Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V Ext. 41 (L. A. Bill No. L) 14-12-2020

Published 14 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/40124

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ६, अंक १३ (७ )] सोमवार , डिसेंबर १४ , २०२०/ अग्रहायण २३, शके १९ ४२ [पृष्ठे ४ , किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ४१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक १४ डिसेंबर , २०२० रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे: -

L. A. BILL No. L OF 2020 .

A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PUBLIC UNIVERSITIES ACT , 2016 .

सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. ५० .

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम , २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

२०१७ चा आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाराष्ट्र सार्वजनिक महा . ६. विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक २०२० चा ८ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ ( दुसरी सुधारणा ) अध्यादेश , २०२० प्रख्यापित केला होता ; महा.

अध्या . २१ .

(१)

भाग पाच ४१-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग पाच , डिसेंबर १४ , २०२०/ अग्रहायण २३ , शके १ ९ ४२

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी , याद्वारे , पुढील अधिनियम करण्यात येत आहे : -

१. या अधिनियमास , महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) अधिनियम , २०२० असे म्हणावे .

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२ ) तो, दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

२०१७ चा महा . ६ .

२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम , २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम असा केला आहे) याच्या कलम १० ९ मधील, -

सन २०१७ चा अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १० ९ ची सुधारणा .

( १ ) पोट - कलम (३ ) मध्ये, खंड ( घ) मधील दुसऱ्या परंतुकानंतर , पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईलः -

" परंतु आणखी असे की, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी अर्ज करण्याचा , अधिष्ठाता मंडळाकडून अर्जाची छाननी करणे व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य शासनाकडे पाठविण्याचा आणि राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचा दिनांक, २०२०-२०२१ या वर्षासाठी , वाढविण्याच्या दृष्टीने , यातील तक्त्याच्या स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, पोट- कलम ( ३ ) च्या खंड (क) , ( ग) व ( घ) मध्ये विनिर्दिष्ट केलेला दिवस किंवा दिनांक हे , उक्त तक्त्याच्या स्तंभ ( ३ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे वाचण्यात येतीलः -

खंड

(१)

विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (२)

२०२१-२२ या वर्षासाठी तरतूद केलेला दिवस किंवा दिनांक (३)

(क)

३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी.

ज्यावर्षी इरादा पत्र मागवले असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या

शेवटच्या दिवसापूर्वी.

२८ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी.

(ग) ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी.

१५ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी . " ;

(घ) लगतनंतरच्या वर्षाच्या ३१ जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी.

( २ ) पोट - कलम ( ४ ) मध्ये, खंड ( क) नंतर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :

" परंतु , २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून , नवीन अभ्यास पाठ्यक्रम , विषय , विद्याशाखा , अतिरिक्त तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याकरिता परवानगी मागणाऱ्या व्यवस्थापनास , ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी कुलसचिवाकडे अर्ज करता येईल. ".

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १४ , २०२०/ अग्रहायण २३ , शके १ ९ ४२

२०२० चा ३ . ( १ ) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ ( दुसरी सुधारणा) अध्यादेश , २०२० हा , याद्वारे , निरसित करण्यात महा.

येत आहे .

अध्या. २१ .

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २१ याचे निरसन व व्यावृत्ती.

( २ ) असे निरसन झाले असले तरी , उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही ( काढलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह ) ही , या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या, मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती , कार्यवाही किंवा यथास्थिति , काढलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच , डिसेंबर १४ , २०२० /अग्रहायण २३ , शके १ ९ ४२

उद्देश व कारणे यांचे निवेदन .

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम , २०१६ ( २०१७ चा महा . ६ ) याच्या कलम १० ९ मध्ये, नवीन महाविद्यालय किंवा नवीन पाठ्यक्रम , विषय , विद्याशाखा, तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याकरिता परवानगी देण्याच्या कार्यपद्धतीची तरतूद आहे . उक्त कलम १० ९ च्या पोट - कलम (३ ) च्या खंड ( क) मध्ये अशी तरतूद आहे की, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी इरादा पत्र मागणारे व्यवस्थापन, ज्यावर्षी इरादा पत्र मागवले असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी कुलसचिवाकडे विहित नमुन्यात अर्ज करील. उक्त पोट- कलम ( ३ ) च्या खंड (ग ) मध्ये अशी तरतूद आहे की , विहित केलेल्या कालमर्यादेत प्राप्त झालेल्या अर्जाची , अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते अर्ज , ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील. त्याच्या खंड ( घ) मध्ये अशी तरतूद आहे की, राज्य शासनास , विद्यापीठाच्या शिफारशीनंतर , लगतनंतरच्या वर्षाच्या ३१ जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी इरादा पत्र देता येईल . त्याचप्रमाणे , कलम १० ९ च्या पोट- कलम ( ४ ) च्या खंड ( क) मध्ये अशी तरतूद आहे की , नवीन अभ्यास पाठ्यक्रम , विषय , विद्याशाखा , अतिरिक्त तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मागणारे व्यवस्थापन, ज्या वर्षी परवानगी मागितली असेल त्या वर्षाच्या अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी कुलसचिवाकडे अर्ज करील.

२. कोरोना विषाणूच्या (कोविड-१ ९ ) प्रादुर्भावामुळे , नवीन महाविद्यालय किंवा नवीन पाठ्यक्रम , विषय , विद्याशाखा , अतिरिक्त तुकडी किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची कार्यपद्धती , विहित कालावधीत पार पाडता येऊ शकली नाही आणि याकरिता , संबंधित शैक्षणिक वर्षासाठी, नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे इष्ट आहे असे वाटले . या प्रयोजनासाठी,-

(क) उच्च शिक्षणविषयक नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी अर्ज करण्याचा दिनांक;

(ख) अधिष्ठाता मंडळाने अर्जाची छाननी करण्याचा आणि व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने तो राज्य शासनाकडे पाठविण्याचा दिनांक;

(ग) राज्य शासनाने इरादा पत्र देण्याचा दिनांक , आणि

(घ) नवीन अभ्यास पाठ्यक्रम , विषय , विद्याशाखा , अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाइट केंद्रे सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्याचा दिनांक ;

यांचे नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणेकरिता , उक्त कलम १० ९ मध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट वाटले .

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी , महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ ( २०१७ चा ६ ) यात आणखी सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती , म्हणून , त्यांनी दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ ( दुसरी सुधारणा ) अध्यादेश , २०२० ( २०२० चा महा . अध्या. २१ ) प्रख्यापित केला होता.

४. उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे हा या विधेयकाचा हेतू आहे .

उदय सामंत,

मुंबई ,

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री .

दिनांक ११ डिसेंबर , २०२० .

विधान भवन :

राजेन्द्र भागवत,

मुंबई,

सचित,

महाराष्ट्रविधानसभा .

दिनांक १४ डिसेंबर , २०२० .

AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY

RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD ,

PUBLICATIONS , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.