Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Ex.5) (Dated 14th January 2021) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग अधिसूचना क्रमांक डीआयएस-2021/प्र.क्र.3/पदुम-4

Published 14 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/ 31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

गुरूवार, जानेवारी १४ , २०२१/पौष २४ , शके १९ ४२

वर्ष ७ , अंक ४]

[पृष्ठे ५ , किंमत: रुपये १५.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १२ जानेवारी , २०२१ .

अधिसूचना

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ .

क्रमांक डीआयएस-२०२१/प्र.क्र.३ /पदुम-४. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २०० ९ ( २०० ९ चा क्रमांक २७ ) याच्या कलम ६ च्या पोट- कलम ( १ ) व ( २ ) तसेच कलम ७ , ११ , १२ व १३ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे ,-

(क) कोणत्याही नियंत्रित क्षेत्रातून कोणत्याही संक्रमित पक्षासंबंधी प्रजातीचा जिवंत किंवा मृत पक्षी , कोणत्याही पक्षाचे कोंबडी खाद्य, पिल्ले, कोंबडी खत किंवा कोणत्याही संक्रमित पक्षी प्रजातीच्या पक्षाच्या आणि जे त्याच्या मृत शरीराच्या , अशा पक्षाच्या त्वचेच्या किंवा अन्य कोणत्याही अवयवाच्या किंवा उत्पादनाच्या संपर्कात आलेले आहे असे इतर कोणतेही साहित्य घेऊन जाण्यास कोणत्याही व्यक्तीस मनाई करता यावी म्हणून; आणि

(ख) नियंत्रित क्षेत्रात पक्षीसंबंधी प्रजातीच्या पक्षाचा कोणताही पक्षी बाजार, पक्षी जत्रा, पक्षी प्रदर्शन भरविण्यास; आणि पक्षांसंबंधी प्रजातीच्या पक्षांचा गट करण्याचा किंवा एकत्रिकरण करण्याचा अंतर्भाव असणारी अन्य कोणतीही कृती करण्यास मनाई करता यावी म्हणून; आणि

(ग) उक्त संक्रमित पक्षांसंबंधी प्रजातीचे पक्षी , नियंत्रित क्षेत्रातील बाजारात, जत्रेमध्ये , प्रदर्शनात किंवा पक्षांच्या इतर घोळक्यात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आणण्यास किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई करता यावी म्हणून; आणि

( घ ) पक्षांसंबंधी प्रजातीच्या पक्षांची ने- आण करताना , वाहतुकीपूर्वी आणि वाहतुकीनंतर तात्काळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करता यावे म्हणून ,

भाग चार-अ-५-१

(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १४ , २०२१ /पौष २४ , शके १ ९ ४२

महाराष्ट्र राज्यातील ( १ ) मुरंबा क्षेत्र , तालुका व जिल्हा परभणी , ( २ ) केंद्रेवाडी गाव , तालुका अहमदपूर , जिल्हा लातूर व (३ ) सुकनी गाव , तालुका उदगीर , जिल्हा लातूर यांच्या ग्रामपंचायतींना, उक्त अधिनियमा अन्वये जो अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे आणि ज्याद्वारे , पक्षांसंबंधी प्रजाती पक्षी (यात यापुढे ज्याचा निर्देश "संक्रमित पक्षांसंबंधी प्रजाती पक्षी " असा केला आहे) , संक्रमित झालेले आहेत अशा "पक्षांसंबंधी शीतज्वराच्या ( एव्हीअन एन्फ्ल्युएन्झा ) " बाबतीत नियंत्रित क्षेत्र ( यात यापुढे ज्याचा निर्देश , "नियंत्रित क्षेत्र " असा केला आहे) , म्हणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनूप कुमार, शासनाचे प्रधान सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १४ , २०२१/पौष २४ , शके १ ९ ४२

AGRICULTURE , ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT

AND FISHERIES DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 12th January , 2021 .

NOTIFICATION

PREVENTION AND CONTROL OF INFECTIOUS AND CONTAGIOUS DISEASES IN ANIMALS ACT , 2009 .

No.DIS-2021/C.R.3 /ADF- 4.-In exercise of the powers conferred by sub - sections ( 1 ) and ( 2) of section 6 read with sections 7, 11 , 12 and 13 of the Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act , 2009 ( No. 27 of 2009) , the Government of Maharashtra hereby declares the Grampanchayats of ( 1 ) Muramba Area , Tal . and Dist . Parbhani , ( 2) Village Kendrewadi , Tal . Ahamedpur , Dist . Latur and ( 3) Village Sukni , Tal . Udgir , Dist . Latur in the State of Maharashtra as a controlled area ( hereinafter referred to as "the controlled area " ) , in respect of the "Avian Influenza " , which is a scheduled disease declared under the said Act, whereby Avian species birds are infected (hereinafter referred to as " the infected Avian species birds " ) , so as to ,-

(a) prohibit a person to take any infected Avian species bird , alive or dead , any kind of poultry feed , litter , poultry mannure or other material which has come into contact with any infected Avian species bird and the carcass , skin or any other part or product or such bird out of the controlled area; and

(b) prohibit holding or any bird market , bird fare , bird exhibition of the Avian species bird ; and also to carry on any other activity involving grouping or gathering of the Avian species bird in the controlled area ; and

( c) prohibit to bring or attempt to bring said infected Avian species bird into market , fair, exhibition or other congregation of bird or to any public place in the controlled area .

(d) clean and disinfect immediately before and after the transportation of Avian species bird kept in transit .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

ANOOP KUMAR ,

Principal Secretary to Government .

भाग चार -अ- ५-२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १४ , २०२१/ पौष २४, शके १ ९ ४२

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १२ जानेवारी , २०२१ .

अधिसूचना

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २०० ९.

क्रमांक डीआयएस -२०२१ /प्र.क्र.३/पदुम -४. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम , २०० ९ ( २०० ९ चा क्रमांक २७ ) याच्या कलम ३६ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , उक्त अधिनियमान्वये घोषित केलेला "पक्षासंबंधी शीतज्वर (एव्हीअन एन्फ्ल्युएन्झा) " या अनुसूचित रोगाच्या प्रतिबंधासाठी , नियंत्रणासाठी व निर्मूलनासाठी , राज्य शासन , याद्वारे महाराष्ट्र राज्यातील त्याच्या स्थानिक प्राधिकार क्षेत्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांचे सर्व अधिकार प्रदान करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनूप कुमार , शासनाचे प्रधान सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १४ , २०२१/पौष २४ , शके १ ९ ४२

AGRICULTURE , ANIMAL HUSBANDRY , DAIRY DEVELOPMENT

AND FISHERIES DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 12th January , 2021 .

NOTIFICATION

PREVENTION AND CONTROL OF INFECTIOUS AND CONTAGIOUS DISEASES IN ANIMALS ACT , 2009 .

No. DIS- 2021/C.R.3 / ADF- 4.-In exercise of the powers conferred by section 36 of the Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act , 2009 ( No. 27 of 2009 ) , for the prevention , control and eradication of the scheduled disease "Avian Influenza " declared under the said Act , the Government of Maharashtra hereby confers all its powers on all the District Collectors within their local jurisdiction in the State of Maharashtra .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

ANOOP KUMAR , Principal Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.