RNI No. MAHBIL/ 2009/36619
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
गुरुवार , डिसेंबर ३१ , २०२० / पौष १०, शके १ ९ ४२
वर्ष ६ , अंक ५६]
[पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ९ ४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
अधिसूचना
भूमिसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ .
क्रमांक उपजिभूक्र. ७ / भूसं./ मुंउजि/एलएक्यू ८४३/२०२० .- मौजे मालाड तालुका बोरीवली जिल्हा मुंबई उपनगर येथील " भूमिसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ " अंतर्गत न.भू.क्र. ८२७ भाग स क्र. २३ ९ भाग चे भूसंपादन ;
ज्याअर्थी , प्रस्तुत भूसंपादन प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही करणेकरिता जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजीचे आदेशान्वये उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ७ यांना प्राधिकृत केले आहे . प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दिनांक २५-३१ ऑक्टोबर, २०१८ रोजी व कलम १ ९ ( १ ) ची अधिसूचना दिनांक ११ जानेवारी २०१ ९ रोजी प्रसिद्ध करणेत आली ;
ज्याअर्थी , प्रस्तुत प्रकरणी विहित मुदतीत निवाडा घोषित करणे शक्य नसल्याची जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाल्याने भूमिसंपादन अधिनियम , २०१३ चे कलम २५ अन्वये अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करणेत येऊन निवाडा घोषित करण्याच्या कालावधीत १२ महिन्यांची वाढ यापूर्वी मंजूर करण्यात आली आहे ;
ज्याअर्थी , उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्र . ७ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार करोना महामारीमुळे झालेली प्रशासकीय विलंब , मा . उच्च न्यायालयात बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपादनाखालील जमिनीच्या क्षेत्राबाबत दाखल केलेली Notice of Motion ( L ) No. 103/2019 व Review Petition ( L) No. 41/2019 तसेच हितसंबंधितांनी संपादनाखालील क्षेत्राबाबत नोंदविलेला आक्षेप व मा . उच्च न्यायालयात दाखल केलेली Writ Petition ( L ) No. 6042/2020 या अद्याप निर्णित झालेल्या नसलेने अंतिम निवाडा घोषित करणे उचित होणार नाही . त्यामुळे सद्यस्थितीत मुदतवाढ न दिल्यास संपादनाची संपूर्ण प्रक्रिया संपुष्टात येईल ;
आणि ज्याअर्थी , कलम १ ९ च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने उपरोक्त कलम २५ च्या अधिसूचनेद्वारे वाढीव १२ (बारा ) महिन्यांच्या कालावधीत निवाडा घोषित करणेस झालेल्या विलंबास समर्थन करणारी परिस्थिती असून सदर मुदतीत निवाडा घोषित करणे शक्य नसल्याची माझी खात्री झाली आहे.
(१)
भाग एक ( को.वि.पु. ) ९४-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३१ , २०२०/ पौष १० , शके १ ९ ४२ त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी , या नात्याने प्रकरणात १२ महिन्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा असलेला अधिकार वापरून खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण्यास दिनांक ११ जानेवारी २०२१ पासून (सहा) महिन्यांची वाढीव मुदत मंजूर करत आहे.
अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन
मौजे मालाड , तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर
अ. क्र .
स . क्र .
न. भू. क्र.
कलम १ ९ ( १ ) चे दिनांक २ ९ ऑगस्ट २०२० रोजीचे शुद्धीपत्रकानुसार अधिसूचित केलेले क्षेत्र
(चौ. मी.)
(१)
(३)
(४)
(२)
१
२३९ पै
८२७अ
१,४२,८२३.८०
संपादनाचे प्रयोजन.-पुनर्वसन व पुनर्स्थापन , २ - महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरिता भूसंपादन .
मिलिंद बोरीकर, मुंबई ,
दिनांक ३१ डिसेंबर २०२० .
जिल्हाधिकारी ,
मुंबई उपनगर जिल्हा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .