RNI No. MAHBIL/ 2009/35827
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक २ ]
गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४-२० , २०२१/पौष २४-३० , शके १ ९ ४२ [पृष्ठे ५, किंमत: रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
जिल्हा परिषद, लातूर
वार्षिक प्रशासन अहवाल सन २०१ ९ -२०
क्रमांक २० /जिपला/ साप्रवि/ वाप्रअ/का-४/ सीआर -११३/कावि-३२८
अधिसूचना
लातूर जिल्हा परिषदेच्या सन २०१ ९ -२० या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ ( ४ ) व कलम २७४ ( २ ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या ( वार्षिक प्रशासन अहवाल सुधारणा व प्रसिद्धी ) अधिनियम , १ ९ ६४ मधील तरतुदीनुसार , महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र. वाप्रअ-२०१८/प्र.क्र. ५६ /परा . ५ , दिनांक १४ ऑगस्ट २०१८ अन्वये दिलेल्या सूचनेनुसार लातूर जिल्हा परिषदेच्या सन २०१ ९ -२० या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषद, लातूरच्या सर्वसाधारण सभा दिनांक १० नोव्हेंबर २०२० मधील ठराव क्र. ३४४६ अन्वये मंजुरी घेण्यात आलेली आहे . त्यामुळे सदर अहवालाची अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
अभिनव गोयल ( भा.प्र.से. ) , लातूर ,
दिनांक ३० डिसेंबर २०२० .
मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, लातूर.
(१)
भाग दोन ( संकीर्ण ) -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४-२० , २०२१ /पौष २४-३० , शके १ ९ ४२
परभणी जिल्हा परिषद, परभणी
क्रमांक जिप. साप्रवि . परिषद .कावि/५२६/२०
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ( वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ) नियम १ ९ ६६ व १ ९ ८१ ला अधीन राहून परभणी जिल्हा परिषदेचा तिच्या कामकाजाचा वार्षिक प्रशासन अहवाल सन २०१९- २०२० तयार केला असून सदरील अहवालास जिल्हा परिषदेच्या दिनांक १ ९ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक (५४३ ) अन्वये मान्यता घेण्यात आलेली आहे.
याद्वारे , परभणी जिल्हा परिषदेचा सन २०१ ९ -२०२० चा वार्षिक प्रशासन अहवाल मान्य झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
पृथ्वीराज बी. पी . ( भा.प्र.से. ) , परभणी,
दिनांक ८ डिसेंबर २०२० .
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, १४-२० , २०२१/पौष २४-३० , शके १ ९ ४२
Sr. No. M- 2055
NOTICE
THE TATA POWER COMPANY LIMITED
REGD . OFFICE : BOMBAY HOUSE , 24 HOMI MODI STREET , MUMBAI - 400 001 Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/mislaid and the holder of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificate .
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date , else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation .
Distinctive Nos .
Name of the Holder
No. of Securities
Kind of Securities and Face Value
2160
18412311-18414470 Manchanda
Equity shares of Re.1/- each
Rajinder Kumar (Decd)
Place: Delhi ,
Date : 30th December 2020 .
ROMIT MANCHANDA .
भाग दोन (संकीर्ण ) -२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४-२० , २०२१ /पौष २४-३० , शके १ ९ ४२
पाचोरा नगरपरिषद कार्यालय, पाचोरा
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ अन्वये अधिसूचना
क्रमांक बांध / २८ ९ ४ / सन २०२०. पाचोरा शहराची दुसरी सुधारित + वाढीव हद्दीची विकास योजना, महाराष्ट्र शासन , नगरविकास विभाग , निर्णय क्रमांक टिपीएस-३५१० / २७७२ /प्र.क्रं.१८६ / २०११ /नवि - ९ , दिनांक ०३ एप्रिल २०१२ अन्वये भागशः तसेच निर्णय क्रमांक टिपीएस -३५१२ / ३०१ (न) /प्र.क्रं.३२ ( ब )/ २०१३ /नवि- ९, दिनांक २० फेब्रुवारी २०१५ अंतिम मान्यता मिळाली असून सदर भागशः मंजूर विकास योजना दिनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे .
नगरपरिषद सर्वसाधारण ई - सभा ठराव क्रं. २६ दिनांक २८ ऑगस्ट २०२० अन्वये सदर मंजूर विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ बदल करणेचे ठरविले आहे .
