Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी सोलापूर यांजकडील अधिनियम, 2013 मधील कलम 19 (1) खालील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (2) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-2020 साठी कायदा व सुव्यवस्थेबाबतचा आदेश. (3) जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांजकडील शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक-2020 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखणेबाबतची आदेश. (4) जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, प्राधिकरण सांगली यांजकडील जिल्ह्यातील साथरोग संदर्भातील प्रतिबंधात्मक आदेश. (5) उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, पाटण यांजकडील महाराष्ट्र प्रकल्पलाभ व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, 1986 चे कलम 11 (1) ची अधिसूचना. (6) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी निर्मूलन आदेश (पूर्व सूचना). (7)जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-3 करिता मौजे माण, तालुका मुळशी येथील संपादित होणाऱ्या जमिनींची कलम 19 खालील अधिसूचना प्रसिद्धीबाबत. (8) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे यांजकडील विधानपरिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक-2020 बाबतीत आदेश. (9) पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील पुणे शहराकरिता प्रतिबंधात्मक आदेश. (10) (अ) उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), पुणे, (ब) सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (11) महापालिका उपायुक्त (मिरज), सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेला प्रतिबंधात्मक आदेश.

Published 26 November 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.