ती सुधारणा अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी अंमलात असलेल्या कायद्यांन्वये, अशा कृतीच्या किंवा अकृतीच्या संबंधात , तिच्यावर जी शास्ती लादता आली असती त्यापेक्षा अधिक शास्ती लादली जाण्यास पात्र ठरविली जाणार नाही.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर २७ , २०२०/ कार्तिक ५ , शके १ ९ ४२

निवेदन

मुंबई महानगरपालिका अधिनियम ( १८८८ चा ३ ) याच्या कलम १४४ फ च्या पोट- कलम ( १ ) नुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याच्या कलम १४ ९ब च्या पोट - कलम ( १ ) यानुसार, स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री , देणगी व फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांवर , महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम ( १ ९ ५८ चा ६० ) याअन्वये बसवण्यायोग्य असलेले मुद्रांक शुल्क , ज्या शहरात एक किंवा त्याहून अधिक, अत्यंत महत्त्वाचे नागरी वाहतूक प्रकल्प सुरू आहेत त्या शहरात स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित असणा- या अशा कोणत्याही संलेखाच्या बाबतीत , अशा स्थित असलेल्या मालमत्तेच्या मूल्यावर, विक्रीच्या किंवा देणगीच्या संलेखांच्या बाबतीत, आणि फलोपभोग गहाण संलेखांच्या बाबतीत , संलेखात नमूद केल्याप्रमाणे , संलेखाद्वारे प्रतिभूत केलेल्या रकमेवर , एक टक्का या दराने अधिभार आकारून वाढविण्यात येईल आणि त्यानुसार उक्त अधिनियमांन्वये गोळा करण्यात येईल.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( १ ९ ४ ९ चा ५ ९ ) याच्या कलम १४ ९अ चे पोट - कलम ( १ ) आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ ( १ ९ ६५ चा महा . ४० ) याच्या कलम १४७ अ चे पोट - कलम ( १ ) यांनुसार , स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री , देणगी व फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांवर , महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम ( १ ९ ५८ चा ६० ) याअन्वये बसवण्यायोग्य असलेले मुद्रांक शुल्क, शहरात स्थित असेलल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित असणा- या अशा कोणत्याही संलेखाच्या बाबतीत , अशा स्थित असलेल्या मालमत्तेच्या मूल्यावर , विक्रीच्या किंवा देणगीच्या बाबतीत, आणि फलोपभोग गहाण संलेखांच्या बाबतीत, संलेखात नमूद केल्याप्रमाणे , संलेखाद्वारे प्रतिभूत केलेल्या रकमेवर , एक टक्का या दराने अधिभार आकारून वाढविण्यात येईल आणि त्यानुसार उक्त अधिनियमांन्वये गोळा करण्यात येईल.

२. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये बसवण्यायोग्य असलेल्या मुद्रांक शुल्कात , १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणा - या आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणा -या कालावधीकरिता, २ % याप्रमाणे आणि १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणा -या आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपणा - या कालावधीकरिता १.५ % याप्रमाणे कपात करण्यात आली आहे. या दृष्टीने , शासनास , मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४४ फ च्या पोट -कलम ( १ ) , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४ ९अ च्या पोट- कलम ( १ ) व १४ ९ब च्या पोट -कलम ( १ ) आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ याच्या कलम १४७ अ च्या पोट - कलम ( १ ) यांमध्ये योग्य त्या सुधारणा करून, वर नमूद केलेल्या अधिभारात कपात करणे किंवा त्यात सूट देणे इष्ट वाटते . भविष्यात, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये मुद्रांक शुल्कात कपात केल्यास किंवा सूट दिल्यास, या अधिभारात कपात करण्यासाठी किंवा सूट देण्यासाठी उक्त अधिनियमांमध्ये, योग्य त्या सुधारणा करण्याचे देखील प्रस्तावित करण्यात येत आहे .

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम ( १८८८ चा ३ ) , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( १ ९ ४ ९ चा ५९ ) आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा. ४० ) यात आणखी सुधारणा करण्याकरिता , महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे , अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे , म्हणून , हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

भगत सिंह कोश्यारी ,

मुंबई,

दिनांक २६ ऑक्टोबर २०२० .

महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

महेश पाठक ,

शासनाचे प्रधान सचिव.

DIRECTOR , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY

ROAD ,

PUBLICATIONS , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.