Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (KDS) Ext. 3 (8th January 2021) जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (दलित मित्).......अधिकारी पदी नेमणूक (क्रमांक गृह/क-१/टे-५/विकाअ/कावि-१६०३३/२०२०

Published 08 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी

शुक्रवार, जानेवारी ८ , २०२१ / पौष १८ , शके १ ९ ४२

वर्ष ७ , अंक २ ]

[पृष्ठे २, किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी , ठाणे यांजकडून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (दलित मित्र) पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक वाचा:-

(१ ) शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र . विकाअ-१११५ /प्र.क्र .८८ / ५ , दिनांक ३१ डिसेंबर २०१५ .

( २ ) शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , शासन निर्णय , क्रमांक: सभूपू-२०१४ /प्र.क्र.९ १ / बांधकामे, दिनांक २४ जून २०१४.

अधिसूचना

क्रमांक गृह / क-१ / टे -५ / विकाअ/ कावि-१६०३३ / २०२०. उपोद्घातातील शासन निर्णयान्वये अ.क्र . १ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी , राजेश ज. नार्वेकर , जिल्हाधिकारी , ठाणे आता खालील नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या ठाणे जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (दलित मित्र ) पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती त्यांच्या वयाच्या ७० वर्षापर्यंत चालू राहील व वयाच्या ७० वर्षांनतर त्यांना अनर्ह ठरवण्यात येईल . तसेच सदर व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद आढळल्यास अथवा फौजदारी गुन्ह्याखाली शिक्षा झाली किंवा त्यांच्या विरुद्ध गंभीर स्वरुपाच गुन्हा नोंदविण्यात आला किंवा कोणत्याही न्यायालयाने त्यास नादार ( bankrupt ) जाहीर केल्यास सदरची नियुक्ती संपुष्टात येईल .

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील: -

(एक) साक्षांकनाचे काम: -विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच उपोद्घातातील शासन निर्णयामधील परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल . دو

(१ )

भाग एक- (को.वि.पु . )-३-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ८, २०२१/पौष १८ , शके १९ ४२ ३. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

४. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर, कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.

५. नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरले . नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचेविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा.

अनुसूची

वर्ष

अ.क्र.

स्थायी पत्ता

अर्जदाराचे नाव

आधारकार्ड नंबर

शासन निर्णयानुसार

जिल्हा क्रमांक

(२)

(३)

(४)

(५)

(६) २१

१

(१) २०२०

८००२४२२६७३६३

श्री . शशिकांत वसंत सूर्यवंशी रा . सूर्यवंशी निवास , रूम नं . १/१ , सिद्धार्थनगर , माजिवाडा, ठाणे ४०० ६०१ .

ठाणे ,

दिनांक ३१ डिसेंबर २०२० .

राजेश ज. नार्वेकर , जिल्हादंडाधिकारी, ठाणे .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.