Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex. 290) (Dated 2nd December 2020) (नगरविकास विभाग) अधिसूचना (महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम) (क्रमांक लामनपा-1016/प्र.क्र.113/नवि-24

Published 02 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ६ , अंक ११८ ]

बुधवार, डिसेंबर २, २०२० / अग्र ११ , शके १ ९ ४२

[पृष्ठ १, किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक २ ९ ०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

नगरविकास विभाग

मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ डिसेंबर २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.

क्रमांक लामनपा-१०१६/प्र.क्र.११३ /नवि-२४ . ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम -४५७ ( ३ ) अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेमधील विविध पदांवर करावयाच्या नियुक्त्यांचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी " लातूर शहर महानगरपालिका सेवा ( सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम , २०१ ९ " हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम -४५६( अ ) व या अधिनियमातील लागू असलेल्या अन्य तरतुदीद्वारे मिळालेल्या शक्तींचा वापर करून , शासन अधिसूचना क्र. लामनपा २०१६ /प्र.क्र.११३ /नवि -२४ , दिनांक २ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये प्रसिद्ध केले आहेत , आणि

ज्याअर्थी , लातूर महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी ( राष्ट्रीय / राज्य आरोग्य कार्यक्रम व्यतिरिक्त/ जन्म - मृत्यू व विवाह नोंदणीसह ) या पदाकरिता " मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (M.B.B.S. ) " अशी शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे, आणि ज्याअर्थी , वैद्यकीय अधिकारी ( राष्ट्रीय / राज्य आरोग्य कार्यक्रम व्यतिरिक्त / जन्म- मृत्यू व विवाह नोंदणीसह ) या पदाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याबाबत लातूर शहर महानगरपालिकेने शासनास विनंती केली आहे , आणि

त्याअर्थी , शासन अधिसूचना दिनांक २ नोव्हेंबर २०१ ९ मधील परिशिष्ट ( २ ) मधील अनुक्रमांक ७७ वरील वैद्यकीय अधिकारी ( राष्ट्रीय / राज्य आरोग्य कार्यक्रम व्यतिरिक्त/ जन्म- मृत्यू व विवाह नोंदणीसह) या पदाकरिता " मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.B.B.S./B.A.M.S . (आयुर्वेद) पदवी. " अशी सुधारित शैक्षणिक अर्हता याद्वारे निश्चित करण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

कैलास बधान , शासनाचे उप सचिव.

भाग चार- ब -२९०-१

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.