RNI No. MAHBIL /2009/35530
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
शुक्रवार , नोव्हेंबर १३ , २०२० /कार्तिक २२ , शके १ ९ ४२
वर्ष ६ , अंक ३३ ]
[पृष्ठे ३ , किंमत: रुपये २३.००
असाधारण क्रमांक ५०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २०. मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी पृष्ठे अध्यादेश. १-३
नगरविकास विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १३ नोव्हेंबर २०२० .
MAHARASHTRA ORDINANCE No. XX OF 2020 .
AN ORDINANCE FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT .
सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २० .
मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश. ज्याअर्थी , राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
१८८८ चा ३ . आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता , महाराष्ट्राच्या राज्यपालांनी , मुंबई महानगरपालिका अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
भाग चार- ५०-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग चार , नोव्हेंबर १३ , २०२० / कार्तिक २२ , शके १ ९ ४२
त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे , पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत : -
संक्षिप्त नाव व १. (१ ) या अध्यादेशास, मुंबई महानगरपालिका ( सुधारणा ) अध्यादेश , २०२० , असे म्हणावे.
प्रारंभ.
(२ ) तो, तात्काळ अंमलात येईल.
२ . मुंबई महानगरपालिका अधिनियम याच्या कलम १५४ मध्ये , पोट- कलम ( १क ) नंतर , पुढील १८८८ चा ३.
अधिनियम क्रमांक पोट- कलम समाविष्ट करण्यात येईल : -
याच्या कलम
सन १८८८ चा ३
" ( १ड) (अ ) पोट- कलम ( १क ) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी ,-
१५४ ची सुधारणा .
(एक) कोविड-१ ९ या सार्वत्रिक साथरोगाचा फैलाव झाल्यामुळे, पोट- कलम ( १ अ ) अन्वये निश्चित केलल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य, २०२०-२०२१ या वर्षी सुधारित करण्यात येणार नाही ;
(दोन) कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे मालमत्ता कर देयक , २०१९ -२०२० या वर्षी जे होते तेच २०२०-२०२१ या वर्षासाठी असेल;
(तीन) पोट-कलम ( १अ ) अन्वये निश्चित केलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य , जणू काही खंड ( एक) , २०२०-२०२१ या वर्षी लागू नव्हता असे समजून, २०२१- २०२२ या वर्षी सुधारित करण्यात येईल
(ब) पोट -कलम ( १ क) च्या परंतुकास अधीन राहून , पुढची सुधारणा, २०२५-२०२६ या वर्षी करण्यात येईल आणि , त्यानंतर, कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य पोट - कलम ( १क) च्या तरतुदींनुसार सुधारित करण्यात येईल. ".
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार , नोव्हेंबर १३ , २०२० /कार्तिक २२ , शके १ ९ ४२
निवेदन.
मुंबई महानगरपालिका अधिनियम ( १८८८ चा ३ ) याच्या कलम १३ ९ च्या खंड ( १ ) मध्ये, मालमत्ता कर लादण्यासंबंधी तरतूद आहे. उक्त अधिनियमाच्या कलम १५४ मध्ये, मालमत्ता कर आकारणीयोग्य असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे पट्टीयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य निर्धारित करण्याची तरतूद आहे. उक्त कलम १५४ च्या पोट- कलम ( १अ) मध्ये, त्याखाली नमूद केलेले घटक लक्षात घेऊन , आयुक्ताकडून मालमत्ता कर आकारणीयोग्य असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य निश्चित करण्याची तरतूद आहे . त्याच्या पोट - कलम ( १क ) मध्ये अशी तरतूद आहे की, उक्त कलम १५४ च्या पोट- कलम ( १ अ ) अन्वये निश्चित केलेल्या कोणत्याही इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मूल्यात, दर पाच वर्षांनी सुधारणा करण्यात येईल आणि २०२०-२०२१ या वर्षामध्ये अशी सुधारणा करणे नियत आहे.
२. कोविड-१ ९ या सार्वत्रिक साथरोगाचा फैलाव झाल्यामुळे , राज्य शासनाकडून तसेच केंद्र सरकारकडून टाळेबंदी घोषित करण्यात आलेली आहे, त्यामुळे लघुउद्योग , शैक्षणिक संस्था, विकास कामे, कारखान्यातील कामकाज , विविध औद्योगिक क्षेत्रे , दैनंदिन कार्ये, इत्यादींवर प्रतिकूल आर्थिक परिणाम झालेला आहे . म्हणून, विविध मालकांनी , संस्थांनी व लोकप्रतिनिधींनी मालमत्ता करातून सूट देण्यासाठी किंवा त्याबाबतीत सवलत मिळण्याकरिता मुंबई महानगरपालिकेकडे निवेदने केली आहेत . मुंबई महानगरपालिकेने, उक्त अधिनियमाच्या कलम १५४ मध्ये नवीन पोट- कलम ( १ड ) समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यानुसार, त्यामध्ये,-
(एक) पोट-कलम (१ अ) अन्वये निश्चित केलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य २०२०-२१ या वर्षात सुधारित करण्यात येणार नाही;
(दोन) कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे मालमत्ता कर देयक , २०१९ -२०२० या वर्षी जे होते तेच २०२०-२०२१ या वर्षासाठी असेल;
(तीन) पोट-कलम ( १ अ ) अन्वये निश्चित केलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य, जणू काही त्यात २०२०-२१ या वर्षात सुधारित केली आहे असे समजून , २०२१-२२ या वर्षी सुधारित करण्यात येईल; आणि
(चार ) यासंबंधातील पुढील सुधारणा , २०२५-२०२६ या वर्षी करण्यात येईल ,
अशी तरतूद करणारे नवीन पोट - कलम ( १ड) त्यात जादा दाखल करून , त्याद्वारे कलम १५४ मध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट वाटते .
३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम ( १८८८ चा ३ ) यात आणखी सुधारणा करण्याकरिता , महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे , अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे , म्हणून , हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई ,
भगत सिंह कोश्यारी,
दिनांक १२ नोव्हेंबर २०२० .
महाराष्ट्राचे राज्यपाल .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
महेश पाठक ,
शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , २१ - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI ४०० ००४ AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINT- ING , STATIONERY AND PUBLICATIONS , २१ -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI ४०० ००४ EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .