RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ४२] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ [पृष्ठे १२, किंमत : रुपये १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांजकडून
मनाई आदेश
क्रमांक कोरोना/मनाई आदेश/४१५१/२०२०.— ज्याअर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, नवी मुंबई शहरात गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणू (COVID19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७, दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतूदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय भारत सरकार आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र शासन आदेश संदर्भ क्र. १ व २ अन्वये महाराष्ट्र शासन व वने आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन मंत्रालय अधिसूचना जारी करून लॉकडाऊन आदेशाची मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पयर्ंत वाढविली होती. त्याअनुषंगाने वरील संदर्भ क्र. ३, अन्वये सदरची मुदत दिनांक ३१ डिसेंबर २०२० पयर्ंत वाढविण्यात आली असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात संदर्भ क्र. ४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला होता. परंतु संदर्भ क्र. २ अन्वये महाराष्ट्र शासनाने अटी व शर्तीचे पालन करुन दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी पासून धर्ामिक स्थळे खुली करण्याकरिता दिलेल्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका होऊ नये. याकरिता प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (३) प्रमाणे खालील तरतुदीच्या अनुषंगाने जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून आदेश काढणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग - १ मध्ये उप विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक. ३ मधील पान क्र. ४ मधील फौजदारी दंड प्रकिया संहिता १९७३ चा क्र. एमएससी १२७४/फि-एफ मधील आदेशाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा II) चे कलम २१ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करून कलम १४४ चे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत.
त्याअर्थी, मी, डॉ. जय जाधव, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे प्राधिकृत अधिकारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई आदेश परिच्छेद क्र. ५ मधील नमूद सूचनांच्या अधीन राहून दिनांक १ डिसेंबर २०२० रोजीचे ००-०१ वा. पासून दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजीचे २४-०० वा. चे दरम्यान खालीलप्रमाणे मनाई आदेश लागू करीत आहे :----
(१) प्रतिबंधित क्षेत्रातील धर्ामिक स्थळे तूर्त बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील बाहेरील धर्ामिक स्थळे उघडण्यास परवानगी असेल.
(२) ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच १० वर्षाखालील लहान मुलांना धर्ामिक स्थळांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये.
(३) कोणतीही व्यक्ती मंदिरात व परिसरात मास्कशिवाय प्रवेश करणार नाही.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ (४) मंदिर परिसरात थुंकण्यास सक्त मनाई राहील.
(५) कोणत्याही व्यक्तीला मंदिरात प्रवेश देताना हाताची स्वच्छता (Sanitizer Dispenser) आणि त्याचे तापमान तपासल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये.
(६) बुटे व पादत्राणे शक्यतो आपआपल्या वाहनात ठेवावी किंवा ती स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था करावी.
(७) वाहने पार्किंगचे ठिकाणी व बाहेर गर्दीचे व्यवस्थापन करावे तसेच शारिरीक अंतर राखण्याची दक्षता घ्यावी.
(८) मंदिर आवाराच्या बाहेरील दुकाने, स्टॉल येथे गर्दी होणार नाही व शारिरीक अंतर राखले जाईल.
(९) दर्शन घेण्याया भाविकांच्या रांगा लावताना किमान दोन व्यक्तीमध्ये ६ फुटाचे शारीरिक अंतर राखावे.
(१०) कोरोना रोगाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता एकत्र जमून भक्ती गीत, भजन, किर्तन गाणारे यांना परवानगी देण्यात येऊ नये.
(११) धर्ामिक स्थळांवर सामुदायिक स्वयंपाक घर/अन्नदान करताना शारिरीक अंतर बाळगणे आवश्यक आहे.
(१२) धर्ामिक व्यवस्थापनाने नियमीत स्वच्छता आणि निजर्ंतुकीकरण करावे.
(१३) धर्ामिक ठिकाणी पूजा अर्चा करणारे कर्मचारी यांची कोविड १९ च्या सुरक्षेसाठी आठवडयातून एकदा चाचणी करणे आवश्यक आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल.
उपरोक्त धर्ामिक स्थळांचे व्यवस्थापक यांना आदेशापूर्ती स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन सहायक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त कार्यालये यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदरचा आदेश माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी दिलेला आहे.
डॉ. जय जाधव, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ ३पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांजकडून
मनाई आदेश
क्रमांक कोरोना/मनाई आदेश/४१५०/२०२०.— ज्याअर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, नवी मुंबई शहरात गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणू (COVID19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय भारत सरकार आरोग्य मंत्रालय, व महाराष्ट्र शासन आदेश संदर्भ १,२ अन्वये अधिसूचना जारी करून लॉकडाऊन आदेशाची मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पयर्ंत वाढविण्यात आली होती. परंतू, संदर्भ क्र ३ अन्वये सदरची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यत वाढविण्यात आलेली आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संपर्कात लोकांनी येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक होत असल्याची माझी खात्री झालेली आहे. त्याकरीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१)(३) खालील तरतुदीच्या अनुषंगाने जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून आदेश काढणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग - १ मध्ये उप विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक. ३ मधील पान क. ४ मधील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चा क्र. एमएससी १२७४/फि-एफ मधील आदेशाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३(II१९७४) चे कलम २१ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करून कलम १४४ चे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत.
त्याअर्थी मी डॉ. जय जाधव, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे प्राधिकृत अधिकारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई आदेश परिच्छेद क्र. ५ मधील नमूद सूचनांच्या अधिन राहून दिनांक १ डिसेंबर २०२० रोजीचे ००-०१ वा. पासून दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजीचे २४-०० वा. चे दरम्यान ३१ दिवसांकरीता खालील बाबींना प्रतिबंध करण्यात येत आहे.
१. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, खाजगी शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. परंतु ऑनलाईन/डिस्टन्स् लर्निंग यांस परवानगी देण्यात येत असून, सदर कृत्यास प्रोत्साहित करावे.
२. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळुन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे जलतरण तलावासाठी क्रिडा व युवा विभाग यांच्याकडील नियमावलीचे अधिन राहुन परवानगी राहील.
३. प्रतिबंधित क्षेत्र वगळुन महानगरपालिका व स्थानिक प्रशासन यांनी लागू केलेल्या नियमावलीच्या अधिन राहुन सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाटयगृहे हे ५०% बसण्याच्या क्षमतेने सुरू करता येतील. परंतू, खाद्य पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे.
४. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रिडाविषयक, करमणुकविषयक, वर्ाषिक स्नेहसंम्मेलन, सांस्कृतिक व धर्ामिक कार्यक्रम. तसेच खुप मोठया प्रमाणात लोक एकत्र जमुन सादर करण्याचे कार्यक्रम.
परंतु राज्य शासनाचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1, dated the 29th July 2020 मधील अटी व शर्तीच्या अधिन राहुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नमूद करण्यात आलेल्या खालील आस्थापना दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी पासून सुरू करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
(१) खुल्या जागेतील सांघिक खेळ वगळून गोल्फ कोर्ट,फायरिंग बट (Outdoor firing Rang), खुल्या जागेतील व्यायामशाळा, टेनिस, बॅडमिंटन व मल्लखांब इ.
(२) बार्बर शॉप (केशकर्तनालय), स्पा, सलुन्स्, ब्युटी पार्लरस् या आस्थापना राज्य शासनाचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/ DMU-1, dated the 25th June 2020 अन्वये अटी व शर्थीचे पालन करून सुरू राहतील.
(३) ऑटो रिक्षामध्ये चालक व्यतिरिक्त दोन प्रवासी (१+२), टॅक्सीमध्ये चालक व्यतिरिक्त तीन प्रवासी (१+३) तसेच मोटर सायकल वाहनावर (१+१ हेल्मेट व फेसमास्कसह) तसेच खाजगी चारचाकी वाहनामध्ये चालक व्यतिरिक्त तीन प्रवासी (१+३) यांना अटी व शर्तीच्या अधिन राहुन अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करता येईल. प्रवासाच्या वेळी संबंधितांनी फेसमास्क वापरणे बंधनकारक आहे.
(४) जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकरिता जवळच्या मार्केटमध्ये जाण्याची मुभा असेल परंतु अनावश्यक लांबच्या प्रवासास मनाई राहील.
त्याचप्रमाणे राज्य शासनाचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1, dated the 31st August 2020 मधील अटी व शर्तीच्या अधिन राहुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नमूद करण्यात आलेल्या खालील आस्थापना सुरू करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
(१) अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व आस्थापना या वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरू राहतील.
तसेच दारु विक्रीची दुकाने सुरू राहतील.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२(२) आंतरजिल्हा प्रवासी तसेच मालवाहतुक. त्याचप्रमाणे शेजारील देशांसोबत झालेल्या व्यावसायिक कराराच्या अनुषंगाने मालवाहतुक यांस परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी E-PASS ची अट रद्द करण्यात येत आहे.
(३) खाजगी बस/मिनीबस व इतर वाहनांद्वारे प्रवासी वाहतुक यांस परवानगी देण्यात येत आहे. परंतु या संदर्भात मा. आयुक्त, ट्रान्सपोर्ट विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडुन काढण्यात येणाया निर्देशांचे पुर्णपणे पालन करणे बंधनकारक आहे.
(४) खुल्या जागेतील शारिरीक कवायत/व्यायाम. (५) नागरिकांनी इतर अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी घराबाहेर जाताना सुध्दा फेसमास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे व वैयक्ितक स्वच्छता पाळणे बंधनकारक आहे.
त्याचप्रमाणे राज्य शासन आदेश क्रमांक DMU/2020/CR.92/Dis M-1, dated the 30th September 2020 मधील अटी व शर्थीच्या अधीन राहून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नमूद करण्यात आलेल्या खालील आस्थापना या महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व अटींचे पालन करून दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी पासुन सुरू करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
(i) हॉटेल्स/फुडकोर्टस्/रेस्टॉरन्ट आणि बार या आस्थापना त्यांच्या एकुण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. (ii) मुंबई महानगर क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तूंशिवाय इतर वस्तूंचे उत्पादन करणाया सर्व औद्योगिक आस्थापना सुरू राहतील.
त्याचप्रमाणे राज्य शासन आदेश कमांक DMU/2020/CR.92/DisM-1, dated the 14th October 2020 मधील अटी व शर्थीच्या अधीन राहून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील खालील नमूद आस्थापना या महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व अटींचे पालन करून दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी पयर्ंत
(i) शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक आणि कोचींग क्लासेस या संस्था दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी पयर्ंत बंद राहतील. नमूद संस्थांमधील शिक्षक व इतर कर्मचारी ऑनलाईन शिक्षण/ऑनलाईन समुपदेशनासाठी ५० टक्के पेक्षा अधिक संख्येने हजर राहणार नाहीत. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे पालन केले जाईल.
(ii) कौशल्य किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देणाया राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ अथवा राज्य कौशल्य विकास अभियान अथवा भारत सरकार अथवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था सुरू राहतील. तसेच राष्ट्रीय उद्योजकता आणि व्यावसायिक लघु व्यवसाय विकास संस्था तसेच भारतीय उद्योजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांनादेखील परवानगी असेल. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे पालन केले जाईल.
(iii) उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/दुरस्थ शिक्षणाला परवानगी देण्यात आलेली आहे. पीएचडी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाया विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील पदव्युत्तर विद्याथ्यार्ंना प्रयोग शाळेतील प्रायोगिक कामांची परवानगी देण्यात आलेली आहे. (iv) सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालये, उच्च शिक्षण व तांत्रिक विभाग यांना देण्यात आलेल्या निर्देशानुसार सुरू राहतील. (v) बिजनेस टु बिजनेस प्रदर्शने ही वाणिज्य विभाग, भारत सरकार यांनी देण्यात आलेल्या निर्देशानुसार सुरू राहतील. (vi) स्थानिक आठवडे बाजार ( जनावरांसह ) हे महानगरपालिका, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार सुरू राहतील. (vii) गर्दीवर नियंत्रण ठेवणे/गर्दी कमी करणे या उद्देशाने बाजारपेठा/दुकाने सकाळी ९:०० ते रात्री ९:०० वा. पयर्ंत चालु राहतील. (viii) लग्न समारंभाकरीता ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी असणार नाही. (ix) अत्यंविधीकरीता २० पेक्षा जास्त लोकांना परवानगी असणार नाही.
तसेच महाराष्ट्र राज्य शासन परिपत्रक क्र. Corona 2020/Cr.No 486/Arogya-5, dated the 23rd October 2020 अन्वये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सुरू राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल.
उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्थापना मालक/चालक/ व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहायक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदरचा आदेश माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी दिलेला आहे.
डॉ. जय जाधव, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई.
नवी मुंबई, दिनांक ३० नोव्हेंबर २०२०.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ ५ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक रा.अ./४९३६/२०२०.----- श्रीमती एस. व्ही. घारगे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग यांची दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते दिनांक २२ नोव्हेंबर २०२० अशी एकूण ०३ दिवसांची वैद्यकीय रजा दिवाळीच्या सुट्टीस जोडून दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.पूर्वी पयर्ंत, कोविड-१९ च्या निर्देशांना अधिन राहून मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करणेत येत आहे.
तसेच सुट्टीवरून किंवा मुख्यालय सोडण्याची सुविधा उपभोगून परत आल्यानंतर आपली वैद्यकीय चाचणी करून तसा अहवाल रुजू होण्यापूर्वी प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांना त्वरित सादर करावा.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. व्ही. घारगे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग, म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. व्ही. घारगे, ह्य जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग, या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. व्ही. घारगे ह्य रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती ए. व्ही. मोहिते, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अलिबाग यांजकडे राहील.
अलिबाग, दिनांक २४ नोव्हेंबर २०२०.
विभा प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचना क्रमांक रा.अ./४९८५/२०२०.----- श्रीमती एस.एम. गाडे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर खालापूर यांची दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २२ नोव्हेंबर २०२० अशी एकूण ०३ दिवसांची र्अजित रजा, मागिल दिनांक १३ नोव्हेंबर २०२० ते दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजीच्या दिवाळी सुट्टीला जोडुन, कोविड-१९ च्या नियमांना अधिन राहुन मंजूर करणेत येत आहे.
तसेच सुट्टीवरून किंवा मुख्यालय सोडण्याची सुविधा उपभोगुन परत आल्यानंतर आपली वैदयकीय चाचणी करून तसा अहवाल रुजु होण्यापुर्वी प्रबंधक, जिल्हा न्यायालय,रायगड अलिबाग यांना त्वरीत सादर करावा.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती. एस. एम. गाडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, खालापूर येथे पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती. एस. एम. गाडे, ह्य जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, खालापूर या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती. एस. एम. गाडे, ह्य रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.पासून ते दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.नं.पयर्ंत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. पी. एम. माने, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर खालापूर यांजकडे राहील.
दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.नं.पासून ते दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.पुर्वीपयर्ंत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. व्हि. एस. धोंडगे, २रे ह दिवाणी न्यायाधीश क. स्तर खालापूर यांजकडे राहील.
अलिबाग, दिनांक २० नोव्हेंबर २०२०.
विभा प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ ७ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक रा.अ./५०१८/२०२०.----- श्री. अेे. अे. पांडे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल यांची दिनांक ३० नोव्हेंबर २०२० ते दिनांक ०५ डिसेंबर २०२० अशी ०६ दिवसांची र्अजित रजा, मागिल दिनांक २८ नोव्हेंबर २०२० व दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजीच्या सुट्टीस जोडुन, दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.पुर्वीपासून ते दिनांक ०६ डिसेंबर २०२० रोजीच्या का.वे.पुर्वीपर्यत, कोविड-१९ च्या निर्देशांना अधिन राहुन मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करणेत येत आहे.
तसेच सुट्टीवरून किंवा मुख्यालय सोडण्याची सुविधा उपभोगुन परत आल्यानंतर आपली वैदयकीय चाचणी करून तसा अहवाल रुजु होण्यापुर्वी प्रबंधक, जिल्हा न्यायालय,रायगड अलिबाग यांना त्वरीत सादर करावा.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. अेे. अे. पांडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. अेे. अे. पांडे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल, या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. अेे. अे. पांडे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.पुर्वीपासून ते दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे. पयर्ंत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. के. के. घुले, २रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर पनवेल यांजकडे राहील.
दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.नंतर पासून ते दिनांक ०६ डिसेंबर २०२० रोजीच्या का.वे. पुर्वीपयर्ंत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. ए. एस. सोनवलकर, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल यांजकडे राहील.
अलिबाग, दिनांक २६ नोव्हेंबर २०२०.
विभा प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचना क्रमांक रा.अ./५०६७/२०२०.----- श्री. आर. एस. भाकरे, सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, पनवेल, यांची दिनांक ०३ डिसेंबर २०२० ते ०५ डिसेंबर २०२० अशी ०३ दिवसांची र्अजित रजा, पुढील दिनांक ०६ डिसेंबर २०२० रोजीच्या सुट्टीला जोडुन, दिनांक ०२ डिसेंबर २०२० रोजीचे का.वे. नंतरपासून ते दिनांक ०७ डिसेंबर २०२० रोजीच्या का.वे.पुर्वीपर्यत, कोविड-१९ च्या निर्देशांना अधिन राहुन मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करणेत येत आहे.
तसेच सुट्टीवरून किंवा मुख्यालय सोडण्याची सुविधा उपभोगुन परत आल्यानंतर आपली वैदयकीय चाचणी करून तसा अहवाल रुजु होण्यापुर्वी प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांना त्वरीत सादर करावा.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. आर. एस. भाकरे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, पनवेल येथे पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. आर. एस. भाकरे, हे जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. आर. एस. भाकरे, हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. ए. यु. बहिर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, पनवेल यांजकडे राहील.
अलिबाग, दिनांक ३० नोव्हेंबर २०२०.
विभा प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ ९ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक रा.अ./५१०७/२०२०.----- श्री. व्ही. आर. डोईफोडे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड, यांचा दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते दिनांक २७ नोव्हेंबर २०२० अशी ०८ दिवसांची र्अजित रजा, मागिल दिनांक १३ नोव्हेंबर २०२०, ते दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजीच्या दिवाळी सुट्टीला व पुढील दिनांक २८ नोव्हेंबर २०२० व दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजीच्या सुट्टीला जोडुन, दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.नं.पासून ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजीच्या का.वे.पुर्वीपर्यत, कोविड-१९ च्या निर्देशांना अधिन राहुन मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पुर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. व्ही. आर. डोईफोडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. व्ही. आर. डोईफोडे हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. व्ही. आर. डोईफोडे हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
दिनांक २० नोव्हेंबर २०२० का. वे. पासून ते दिनांक २१ नोव्हेंबर २०२० का. वे. पूर्वीपर्यत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती. व्ही. आर.
कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, माणगांव यांजकडे राहील.
दिनांक २१ नोव्हेंबर २०२० का.वे. पासून ते दिनांक २५ नोव्हेंबर २०२० का.वे.पूर्वीपर्यत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती. अे. सी. रोकडे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, माणगांव, यांजकडे राहील.
दिनांक २५ नोव्हेंबर २०२० का.वे.पासून ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२० का.वे.पूर्वीपर्यत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती. व्ही. आर.
कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, माणगांव यांजकडे राहील.
अलिबाग, दिनांक २ डिसेंबर २०२०.
विभा प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचनाक्रमांक रा.अ./५०५४/२०२०.----- श्री. यु. एल. पाठक, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल, यांची दिनांक ०३ डिसेंबर २०२० ते ०७ डिसेंबर २०२० अशी ०५ दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०२ डिसेंबर २०२० रोजीच्या का.वे.नंतर पासून ते दिनांक ०८ डिसेंबर २०२० रोजीच्या का.वे. पूर्वीपयर्ंत, कोविड-१९ च्या निर्देशांना अधिन राहून, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
तसेच सुट्टीवरुन किंवा मुख्यालय सोडण्याची सुविधा उपभोगून परत आल्यानंतर आपली वैद्यकीय चाचणी करून तसा अहवाल रुजू होण्यापूर्वी प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांना त्वरीत सादर करावा.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. यु. एल. पाठक, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. यु. एल. पाठक हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते, तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. यु. एल. पाठक हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. ए. एम. मुजावर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल यांजकडे राहील.
अलिबाग, दिनांक ३० नोव्हेंबर २०२०.
विभा प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ ११सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
अधिसूचना अधिसूचनाक्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४३९/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नवकार काँम्प्लेक्स बिल्डींग नं. ५, को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., गट नं. १४५/ए/१, १४५/ए/२, १४५/बी/१, १४५/बी/२, व्हीलेज माकणे, सफाळे (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी.)/११०३/ २०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४३७/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नवकार काँम्प्लेक्स बिल्डींग नं. ७, को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., गट नं. १४५/ए/१, १४५/ए/२, १४५/बी/१, १४५/बी/२, व्हीलेज माकणे, सफाळे (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी.)/११०५/ २०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
अधिसूचना
अधिसूचना
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४४०/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नवकार काँम्प्लेक्स बिल्डींग नं. ६, को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., गट नं. १४५/ए/१, १४५/ए/२, १४५/बी/१, १४५/बी/२, व्हीलेज माकणे, सफाळे (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी.)/११०४/ २०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४३५/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सृष्टी समर्पण को. ऑप हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ४१०/५, ४११/२, ४११/६, ४११/७, ४११/८ व ८३१/१०, व्हीलेज माहीम, ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/ (पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी.)/११०६/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
अधिसूचना अधिसूचनाक्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४३४/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सृष्टी संकल्प को. ऑप हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ४१०/५, ४११/२, ४११/६, ४११/७, ४११/८ व ८३१/१०, व्हीलेज माहीम, ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/ (पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी.)/११०७/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४३८/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री रेसिडेन्सी को. ऑप हौसिंग सोसायटी लि., गट नं. ५२, हिस्सा नं. ३/१५, व्हीलेज करदळ, सफाळे (पूर्व), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी/ (टी.सी.)/११०९/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
अधिसूचना
अधिसूचना
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४३६/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सृष्टी स्वप्न को. ऑप हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ४१०/५, ४११/२, ४११/६, ४११/७, ४११/८ व ८३१/१०, व्हीलेज माहीम, ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/ (पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी.)/११०८/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./४३२/२०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, राधा-कृष्णा को. ऑप हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. १०२, हिस्सा नं. १/३ व २/१, बोईसर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी.)/ ११००/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ डिसेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.