RNI No. MAHBIL /2009/31745
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - मध्य उप- विभाग
वर्ष ७ , अंक १ ]
बुधवार , जानेवारी १३, २०२१/ पौष २३ , शके १ ९ ४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
राजशिष्टाचार शाखा , ३ रा मजला , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२
दिनांक १३ जानेवारी २०२१
अधिसूचना
क्रमांक डीआयपी -२०२० / प्र.क्र .१३० / ३० .- " माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री. विष्णु रामा सवरा यांचे बुधवार , दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे झालेल्या दुःखद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण केली.
माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री . विष्णु रामा सवरा यांचे बुधवार , दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे निधन झाले . श्री. विष्णु सवरा यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने आदिवासी बांधवांच्या विकासाची दृष्टी असणारे आणि वंचित, कष्टकरी, कामगारांच्या हितासाठी काम करणारे सालस आणि निर्मळ मनाचे नेतृत्त्व राज्याने गमावले आहे.
श्री. सवरा यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील गालतरे ( ता. वाडा) येथे दिनांक १ जून १ ९ ५० रोजी शेतकरी कुटुंबात झाला . ते वाणिज्य शाखेचे ( बी . कॉम. ) पदवीधर होते . स्टेट बँक ऑफ इंडियात सेवा बजावताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्याला प्रारंभ केला . शेतकरी , कामगार व आदिवासी विकासाशी निगडीत आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला . अरविंद स्मृती ठाणे या संस्थेच्या अरविंद आश्रमशाळा , माधवराव काणे आश्रमशाळा , छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण , प्रगती प्रतिष्ठान अशा विविध संस्थांद्वारेही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला . त्यांनी १ ९९ ० ते ९ ५ , १ ९९ ५ ते ९९ , १ ९९९ ते २००४, २००४ ते २०० ९ या काळात वाडा (जि. ठाणे) मतदार संघाचे , २०० ९ ते २०१४ भिवंडी ग्रामीण ( ठाणे) मतदार संघाचे आणि २०१४ ते २०१ ९ विक्रमगड ( जि. पालघर ) मतदार संघांचे विधिमंडळात विधानसभा सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी फेब्रुवारी १ ९९ ५ ते ऑक्टोबर १ ९९९ आणि पुढे ५ डिसेंबर २०१४ ते १६ जून २०१ ९ असे दोनदा आदिवासी विकास खात्याचे मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषविले होते . पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांनी सांभाळले होते. विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख तसेच रोजगार
(१)
भाग एक- (म.उ.वि . ) -१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग, जानेवारी १३, २०२१/ पौष २३ , शके १ ९ ४२
हमी योजना समिती , लोक लेखा समिती, पंचायत राज समिती , अनुसूचित जाती कल्याण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते . ते मितभाषी होते. पक्षाशी एकनिष्ठ आणि सगळ्यांशीच आदराने वागणारे व्यक्तित्त्व म्हणून त्यांची वेगळी अशी ओळख होती .
श्री. विष्णु रामा सवरा यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दुःख व्यक्त करीत आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची ताकद सवरा कुटुंबीयांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
संजय कुमार , शासनाचे मुख्य सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .