Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Extra Ordinary Gazette No. 323 Dated 28th December 2020 गृहनिर्माण विभाग अधिसूचना क्र. सेप्रनि-2020-प्र.क्र. 113-गृनिभू.

Published 28 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक १३३] सोमवार, डिसेंबर २८, २०२० / पौष ७, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३२३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मु ंबई-३२, दिनांक २८ डिसेंबर, २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.११३/गृनिभू.— महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, शासनाने करण्याचे प्रस्तावित के लेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "भू-व्यवस्थापक, मु ंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ" या पदावरील सेवा प्रवेश नियम विनियमित करणाऱ्या नियमांचा पुढील मसुदा, उक्त अधिनियमाच्या कलम १८४ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तिंच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा शासनाकडून दि. १५ जानेवारी, २०२१ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.

२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तिकडून ज्या हरकती वा सूचना प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापुर्वी प्राप्त होतील, त्या हरकती वा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

सेवा प्रवेश नियमाचा मसुदा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.११३/गृनिभू.- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र-२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान भाग चार-ब—३२३-१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २८, २०२० / पौष ७, शके १९४२

नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "भू-व्यवस्थापक मु ंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ" या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे:-

१. या नियमांना, "महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील भूव्यवस्थापक मु ंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणावे.

२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(अ) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.

(ब) "प्राधिकरण" म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.

(क) "विभाग" म्हणजे महाराष्ट्र शासनाचा गृहनिर्माण विभाग असा आहे.

३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "भूव्यवस्थापक मु ंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ" या पदावरील नियुक्ती, महसूल विभागातील जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख किंवा तत्सम समकक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यामधून, शासनाच्या प्रतिनियुक्ती धोरणानुसार तसेच विभागाने वेळोवेळी शासन निर्णय/ परिपत्रक/ आदेश इत्यादी अन्वये विहित के लेल्या प्रतिनियुक्तीच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागाकडून अथवा कार्यालयाकडून या पदावर गृहनिर्माण विभागाच्या मान्यतेशिवाय/ संमतीशिवाय परस्पर नियुक्ती देता येणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. कों. धनावडे,

शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.