RNI No. MAHBIL /2012 /46121
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६ , अंक ४२ ] गुरुवार , नोव्हेंबर १ ९ , २०२०/ कार्तिक २८ , शके १ ९ ४२ [पृष्ठे २ , किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ६२
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
जाहीर सूचना
(मुंबई महानगरपालिका अधिनियम , १८८८ च्या कलम १६० अन्वये सन २०२०-२१ सालाकरिता जाहीर सूचना) क्रमांक कवसं/ २१८४ /एमसी / ६२४/ सांख्यिकी/ २०२०-२१ , दिनांक १८ नोव्हेंबर २०२०
मुंबई महानगरपालिका अधिनियम , १८८८ च्या कलम ६८ अन्वये महानगरपालिका आयुक्तांनी प्रत्यायोजित केलेल्या अधिकारानुसार निम्नस्वाक्षरीकार कलम १६० अन्वये अशी सूचना देत आहेत की, सदर अधिनियमाच्या कलम १५६ नुसार २०२०-२०२१ या वर्षाकरिता नोंदींचे काम हे व्यवहारतः पूर्ण करण्यात आलेले असून संगणकीकृत करनिर्धारण पुस्तक संबंधित सहाय्यक करनिर्धारक व संकलक यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते दिनांक १४ डिसेंबर २०२० पर्यंत निरीक्षणार्थ उपलब्ध असेल.
सदरहू अधिनियमातील कलम ५२३ ( ३ ) समवेत वाचण्याच्या कलम १६२ ( १ ) अन्वये यापुढे असे सूचित करण्यात येते की, डिजिटल स्वरूपातील करनिर्धारण पुस्तकामधील भांडवलीमूल्याच्या विरुद्ध तक्रारींचे अर्ज दाखल करावयाचे असतील तर अशा तक्रारी संबंधित सहाय्यक करनिर्धारक व संकलक यांच्या कार्यालयात दिनांक १४ डिसेंबर २०२० पर्यंत स्वीकारण्यात येतील . अशा तक्रारी खुद्द मालमत्ताधारकाने अथवा त्याने मुखत्यारपत्राव्दारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने दाखल करणे आवश्यक आहे . तसेच कलम १६३ ( २ ) मध्ये विहित केल्यानुसार तक्रार अर्जात ज्या मुद्यांवर मूल्यांकनाविरुद्ध तक्रार करण्यात येत आहे याचा तपशील संक्षिप्त स्वरूपात मांडणे आवश्यक आहे .
भांडवली मूल्याच्या विरुद्धच्या तक्रार अर्जाची करनिर्धारक व संकलक यांच्या कार्यालयात सादर केल्याची लेखी पोहोचपावती अर्जदारास सादर करता न आल्यास अशा तक्रार अर्जाबाबत करनिर्धारक व संकलक जबाबदार असणार नाहीत . डाक सेवेद्वारे पाठविलेल्या तक्रारी विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास त्यांचा विचार करण्यात येणार नाही .
सुनिल मु. धामणे ,
सह आयुक्त (क.व.सं) , बृहन्मुंबई महानगरपालिका.
करनिर्धारण व संकलन खाते,
महानगरपालिका मुद्रणालय,
३ रा मजला , ५४६ , ना . म . जोशी मार्ग ,
भायखळा ( प) , मुंबई ४०० ०११ ,
दिनांक १७ नोव्हेंबर २०२० .
PRO/1069/ADV/2020-21
भाग दोन - ६२-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर १ ९ , २०२० / कार्तिक २८ , शके १ ९ ४२
MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
Notice
(Public Notice Under Sec . 160 of the MMC ACT, 1888 for the year 2020-21 ) No. A and C/ 2184/MC/624/STAT, dated the 18th November 2020
Under the powers delegated to the undersigned by the Municipal Commissioner for Greater Mumbai , as per section 68 of the Mumbai Municipal Corporation Act , notice as required by section 160 of the Mumbai Municipal Corporation Act is hereby given that the ward Capital Valuation entries required by sec . 156 for the year 2020-2021 have been completed , as far as practicable , and that the digital assessment book will be available for inspection at the office of the Asstt . Assessor and Collector in the respective wards on working days between 20th November 2020 to 14th December 2020.
In pursuance of section 162( 1 ) read with section 523 ( 3) of the act , it is further notified that complaints against the Capital Values entered in the digital assessment book will be received in the office of the Asstt . Assessor and Collector of respective wards up to 14th December 2020. Such complaints must be made inwriting by the property owners themselves or by the persons duly authorized by them under a power of attorney . The complaints should contain all the facts on which the valuation is complained against as required by section 163 (2) of the Act .
The Assessor and Collector will not be responsible for the non - receipt of any complaint in his office unless the parties complaining produce proper acknowledgements from the department concerned. The complaints received by post after due date will not be considered .
SUNIL M. DHAMNE ,
JointMunicipal Commissioner ( A. and C. ) , Municipal Corporation of Greater Mumbai .
Assessment and Collection Dept. ,
Municipal Printing Press ,
3rd Floor , 546 , N.M. Joshi Marg ,
Byculla ( W. ) , Mumbai 400 011 ,
Dated 17th November 2020 .
PRO / 1069/ADV/2020-21
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .