Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV B - Extra No 278

Published 24 November 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक ११४] मंगळवार, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २७८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.११३/गृनिभू.—महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाया सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "उप भू-व्यवस्थापक" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाया नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्िंतच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि. १० डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.

२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्ितकडून ज्या हरकती वा सुचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सुचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

सेवा प्रवेश नियमाचा मसुदा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.११३/गृनिभू.—महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाया सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "उप भू-व्यवस्थापक" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:–

१. या नियमांना,महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "उप भू-व्यवस्थापक" (सेवा प्रवेश) नियम, २०२० असे म्हणावे.

२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, –

(अ) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.

भाग चार-ब-२७८-१ (१)

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२०/आग्रहायण ३, शके १९४२

(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.

(क) "विभाग" म्हणजे महाराष्ट्र शासनाचा गृहनिर्माण विभाग असा आहे.

३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "उप भू-व्यवस्थापक" या पदावरील नियुक्ती, महसूल विभागातील उपअधिक्षक, भूमी अभिलेख किंवा तहसीलदार, भूमि अभिलेख किंवा समकक्ष पदावरील उमेदवारांमधून शासनाच्या प्रतिनियुक्ती धोरणानुसार तसेच विभागाने वेळोवेळी शासन निर्णय/ परिपत्रक/ आदेश इत्यादी अन्वये विहित केलेल्या प्रतिनियुक्तीच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागाकडून अथवा कार्यालयाकडून या पदावर गृहनिर्माण विभागाच्या मान्यतेशिवाय/संमतीशिवाय परस्पर नियुक्ती देता येणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा.कों.धनावडे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२०/आग्रहायण ३, शके १९४२ ३

गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.११३/गृनिभू.—महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाया सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक भू-व्यवस्थापक" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाया नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्िंतच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि. १० डिसेंबर, २०२० रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.

२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्ितकडून ज्या हरकती वा सुचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सुचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

सेवा प्रवेश नियमाचा मसुदा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.११३/गृनिभू.—महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाया सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक भू-व्यवस्थापक" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:–

१. या नियमांना,महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील "सहायक भू-व्यवस्थापक" (सेवा प्रवेश) नियम, २०२० असे म्हणावे.

२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, –

(अ)"शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.

(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.

(क) "विभाग" म्हणजे महाराष्ट्र शासनाचा गृहनिर्माण विभाग असा आहे.

३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "सहायक भू-व्यवस्थापक" या पदावरील नियुक्ती, महसूल विभागातील नायब तहसिलदार किंवा या पदांना समकक्ष पदावरील उमेदवारांमधून शासनाच्या प्रतिनियुक्ती धोरणानुसार तसेच विभागाने वेळोवेळी शासन निर्णय/ परिपत्रक/ आदेश इत्यादी अन्वये विहित केलेल्या प्रतिनियुक्तीच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागाकडून अथवा कार्यालयाकडून या पदावर गृहनिर्माण विभागाच्या मान्यतेशिवाय/संमतीशिवाय परस्पर नियुक्ती देता येणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा.कों.धनावडे, शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.