Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt. II Ext. No. 72, (22/12/2020) क्रमांक मऔविम/आय.आय.ए./लॉजिस्टिक पार्क)/C21343/2020

Published 22 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ १

RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ६, अंक ५०(२)] मंगळवार, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ [पृष्ठे ९, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ७२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र् औेद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

क्रमांक मऔविम/आय.आय.ए./(लॉजिस्टिक पार्क)/C२१३४३/२०२०

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

ज्याअर्थी, शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र.म.औ.धो. १९१६/प्र.क्र.२२१/उद्योग-२, दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ अन्वये महाराष्ट्राचे लॉजिस्टिक पार्क (Logistics Park) धोरण-२०१८ जाहीर करणेत आले. (यापुढे उक्त धोरण असे नमूद केले आहे.)

आणि ज्याअर्थी, उक्त धोरणानुसार राज्यात एकात्मिक लॉजिस्टिक पार्कच्या विकासनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ४३-(१ब) नुसार महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसुचनेद्वारे " एकात्मिक औद्योगिक क्षेत्र " म्हणून अधिसूचित करता येईल आणि अशी अधिसूचना काढल्यावर, महामंडळ हे, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्राधिकरण होईल ;

आणि ज्याअर्थी, मे. डीबीजी इस्टेट्स प्रा.लि. यांनी अर्जान्वये प्रस्तावित मौजे. बापगांव व लोनाड, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क म्हणून घोषित करण्याची महामंडळास विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या १२० व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मे. डीबीजी इस्टेट्स प्रा.लि. यांचे प्रस्तावित मौजे. बापगांव व लोनाड, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क विकासाला सहमती दर्शविली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आय.डी.सी. २०२०/प्र.क्र.४०१/उद्योग-१४, दिनांक २७ ऑक्टोबर २०२० व दुरूस्ती दिनांक १० नोव्हेंबर २०२०, अन्वये मौजे. बापगांव व लोनाड, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील ४४.८०२ हे.आर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम २ खंड (ग) अन्वये "औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

(१)

भाग दोन--- ७२----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ त्याअर्थी, शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन-२०१३ चा सुधारणा अधिनियम, १५) च्या कलम४३ खंड-(१ब) अन्वये महामंडळास प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन मी, डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याद्वारे उपरोक्त अधिसूचित झालेल्या मौजे. बापगांव व लोनाड, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील खालील अनुसुचीत उल्लेखिलेल्या औद्योगिक खाजगी क्षेत्रास " एकात्मिक औद्योगिक क्षेत्र (लॉजिस्टिक पार्क)" म्हणून घोषित करीत आहे.

उक्त अधिसूचनेची प्रत व सोबत स्थळ निश्चिती चतुःसीमा दर्शविलेला नकाशा हा या अधिसूचनेचा भाग समजण्यात यावा. तसेच सदर अधिसूचना ही महामंडळाचे www.midcindia.org या वेबसाईट वर उपलब्ध असेल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ ३

भाग दोन--- ७२---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ ५

मुंबई, दिनांक २१ डिसेंबर २०२०.

डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.

भाग दोन--- ७२---२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking)

No. MIDC/IIA (Logistic Park) C21343 /2020

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

Whereas, Maharashtra Logistic Park Policy 2018 has been published by Government in Industries, Energy and Labour Department vide its Notification No. 1916/C.R.221/Industry-2, dated 14th February, 2018 (Herein referred as the said Policy) ;

And whereas, as per the said Policy, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) is declared as the Special Planning Authority for the development of Integrated Logistics Parks across the State.

And whereas, as per section 43-(1B) of Maharashtra Industrial Development Act,1961, that subject to the general or specific directions of the State Government, the Corporation may, by notification in the Official Gazette, notify any industrial area as the Integrated Industrial Area and upon such notification, the Corporation shall become the Special Planning Authority for such Integrated Industrial Area under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ;

And whereas, M/s. DBG ESTATES PVT. LTD. made an application requesting MIDC to notify their proposed project area in Village-Bapgaon & Lonad, Taluka Bhiwandi, District Thane as Integrated Logistic Park ;

And whereas, the High Power Committee in its 120th meeting held on 24 January 2020 has approved the proposal of an Integrated Logistics Park proposed to be developed by, M/s. DBG ESTATES PVT. LTD. Village - Bapgaon and Lonad, Taluka - Bhiwandi, District - Thane ;

And whereas, vide its, Notification No.IDC-2020/CR 401/Ind-14, dated-28th October 2020 & Amendment dated 10th November 2020 of Industries Energy & Labour Department, Government of Maharashtra declared 44.802 Ha area of Village-Bapgaon & Lonad, Taluka Bhiwandi, District- Thane to be an 'Industrial Area' under clause (g) of section 2 of Maharashtra Development Act 1961.

Now therefore in exercise of powers conferred under clause (1B) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.XV of 2013), I, Dr. P. Anbalagan, hereby notify the area at Village-Bapgaon & Lonad, Taluka-Bhiwandi, District- Thane. as per appended schedule as 'Integrated Industrial Area' (Logistic Park) ;

A copy of this Notification and plan showing boundaries shall form part of this Notification.

The Notification is made available on the website of MIDC. www.midcindia.org.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ ७

1.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२० / पौष १, शके १९४२ ९

DR. P. ANBALAGAN,

Chief Executive Officer, Mumbai, dated the 21st December 2020. Maharashtra Industrial Development Corporation.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.