महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ३८] बुधवार, नोव्हेंबर ११, २०२०/कर्ातिक २०, शके १९४२ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ६१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांजकडून
वाचले :---(१) मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६.
(२) शासन, गृह विभागाकडील अधिसूचना क्र.एमव्हीए ०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२, दिनांक १९ मे १९९०. (३) कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.अवि./प्रशा/६७७, दिनांक १ फेब्रुवारी २०२०. (४) या कार्यालयाकडील अधिसूचना क्र.गृह/एमएजी-१/ वाहतूक बंदी/अलिबाग साळाव/२०२०, दिनांक २६ मार्च २०२०. (५) कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.अवि/रेचिशा/३३१३/२०२०, दिनांक १३ जुलै २०२०.
(६) या कार्यालयाकडील अधिसूचना क्र. गृह/एमएजी-१/वाहतूक बंदी/अलिबाग साळाव/२०२०, दिनांक २१ जुलै २०२०. (७) कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.अवि/रेचिशा/५४२१/२०२०, दिनांक २७ ऑक्टोबर २०२०.
(८) या कार्यालयाकडील मंजूर टिप्पणी, दिनांक ४ नोव्हेंबर २०२०.
वाहतूक बंदी अधिसूचना
क्रमांक गृह/एमएजी-१/वाहतूक बंदी/अलिबाग साळाव/२०२०.------ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी उपोद्घातातील अ.क्र. ३ कडील पत्रान्वये केलेल्या विनंतीनुसार या कार्यालयाकडील उपोद्घातातील अ.क्र.४ रोजीच्या अधिसूचनेन्वये सदर अधिसूचनेच्या दिनांकापासून अलिबागकडून साळावकडे व साळावकडून अलिबागकडे रेवदंडा-साळाव पुलावरून होणारी वाहतूक २० टन माल क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेऊन, त्यावरील क्षमतेची अति अवजड वाहनांची (Multi Axle Vehicles, Overload Two Axle Vehicle) वाहतूक बंद करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत ;
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ११, २०२०/कर्ातिक २०, शके १९४२ आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी उपोद्घातातील अ.क्र.७ कडील रोजीच्या पत्रान्वये "" रेवदंडा पुलाचे बांधकाम सन १९८६ रोजी पूर्ण झालेले असून त्यावेळी पुलाच्या संकल्पनासाठी गृहीत धरलेली वाहतुकीची भारवाहन क्षमता हीसद्य:स्थितीत असणाया वाहतुकीच्या भारवाहन क्षमतेपेक्षा कमी असल्याने, तसेच पुलाचे आयुर्मान आज ३५ वर्षे झाले असल्याने सद्य:स्थितीत अतिजड वाहनांच्या माल वाहतुकीमुळे पुलास धोका संभवत असल्याने, रेवदंडा पुलावरून होणारी वाहतूक २० टन माल क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवून, त्यावरील अति अवजड वाहनांची (Multi Axle Vehicles, Overload Two Axle Vehicle) वाहतूक बंद करण्याबाबतची अधिसूचना आपल्या कार्यालयाकडील दिनांक २६ मार्च २०२० रोजीच्या आदेशाने निर्गमित करण्यात आलेली आहे. तथापि, दिनांक ८ मे २०२० रोजी मुरुड साळाव येथील जेटीतील एक मालवाहतूक करणारी बार्ज पुलाच्या पिअरला धडकलेली असून, तसेच पुलास हानी पोहोचली असल्याबाबत कळविलेले आहे. त्यानुषंगाने आगामी पावसाळ्यात रेवदंडा पुलास होणारी संभाव्य हानी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळ्याच्या (दिनांक २१ जून २०२० ते दिनांक ३० ऑक्टोबर २०२०) कालावधीमध्ये रेवदंडा पुलावरून होणारी जड वाहतूक पुर्णपणे बंद करण्याची, तसेच अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद करून सदरची अवजड वाहतूक ही अलिबाग ते वडखळ, वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या पर्यायी मार्गाने करणेबाबतची अधिसूचना निर्गमित करणेबाबत विनंती केलेली आहे. तथापि, आपल्या कार्यालयाकडील दिनांक १५ जून २०२० रोजीच्या पत्रान्वये नक्की किती वाहतूक क्षमतेपयर्ंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, तसेच कोणत्या प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी याबाबत स्पष्टता करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार आपणांस या कार्यालयाकडील दिनांक १३ जुलै २०२० रोजीच्या पत्रान्वये रेवदंडा पुलावर होणारी जड वाहतूक ही १२ मेट्रीक टनापेक्षा जास्त भारवाहन असणारी वाहने पुर्णपणे बंद करण्याची तसेच अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागांव ते रेवदंडा या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद करून सदरची अवजड वाहतूक ही अलिबाग ते वडखळ, वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या पर्यायी मार्गाने करणेबाबत अधिसूचना निर्गमित करणेबाबत आपणास कळविले आहे. सद्य:स्थितीत पावसाळा अंतीम टप्प्यात आहे. यावर्षी अतिवृष्टी झालेली असल्यामुळे रस्ते व पुलांची हानी झालेली आहे. सदर रस्ते व पुलांची दुरुस्ती करणेसाठी कालावधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने ३१ जानेवारी २०२१ पयर्ंत आपल्या कार्यालयाकडील दिनाकं २१ जुलै २०२० रोजीच्या सुधारित अधिसूचनेस मुदत वाढ मिळावी व त्याअनुषंगाने अधिसूचना निर्गमित करणेबाबत "" अशी विनंती केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी सन २०१८ पासून वेळोवेळी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा पुलाच्या दुरावस्थेमुळे सदर पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याबाबत मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ नुसार आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांच्या प्रस्तावात नमूद रेवदंडा पूल तसेच अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागांव ते रेवदंडा या रस्त्याच्या दुरुस्तीस/बांधकामास सक्षमी करणारा निश्चित किती कालावधी लागेल हे सांगता येत नसल्याने प्रकरणी मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ व अनुषंगीक उपरोक्त नमूद शासन, गृह विभागाकडील आदेशाद्वारे प्राप्त अधिकारानुसार प्रस्तावित अवजड वाहतूक बंदी केवळ दिनांक ३१ जानेवारी २०२१ पयर्ंत लागू न करता, सदर वाहतूक बंदी पुढील आदेश होईपयर्ंत लागू करणे आवश्यक आहे, असे माझे मत झाले आहे.
त्याअर्थी मी, निधी चौधरी, जिल्हादंडाधिकारी, रायगड उपोद्घातातील अ.क्र. १ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुढील आदेश होईपयर्ंत दुर्घटना तसेच रेवदंडा पुलास होणारी संभाव्य हानी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून रेवदंडा पुलावरून होणारी अवजड वाहतूक (१२ मेट्रीक टनापेक्षा जास्त भारवहन असणारी वाहने) बंद करण्याचे, तसेच अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागांव ते रेवदंडा या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद करून, सदरची अवजड वाहतूक ही अलिबाग ते वडखळ, वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या मार्गे करण्याचे आदेश जारी करीत आहे.