पाचोरा शहराच्या दुसरी सुधारित + वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सर्व्हे नंबर २२७ पैकी , २२८ पैकी व २२९ पैकी ( गट नं. १६४ पैकी , १६५ पैकी, २० पैकी) मधील खाजगी मालकीच्या क्षेत्र ० हे . ८२ आर जमिनीवर आरक्षण क्रं. २१ नुसार " व्हेजीटेबल मार्केट, शॉपिंग सेंटर अॅण्ड पार्किंग " वापरासाठीचे प्रस्तावित आरक्षण वगळून सदर जमिनीचा वापर रहिवास प्रयोजनासाठी करण्याचा इरादा आहे.
नगरपरिषदेने प्रस्तावित केलेला बदल दर्शविणारा नकाशा मा . अध्यक्षांचे सही , शिक्क्यानिशी व दिनांकासहीत नगरपरिषद कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवणेत आला आहे. त्याबाबत कोणास सूचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र तसेच स्थानिक व जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याचे आत निम्नस्वाक्षरीकार यांचेकडेस लेखी पाठवाव्यात. वरिल मुदतीमध्ये आलेल्या हरकती व सूचनांचा विचार प्रस्तावित बदल महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल .
संजय नाथालाल गोहिल,
श्रीमती शोभा बाविस्कर,
पाचोरा नगरपरिषद, कार्यालय,
पाचोरा , जि. जळगाव ,
मुख्याधिकारी,
पाचोरा नगरपरिषद, पाचोरा.
दिनांक ४ डिसेंबर २०२० .
अध्यक्ष, पाचोरा नगरपरिषद , पाचोरा .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, १४-२० , २०२१/पौष २४-३० , शके १ ९ ४२
पाचोरा नगरपरिषद कार्यालय , पाचोरा
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ अन्वये अधिसूचना
क्रमांक बांध / २८ ९ ५ / सन २०२०. पाचोरा शहराची दुसरी सुधारित + वाढीव हद्दीची विकास योजना महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, निर्णय क्रमांक टिपीएस-३५१० / २७७२ /प्र. क्र. १८६/२०११ /नवि- ९ , दिनांक ३ एप्रिल २०१२ अन्वये भागशः तसेच निर्णय क्रमांक टिपीएस -३५१२ / ३०१ (न) / प्र. क्र. ३२ (ब ) / २०१३ / नवि-९ , दिनांक २० फेब्रुवारी २०१५ अंतिम मान्यता मिळाली असून सदर भागशः मंजूर विकास योजना दिनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे .
नगरपरिषद सर्वसाधारण ई- सभा ठराव क्र . ३८ , दिनांक २८ ऑगस्ट २०२० अन्वये सदर मंजूर विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ बदल करणेचे ठरविले आहे.
पाचोरा शहराच्या दुसरी सुधारित + वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सर्व्हे नंबर ४४ पैकी , (गट नं . १०० ) मधील खाजगी मालकीच्या क्षेत्र ० हे . २७ आर जमिनीवर आरक्षण क्र . ४ ९ नुसार " प्ले ग्राऊंड " वापरासाठीचे तसेच क्षेत्र ० हे . ४७ आर जमिनीवर आरक्षण क्र . ५० नुसार " प्रायमरी स्कुल अॅण्ड प्ले ग्राऊंड " वापरासाठीचे अशी दोन्ही प्रस्तावित आरक्षण वगळून सदर जमिनीचा वापर रहिवास प्रयोजनासाठी करण्याचा इरादा आहे.
नगरपरिषदेने प्रस्तावित केलेला बदल दर्शविणारा नकाशा म. अध्यक्षांचे सही, शिक्क्यानिशी व दिनांक सहीत नगरपरिषद कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवणेत आला आहे. त्याबाबत कोणास सूचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र तसेच स्थानिक व जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याचे आत निम्न स्वाक्षरीकार यांचेकडे लेखी पाठवाव्यात . वरील मुदतीमध्ये आलेल्या हरकती व सूचनांचा विचार प्रस्तावित बदल महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल.
श्रीमती शोभा बाविस्कर,
पाचोरा नगरपरिषद कार्यालय,
संजय नाथालाल गोहिल,
अध्यक्ष , पाचोरा , जि. जळगाव.
दिनांक ४ नोव्हेंबर २०२० .
पाचोरा नगरपरिषद, पाचोरा.
मुख्याधिकारी, पाचोरा नगरपरिषद , पाचोरा .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .