RNI No. MAHBIL/2009/36619
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी बुधवार , जानेवारी १३ , २०२१/ पौष २३, शके १ ९ ४२
वर्ष ७, अंक ४]
[ पृष्ठे २, किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक ७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा ( भूसंपादन शाखा)
" भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ " चे कलम २५ खाली अधिसूचना
क्रमांक उपजिभूक्र. ४ / भूसं/ एलएक्यू/ एसआर२-२७२ / मुंउजि/ २०२१.-मौजे गोरेगाव, तालुका बोरीवली , जिल्हा मुंबई उपनगर येथील " भूमिसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा हक्क व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ " अंतर्गत न.भू.क्र. ६०/६ (पै. ) चे भूसंपादन .
ज्याअर्थी , मौजे गोरेगाव , तालुका बोरीवली येथील न.भू.क्र . ६०/६ (पै. ) या जमिनीचे ३०३.०० चौ.मी. क्षेत्र " ३५.०० मी रुंद विहीत रस्ता " करीता संपादन करणेचा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही करणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक १४ जानेवारी २०१ ९ रोजीचे आदेशान्वये उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन) क्रमांक ४ , मुंबई उपनगर जिल्हा यांना प्राधिकृत केले आहे. प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दिनांक १८ जून २०१ ९ रोजी व कलम १ ९ ( १ ) ची अधिसूचना दिनांक १४ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध झाली.
आणि ज्याअर्थी, भूमी संपादन अधिनियम , २०१३ चे कलम २५ मधाल परंतुकान्वये जिल्हाधिकारी कलम १ ९ अन्वये घोषणा प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून १२ महिन्याच्या कालावधीत निवाडा देईल आणि जर त्या कालावधीत निवाडा देण्यात आला नाही तर, जमीन संपादनाची संपूर्ण कार्यवाही निवाडा रद्द होईल; परंतु त्याचे समर्थन करणारी परिस्थिती अस्तित्वात असेल तर , समुचित शासनाला १२ महिन्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा अधिकार असेल .
आणि, ज्याअर्थी, कोरोना महामारीमुळे व इतर प्रशासकीय कारणामुळे झालेल्या विलंबामुळे सदर प्रकरणात पुढील कार्यवाही करता आलेली नाही . तरी कलम १ ९ ( १ ) ची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १२ महिन्याच्या कालावधीत म्हणजेच दिनांक १३ जानेवारी २०२१ पर्यत निवाडा जाहीर करणे शक्य नाही . प्रकरणी सद्यःस्थितीत सदर निवाडा जाहीर करणेस वाढीव मुदत न दिल्यामुळे जर हा निवाडा रद्द झाला तर सदर प्रकरणात पुन्हा कलम ११ व १ ९ ची अधिसूचना प्रसिद्धी , संयुक्त मोजणी , प्रारूप निवाडा, अंतिम निवाडा ही कार्यवाही करणेसाठी वेळ जाऊन शासनाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
(१)
भाग एक (को.वि.पु. )-७-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३ , २०२१/ पौष २३, शके १९ ४२ त्याअर्थी , उपरोक्त कलम २५ च्या अधिसूचनेद्वारे प्राप्त वाढीव कालावधीच्या मुदतीस झालेल्या विलंबास समर्थन करणारी परिस्थिती असून सदर मुदतीत निवाडा करणे शक्य नसल्याची माझी खात्री झाली असून समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी , या नात्याने प्रकरणात १२ महिन्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा असलेला अधिकार वापरून खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण्यास १२ ( बारा ) महिन्यांची वाढीव मुदत मंजूर करत आहे .
अनुसूची - एक जमिनीचे वर्णन
मौजै गोरेगाव, तालुका बोरीवली , जिल्हा मुंबई उपनगर
अ. क्र .
न.भ.क्र .
जमिनीचे आवश्यक क्षेत्र (चौ . मी. )
१.
३०३.००
६०/६ (पै. )
संपादनाचे प्रयोजन.-" ३५.०० मी . रुंद विहीत रस्ता " करीता संपादन .
मिलिंद बोरीकर ,
जिल्हाधिकारी , ठिकाण: मुंबई
दिनांक १३ जानेवारी २०२१ .
मुंबई उपनगर जिल्हा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .