Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (KDS) (Weekly) (Dated 14th-20th January 2021)

Published 14 January 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ १

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ [पृष्ठे १९ किंमत : रुपये १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग

महाराष्ट्र राज्य, पुणे

दिनांक १६ डिसेंबर २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक वियो मरारविमं/मौ. भोकरपाडा व इतर/ए.न.व.प्र./प्र.क्र.६५/१९/टीपीव्ही-३/३८१९.— ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे.) चे कलम १५ मधील तरतुदींनुसार शासन, नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२९७/१०९४/प्र.क्र.११६/९७/नवि-१२, दिनांक २३ सप्टेंबर १९९९ अन्वये मुंबई महानगर प्रदेशाची सुधारित प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त प्रादेशिक योजना" असा करण्यात आला आहे.) मंजूर झाली असून, उक्त प्रादेशिक योजना दिनांक ०१ डिसेंबर १९९९ पासून अंमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, मुंबई महानगर नियोजन समितीने उक्त प्रादेशिक योजना सुधारित करून ती उक्त अधिनियमाच्या कलम १६(४) मधील तरतुदीनुसार दि. २३ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या पत्रान्वये शासनास मंजुरीकरिता सादर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दक्षिण-पश्चिमेकडील २ कि.मी. च्या अधिसूचित क्षेत्राकरिता (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचित क्षेत्र " असा करण्यात आला आहे) शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ४० मधील तरतुदीनुसार शासन अधिसूचना क्र. टीपीएस १८१५/अनौसं/७८/१५/नवि १२, दि. १७ फेब्रुवारी २०१६ अन्वये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची " विशेष नियोजन प्राधिकरण " म्हणून नियुक्ती केली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त विशेष नियोजन प्राधिकरण " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, शासन, नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१६/ प्र.क्र. ३६८(भाग -१)/१५/३७(१ कक)(ग)/वियो/ नवि १३, दि. ०८ मार्च २०१९ अन्वये राज्यातील विशेष नियोजन प्राधिकरणे तसेच क्षेत्र विकास प्राधिकरणे यांच्या नियमावलीत एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पासाठीचे सुधारित विनियम समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१ कक)(ग) अन्वये मान्यता दिली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीची नियमावली " असा करण्यात आला आहे) ;

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ आणि ज्याअर्थी, शासन, नगरविकास विभागाकडील उक्त अधिनियमाच्या कलम १८(३) सह कलम ४४(२) अन्वये अधिसूचना क्र. टीपीएस-१७१७/२४०/प्र.क्र.७३/१७/नवि-१२, दि. ३० डिसेंबर २०१७ द्वारे अर्जदार मे.र्पसिपिना डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्या मौ. पानशिल, तळेगाव, रिस, ता.खालापूर, मौजे बारवाई, भोकरपाडा, ता.पनवेल, जि. रायगड येथील सुमारे १६९.७२ हे. क्षेत्रावरील एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पास अटी व शतर्ींना अधिन राहून स्थानिय मंजुरी प्रदान केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अर्जदार मे.र्पसिपिना डेव्हलपर्स प्रा. लि. व सहअर्जदार मे. ज्युनिपर फार्मस् प्रा.लि. यांनी उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीच्या नियमावलीमधील नियम क्र. ४.५ मधील तरतुदीनुसार मौजे भोकरपाडा, ता.पनवेल, मौजे पानशील व तळेगाव, ता.खालापूर येथील १४.६४१ हे. इतके वाढीव क्षेत्र उक्त मंजूर एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या क्षेत्रात समाविष्ट करून त्यास लोकेशनल क्लिअरन्स मंजूर करण्याचा प्रस्ताव दि. ०६ जून २०१९ व तद्नंतरच्या पत्रान्वये संचालनालयाकडे सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अर्जदार कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या प्रस्तावित वाढीव क्षेत्रातील जमिनींचे मालकी विकसन अधिकार महसूल अभिलेखाप्रमाणे त्यांच्याकडे असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीच्या नियमावलीतील नियम ४.५ नुसार एकात्मिकृत वसाहतीसाठी स्थानिय मंजुरी दिलेल्या क्षेत्राच्या ५०% पयर्ंत क्षेत्र प्रकल्पामध्ये अंतभर्ूत करण्यास किंवा वगळण्यास, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे मान्यता देऊ शकतात ;

आणि ज्याअर्थी, प्रकल्प प्रवर्तक यांनी विनंती केलेले उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीमध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्र हे एकूण प्रकल्प क्षेत्राच्या ५०% मर्यादेत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त समावेश करावयाचे वाढीव क्षेत्र उक्त अधिनियमाचे कलम १८ पोट-कलम ३ सह कलम ४४(२) नुसार उक्त प्रादेशिक योजना नकाशावर निर्देशित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, संबंधित प्रवर्तकाने उक्त प्रकल्पासाठीच्या स्थानिय मंजुरीसाठी देय असलेले प्रक्रिया शुल्क दिनांक ५ सप्टेंबर २०१९, १३ मार्च २०२० रोजी व अधिमूल्य दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग शाखा यांच्यामार्फत कोषागारात भरणा करून चलनाच्या प्रती सादर केल्या आहेत ;

त्याअर्थी, आता, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे, याद्वारे सोबत जोडलेल्या " अनुसुची-अ " मध्ये नमूद केलेले १४.६४१ हे. इतके क्षेत्र, यापूर्वी उक्त लोकेशनल क्लिअरन्स प्राप्त असलेल्या एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रात समाविष्ट करण्यास एकात्मिकृत नगर वसाहतीच्या नियमावलीतील नियम क्र.४.५ च्या अंतर्गत खालील अटी व शतर्ींना अधीन राहून मान्यता देत आहेत.

अटी व शर्ती :--

i. शासनाने सदरहू अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पास मूळ स्थानिय मंजुरीच्यावेळी दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजीच्या अधिसूचना क्र. टीपीएस १७१७/२४०/प्र.क्र.७३/१७/नवि १२ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटी/ शर्ती सदरहू वाढीव क्षेत्राच्या स्थानिय मंजुरीसाठी सुद्धा लागू राहतील,

ii. शासनाने राज्यातील विशेष नियोजन प्राधिकरणाच्या तसेच नव नगरविकास प्राधिकरणाच्या क्षेत्राकरिता एकात्मिकृत नगर वसाहतीचे प्रकल्पाच्या विकासाबाबत दिनांक ८ मार्च २०१९ रोजीच्या अधिसूचनेद्वारे व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांद्वारे लागू केलेल्या विनियमातील सर्व नियम सदर प्रस्तावाकरिता लागू राहतील.

iii. सदरहू प्रस्तावात शासकीय जमीन असलेस ती प्राप्त करून घेण्याची कार्यवाही इरादा पत्रापूर्वी करणे आवश्यक राहील.

(२) सदरहू एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या स्थानिय मंजुरी प्राप्त क्षेत्रामध्ये समाविष्ट करावयाच्या वाढीव क्षेत्राचा तपशील सोबतच्या " अनुसूची -अ" मध्ये दर्शविण्यात आला आहे व वाढीव क्षेत्रासह प्रकल्पाची हद्द दर्शविणारा नकाशा "अनुसूची-ब" अधिसूचनेसोबत जोडला आहे.

(३) उक्त नमूद एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पांतर्गत वाढीव क्षेत्राच्या जमिनींचा तपशील आणि हद्दी दर्शविणारा नकाशा म्हणजेच " अनुसूची -अ " व " अनुसूची -ब " तसेच अधिसूचना सर्वसाधारण नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये खाली नमूद कार्यालयामध्ये १ (एक) महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील.

(अ) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई-५१.

(ब) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ ३

(क) सह संचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.

(ड) जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

(इ) सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग.

(४) सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.

(५) सदरची अधिसूचना नगररचना संचालनालयाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

" अनुसूची-अ "

(संचालनालयाकडील अधिसूचना क्रमांक वियो MSRDC/मौ. भोकरपाडा व इतर/ए.न.व.प्र./प्र.क्र.६५/१९/टीपीव्ही-३/३८१९, दिनांक १६ डिसेंबर २०२० सोबतचे जोडपत्र)

अ.क्र.

गावाचे नाव

स.नं. क्षेत्र (हे.) १ भोकरपाडा ६०/१ ३.३११ २ भोकरपाडा ६०/२ १.३२४ ३ भोकरपाडा ६०/३ ०.०५८ ४ भोकरपाडा ६०/४ ०.०६६ ५ भोकरपाडा

३६ ०.१६७ ६ भोकरपाडा

३७ ०.६२७ ७ भोकरपाडा ६१/६ ०.५३ ८ पानशील ७०/१ ०.१५८ ९ पानशील ७०/३ अ २ २.०० १० पानशील

९५ १.०६ ११

तळेगाव

३२/१३ ०.०९ १२ तळेगाव ४०/७ ०.०७ १३ तळेगाव ४३/४ ०.०७ १४ तळेगाव ५३/२ ५.११

एकूण क्षेत्र १४.६४१ हे.

सुधाकर नांगनुरे, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

TOWN PLANNING AND VALUATION DEPARTMENT

Maharashtra State, Pune, dated 16th December 2020

NOTIFICATION

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. MSRDC/Village-Bhokarpada and others/ITP/CR-65/19/TPV-3/3819.— Whereas, the Government has sanctioned the revised Regional Plan for the Mumbai Metropolitan Region (hereinafter referred to as "the said Regional Plan") vide Notification No. TPS.1297/1094/C.R.116/ 97/UD-12, dated 23rd September 1999 as per the provisions of section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") and the said notification has come into force with effect from 1st December 1999 ;

And whereas, Mumbai Metropolitan Planning Committee has revised the said Regional Plan and vide its letter dated 23rd February 2018 submitted the Draft Revised Regional Plan for sanction to the Government under Section 16(4) of the said Act ;

And whereas, the Government has appointed Maharashtra State Road Development Corporation Ltd. (MSRDC) as a 'Special Planning Authority' under the provisions of sec. 40 of the said Act vide notification No. TPS 1815/UOR/78/15/ UD-12, dated 17th February 2016 (hereinafter refer to as "the said Special Planning Authority") for the area between Mumbai - Pune Expressway and Mumbai - Pune old Highway and for the land within the 2.00 km. South - West from Mumbai - Pune Expressway (hereinafter refer to as "the said Notified Area") ;

And whereas, the Government in Urban Development Department vide its Notification No. TPS.1816/C.R.368(Part 1)/15/37(1AA)(C)/DP/UD-13, dated 8th March 2019 has accorded sanction to a modification under section 37(1AA)(C) of the said Act, to incorporate special regulation for Development of Integrated Township Projects in Special Planning Authority and New Town Development Authority areas (hereinafter referred to as "the said Integrated Township Project Regulation") ;

And whereas, the Government has accorded Locational Clearance for the Integrated Township Project proposed by M/s. Persipina Developers Pvt. Ltd. in village Panshil, Talegaon, Ris, Tal. Khalapur, Mauje Barwai, Bhokarpada, Tal. Panvel, Dist. Raigad on land approximately admeasuring 169.72 Ha. vide Government Notification TPS. 1717/240/CR 73/17/UD-12, dated 30th December 2017 (hereinafter referred to as "the said Notified Integrated Township Project") ;

And whereas, the above Applicant alongwith co-Applicant M/s. Juniper Farms Pvt. Ltd. has submitted a proposal as per the Regulation No. 4.5 of the said Integrated Township Project Regulation to the Directorate for grant of Locational Clearance for additional lands admeasuring about 14.641 Ha. from village Bhokarpada, Tal. Panvel, village Panshil, Talegaon, Tal. Khalapur in the said Notified Integrated Township Project ;

And whereas, as per the proposal submitted by the Applicants, the ownership and development rights of the said additional lands, proposed to be incorporated in the said Notified Integrated Township Project are acquired by the Applicants and the Applicant has also submitted an Affidavit to that effect as per Revenue records ;

And whereas, as per the Regulation No. 4.5 of the said Integrated Township Project Regulation, the Director of Town Planning, Maharashtra State, on the request of Project Proponent, may add or delete any area, not exceeding 50% of the total area under Locational Clearance ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ ५

And whereas, as per the request of the said Applicant the area to be added is less than 50 % of the total area under Locational Clearance ;

And whereas, it is accordingly expedient to designate the said additional project lands on the said Regional Plan under the provisions of sub section (3) of section 18 read with section 44(2) of the said Act as the additional project lands for the said Notified Integrated Township Project ;

And whereas, for this Locational Clearance Proposal the said Applicant has deposited Scrutiny Fees on dated 05/09/2019, 13/03/2020 and necessary Premium on dated 27/11/2020 through the Assistant Director of Town Planning, Raigad-Alibag in Government Treasury ;

Now, therefore, the Director of Town Planning, Maharashra State, Pune under the Regulation No. 4.5 of the said Integrated Township Project Regulation hereby grants permission to add the area 14.641 Ha., more specifically described in "Schedule-A" appended hereto, to the area of Integrated Township Project for which Locational Clearance has already been granted, subject to following terms and conditions.

Terms and Conditions :––

i. All the terms and conditions mentioned in Government Notification No. TPS. 1717/240/ CR 73/17/UD. 12, dated 30/12/2017 for the original Locational Clearance of the said Notified Integrated Township Project shall also be applicable to the Locational Clearance of the said additional area.

ii. All the Rules of special regulations for Development of Integrated Township Projects in Special Planning Authority and New Town Development Authority areas with the amendments made from time to time shall be applicable for this proposal.

iii. The procedure for obtaining Government land if any under this proposal shall be carried out before Letter of Intent.

(2) The details of additional lands to be added in the Locational Clearance of the said Integrated Township Project are given in 'Schedule A' appended hereto, and the plan showing the boundaries of the said Integrated Township Project along with additional area is given in 'Schedule B' appended hereto.

(3) The details and the plan of such additional area incorporated in the aforesaid Integrated Township Project i.e. 'Schedule A' and 'Schedule B' shall be kept available for the inspection of the general public, during office hours on all working days for 1 (one) month at the following offices :

(i) The Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Region Development Authority, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai.

(ii) The Managing Director, Maharashtra State Road Development Corporation, Mumbai.

(iii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Third Floor, Navi Mumbai.

(iv) The Collector, Raigad - Alibag.

(v) The Assistant Director of Town Planning, Raigad - Alibag.

(4) This Notification shall come into force on the date of its publication in the Maharashtra Government Gazette.

(5) This Notification shall also be made available on the Town Planing and Valuation Department Website-www.dtp.maharashtra.gov.in.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

"Schedule - A"

(Annexure to Notification No. DP MSRDC/Village-Bhokarpada & others/ITP/CR-65/19/TPV 3/3819, dated 16th December 2020 of Director of Town Planning, Maharashtra State, Pune)

Sr. No.  Name of Village S.No. Area (Ha.) 1 Bhokarpada 60/1 3.311 2 Bhokarpada 60/2 1.324 3 Bhokarpada 60/3 0.058 4 Bhokarpada 60/4 0.066 5 Bhokarpada 36 0.167 6 Bhokarpada 37 0.627 7 Bhokarpada 61/6  0.53 8 Panshil 70/1 0.158 9 Panshil

70/3 A2 2.00 10 Panshil 95 1.06 11 Talegaon 32/13 0.09 12 Talegaon 40/7 0.07 13 Talegaon 43/4  0.07 14 Talegaon  53/2 5.11

Total Area 14.641 Ha.

SUDHAKAR NANGNURE,

Director of Town Planning,

Maharashtra State, Pune.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ ७

उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), रत्नागिरी यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक उपजिभूसं./कोरे-१/एसआर/१/२०१५.— ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त " सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनूसुचीमध्ये कारणे नमुद करावीत) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग ४, अ. क्र. ३८, दिनांक १३ मार्च २०१५ च्या अनुक्रमांक (क) अन्वये संरक्षण सिद्धता: किंवा संरक्षण विषयक उत्पादन या सह भारताची राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण या दृष्टीने महत्वाचे प्रकल्प यांना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई करण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे. ज्याबाबत विस्तृत विवरण अनुसूची चार मध्ये दिलेले आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील.

यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या (कलम ११) च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनिचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकांस उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल :

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमांच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन ) कोकण रेल्वे-१, रत्नागिरी यांस पदनिर्देशित करीत आहे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

मौजे-आरगाव, ता.लांजा, जि.रत्नागिरी

बुडीत क्षेत्र धरणतळ सांडवा, प्रवेश पुच्छ कालव्यासाठी

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक/सव्र्हे नं./हिस्सा नं. अंदाजित क्षेत्र (हेक्टर आर मध्ये) (१)

(२) १

१४५ पै २

१४६ पै ३

१५१ पै ४ १५२ ५

१५४ पै ६

१५५ ७

१५७ ८

१५८ ९

१५९ १०

१६० ११

१६१ १२

१६२ १३

१६३ १४ १६४ १५

१६५ १६

१६६ पै १७ १६७ १८

१६८ १९

१६९ पै २०

१७० २१

१७१ २२

१७२ २३

१७३ २४ १७४ २५

१७५ २६

१७६ २७ १७७ पै २८

१७८ २९

१७९ पै ३०

२१४ पै ३१

२१५ ३२

२१६ (३)

०-०१-०० ०-२३-०० ०-४६-०० ०-०८-०० ०.०३.६० ०-१९-२० ०-०६-०० ०-५०-०० ०-०७-०० ०-११-०० ०-४८-०० ०-७२-०० ०-७७-०० ०.४३-५० ०-२३-०० ०-६५-०० ०-४३-०० ०-११-२० १-१३-०० ०-०१-५० ०-२०-२० ०-०६-३० ०-२५-८० ०-१९-२० ०-२९-०० ०-६६-०० ०-१६-०० ०-४१-०० ०-७९-०० ०-०३-०० ०-२६-०० ०-०५-१०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ ९ (१)

(२)

(३)३३ २१७ ०-१८-२० ३४ २१८ ३५

२१९ ३६

२२० ३७

२२१ ३८

२२२ ३९

२२३ पै ४०

२२४ ४१

२२५ पै ४२

२२६ पै ४३

२२७ पै ४४ २२८ पै ४५

२३२ पै ४६

२४७ पै ४७ २५३ पै ४८

३०१ पै ४९

३२० पै ५०

५१३ ५१

५१४ पै ५२

५१८ पै ५३

५२० ५४ ५२१ ५५

५२२ ५६

५२३ ५७ ५२४ ५८

५२५ पै ५९

५२६ पै ६०

५२७ पै ६१

५३८ पै ६२

५३९ ६३

५४० ६४ ५४१ ६५

५६९ पै ६६

५७० पै ६७ ५९२ पै ०.१६-७० ०-०१-८० ०-०७-६० ०-१२-१० ०-२१-०० ०-३५-०० ०-१६-०० ०-७७-४० ०-३२-०० ०-०९-०० १-०५-०० ०-२९-०० ०-५८-०० ०.५५-०० ०.५६-०० ०-१२-०० ०.३१-०० ०-३१-०० ०-०३-०० ०-६३-०० ०-२१-०० ०-११-०० १-७१-०० ०-२३-०० १-२५-०० ०.०६-०० ०-२०-०० १-३३-०० ०-२२-०० ०-०७-०० ०-१०-०० ०-१८-०० ०-६०.०० ०-२०.००

एकूण क्षेत्र

२३-४५-४०

भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

अनुसूची – दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव - कार्यकारी अभियंता, लघुसिचंन (जलसंधारण) विभाग, कुवारबांव रत्नागिरी.

प्रकल्पाच्या कार्याचे वर्णन - मौजे-आरगाव, ता.लांजा येथील बुडीत क्षेत्र धरणतळ सांडवा, प्रवेश पुच्छ कालव्यासाठी.

समाजाला मिळणारे लाभ - साठवण तलावामुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होत असून सार्वजनिक हितासाठी शेतीचा विकास होईल.

अनुसूची – तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे–

लघुपाटबंधारे योजना आरगाव, ता. लांजा येथील प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्र धरणतळ, प्रवेश पुच्छ कालव्यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. तसेच बाधित क्षेत्रात निवासी जागेचा अंतर्भाव होत नाही. म्हणून बाधित कुटुंबाच्या विस्थापनाचा व पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची – चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

क्रमांक/२४०/२०-२०२१ दिनांक २७ नोव्हेंबर २०२० अन्वये दिलेल्या पत्रानुसार आरगाव येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र धरणतळ व सांडवा प्रवेश व पुच्छ कालवा इ.साठी भूसंपादन केल्याने सामाजिक दृष्टया कोणताही सामाजिक दुष्परिणाम दिसून येत नाही. आम्ही सामाजिक निर्धारण पथकाने केलेल्या अभ्यासाअंती बहुतांश लोकांची संमती असल्याचे आढळून आहे. या प्रकल्पाने गावाला अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होणार असून शेतीचा विकास होईल.

अनुसूची – पाच

भूसंपादनामुळे बाधित क्षेत्रात निवासी जागेचा समावेश नसल्याने बाधित होणारी कुटुंबे नाहीत. त्यामुळे पुनर्वसन व पुनस्र्थापनेसाठी प्रशासक नेमण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

टीप.--- उक्त जमिनीच्या नकाशाचे उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे-१, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या कार्यालयात निरिक्षण करता येईल.

रत्नागिरी, दिनांक २४ डिसेंबर २०२०.

ऐश्वर्या के काळुशे, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे-१, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ ११

THE COMMISSIONER OF POLICE, GREATER MUMBAI

Order

(Under Section 144 of Criminal Procedure Code, 1973)

No. C.P./XI (6)/2266/(10)/2020.— Whereas, it is likely that terrorist / anti-national elements might make use of drones, remote controlled micro-light aircrafts, aerial missiles, para-gliders in their attacks and thereby target VVIPs, endangering the life of public at large, destroy public property and cause disturbance to law and order in the Brihanmumbai Police Commissionerate area;

2. Whereas, it has become necessary that certain restrictions should be put on the activities of such elements across the Brihanmumbai Police Commissionerate to prevent probable sabotages through such drones, remote controlled micro-light aircrafts, aerial missiles, para-gliders, for which some preventive and proactive measures needed be taken to prevent the same;

3. Therefore, I, Chaitanya. S., Dy. Commissioner of Police (Operations), Brihanmumbai and Executive Magistrate, vide powers conferred upon me under section 144 of the Criminal Procedure Code, 1973 (Act II of 1974), do hereby order that no flying activities of drone, remote controlled micro-light aircrafts, aerial missiles, para-gliders, etc. shall be allowed in the jurisdiction of Brihanmumbai Police Commissionerate for the period of next 30 Days, i.e. from 31st December 2020 to 29th January 2021 except for aerial surveillance by Mumbai Police or by specific permission in writing by Dy. Commissioner of Police (Operations), Brihanmumbai.

4. This order shall remain in force with effect 00-01 hrs. of 31st December 2020 till 24-00 hrs. of 29th January 2021 unless withdrawn earlier.

5. Any person contravening this order shall be punishable under section 188 of the Indian Penal Code, 1860.

6. As the notice cannot be served individually to all concerned, the order is hereby passed ex-parte. It shall be published for the information of public, through press and by affixing copies on the Notice Boards of the police stations, Divisional ACsP, Zonal DCsP, Municipal Ward offices, and by affixing copies at Tahsil and Ward offices.

Given under my hand and seal on the 28th day of the December 2020.

CHAITANYA. S.,

Dy. Commissioner of Police (Operations),

and Executive Magistrate, Greater Mumbai.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, RAILWAYS, MUMBAI

Order

No. C.P./RLY/MUMBAI/PROHIBIT ACTS/2020-24.— Whereas, I consider it necessary for the preservation of public peace and public safety in Mumbai Railway Police Commissionerate. I, Ravindra Sengaonkar, Commissioner of Police, Railways, Mumbai in exercise of the power conferred upon me under sub-sections (1), (2) and (3) of section 37 of the Maharashtra Police Act,1951 ( Mah.Act XXII of 1951) do hereby prohibit the following acts throughout Mumbai Railway Police Commissionerate for the period from 00-01 hours of 30th December 2020 to 24-00 hrs. of 13th January 2021.

1. (a) The carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed gun, knives, sticks or lathis or any other articles which is capable of being used for causing physical harms (violence). Save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority.

(b) The carrying of any corrosive substance or explosive.

(c) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles.

(d) The exhibition of persons or corpses or figures of effigies thereof.

(e) The public utterance of cries, singing of song, playing of music.

(f) Delivery of harangues, the use of gestures or mimetic, representations and the preparations, exhibition or dissemination of pictures, symbols, play cards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Mumbai Railway Commissionerate offend against decency or morality or undermine the security of or tend to over-throw the state.

2. If any persons goes armed with such article or carrying any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition he shall be liable to be disarmed of the corrosive substance or explosive or missile shall be liable to seized from him by any police officer and the article corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.

3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc. employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3 1/2 feet.

4. Notwithstanding the expiration of this order after the period herein above mentioned.

(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed, as if this order had not expired.

5. I further direct that this order shall be published and promulgated in Mumbai Railway Police Commissionerate by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through Railway announcement system, loudspeakers or megaphone, as well as publishing through media.

Given under my hand and seal this 28th December 2020.

RAVINDRA SENGAONKAR,

Commissioner of Police,

Railways, Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ १३

पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांजकडून

सुधारीत मनाई आदेश

क्रमांक कोरोना/मनाई आदेश/४५३२/२०२०.— ज्याअर्थी, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, नवी मुंबई शहरात गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणू (COVID 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे.

ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंडमध्ये. कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणुचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार ब्रिटनपुरता मर्यादित न राहता इटली, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत फैलावला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना विषाणु हा अगोदर आढळलेल्या कोरोना विषाणुपेक्षा ७० टक्के अधिक घातक व वेगाने फैलावतो आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन नोटिफिकेशन क्र. DMU/2020/CR.92/DisM-1,dated 21st December 2020, अन्वये दिनांक ५ जानेवारी २०२१ पयर्ंत नाईट कफ्यर्ू लागू केलेला आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक ३ अन्वये नवी मुंबई आयुक्तालयातील नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मनाई आदेश लागू करण्यात आला होता. परंतु संदर्भ क्रमांक २ अन्वये मा. मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सुधारित आदेश प्राप्त झाल्याने त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ खालील तरतुदीच्या अनुषंगाने जनतेस खालील व्यक्ती आस्थापना यांना उद्देशुन सुधारित मनाई आदेश काढणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झाली आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये उप विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक ३ मधील पान क्र. ४ मधील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चा क्र.एमएससी १२७४/फि-एफ मधील आदेशाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ ( १९७४चा II )चे कलम २१ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करून कलम १४४ चे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत.

त्याअर्थी, मी, डॉ. जय जाधव, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे प्राधिकृत अधिकारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रकिया संहिता कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई आदेश परिच्छेद क्र. ५ मधील नमूद सुचनांच्या अधीन राहून दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजीचे २३-०० वा. पासून दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजीचे २४-०० वा. चे दरम्यान १५ दिवसांकरिता प्रतिबंधात्मक आदेश संदर्भ क्रमांक ३ अन्वये लागू करण्यात आले आहेत.

सदरचे आदेशामध्ये संदर्भ क्रमांक २ अन्वये पुढील आदेश अंतभर्ूत करण्यात येत आहे :—

रात्रीच्या संचारबंदिच्या दरम्यान २३-०० वा. पासून ते दुसरे दिवशी सकाळी ०६-०० वाजेपयर्ंत ५ पेक्षा अधिक इसम एकत्र जमणार नाहीत.

उपरोक्त ठिकाणे / कार्यक्रम येथील संबंधित ट्रस्टी व आस्थापना व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी दिलेला आहे.

डॉ. जय जाधव, पोलीस सहआयुक्त, नवी मुंबई.

भाग एक (को.वि.पु.)-----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

पोलीस आयुक्तालय, मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार यांजकडून

अधिसूचना

क्रमांक पो.उप.आ.मुख्या./मनाई आदेश/०९/२०२१.— ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी मकरसंक्रांती हा सण साजरा होणार आहे, तसेच दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक नियोजित असून दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.

ज्याअर्थी, मी, विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) पोलीस आयुक्तालयाकडील क्रमांक/पो.आ.वा./अधि.प्रधान/आदेश/३०/ २०२०, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० अन्वये, मा. पोलीस आयुक्त यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) चे वापरावयाचे अधिकार आम्हास प्रदान करण्यात आले आहेत.

मिरा-भाइर्ंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील मिरारोड, काशिमिरा, नवघर, नयानगर, भाइर्ंदर, उत्तन, वसई, माणिकपुर, वालीव, नालासोपारा, तुळींज, विरार व अर्नाळा असे एकूण १३ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय), मिरा-भाइर्ंदर वसई-विरार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (१) व (३) अन्वये जिवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :----

शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

१. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे.

२. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

३. व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

४. सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वादय वाजवणे.

५. सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथुन पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रर्दशित करणे.

६. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाही.

" जो कोणी इसम सरकारी नोकर आहे किंवा ज्यास वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्र घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकायाने सुट दिलेली आहे. "

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत.

१. लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

२. प्रेतयाञा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

३. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेरी येथे जमलेले लोक.

४. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला समुदाय.

५. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकायांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

६. सर्व शासकीय/ निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडत असलेले ठिकाण.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ १५

सदर मनाई आदेश दिनांक ८ जानेवारी २०२१ रोजी ००.०० वाजेपासून दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजीचे २४.०० वाजेपयर्ंत अंमलात राहील.

वरील मनाई आदेशाचा भंग करणाया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

वसई-विरार, दिनांक ५ जानेवारी २०२१.

विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्या.), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय.

भाग एक (को.वि.पु.)-----३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

पोलीस आयुक्त ठाणे शहर यांजकडून

आदेश

क्रमांक विशा/ग्रा.प.नि/निवडणूक/मनाई आदेश/२६/२०२०.— ज्याअर्थी उपोद्घातातील अ. क्र. १ मधील अधिसूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने, माहे एप्रिल व डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाया तसेच, नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक होणार असुन, ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे तालुक्यातील (१) नागाव, (२) नारीवली, (३) दहीसर, (४) पिंपरी, (५) वाकळन, भिवंडी तालुक्यातील (१) दापोडे, (२) अलिमघर, (३) दिवे-अंजुर, (४) सुरई-सारंग, (५) वळ, (६) पुर्णा, (७) काल्हेर, (८) भरोडी, (९) गुंदवली, (१०) मानकोली, (११) ओवळी, (१२) अंजुर, (१३) वेहळे, (१४) सरवली, (१५) पिंपळनेर, (१६) पिंपळास, कल्याण तालुक्यातील (१) खोणी वडवली, (२) वडवली शिरढोण व अंबरनाथ तालुक्यातील (१) पोसरी, (२) खरड, (३) मांगरूळ, (४) नेवाळी, (५) उसाटणे, (६) बुदर्ुल, (७) हाजीमलंग वाडी, (८) नाहेण, (९) काकोळे या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून आदर्श आचारसंहिता दिनाक ११ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री १२-०० वाजल्यापासून लागू झालेली असून दिनांक २३ डिसेंबर २०२० ते दिनांक ३० डिसेंबर २०२० या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करणे व दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी होऊन दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी पयर्ंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक असून, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक ४ जानेवारी २०२१, दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान व दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी पूर्ण होणार आहे.

अशावेळी नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याच्या ठिकाणी निवडणूक संबंधाने राजकीय पक्ष आपआपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस मोठया प्रमाणावर एकत्र येण्याची शक्यता आहे. सदर ठिकाणांच्या प्रांगणात कॉर्नर मिटींग, सभा, पत्रकार परिषद, इत्यादी सारखे कार्यक्रम निवडणूक संबंधाने घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन सदर ठिकाणची शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी " विवेक फणसळकर " पोलीस आयुक्त, ठाणे मला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम, १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार अशा ठिकाणांच्या कार्यालयाच्या १०० मीटर चहुबाजुकडील परिसरात कोणत्याही पक्षाचे/संघटनेचे पदाधिकारी/कार्यकर्ते आणि प्रतिनिधी किंवा इतर व्यक्ती यांना निवडणूक संबंधाने सभा/बैठक/पत्रकार परिषद आदी कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करीत आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशन अर्ज दाखल करणाया उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार व त्याच्या सोबत दोन व्यक्ती यांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाया उमेदवारास नमूद ठिकाणच्या कार्यालयाच्या १०० मीटर चहुबाजुकडील परिसरात फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात येत असून तीन पेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

वरील आदेशाचे कोणीही व्यक्तीने उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीविरूद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम, १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदर आदेश दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी ००-०१ पासून दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी २४-०० वा. पयर्ंत अंमलात राहील.

सदर आदेश शासकीय कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच शासकीय/निमशासकीय, निवडणूक कामाशी संबंधित शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांना लागू होणार नाही.

सदरचा आदेश माझ्या सही व शिक्यानिशी आज दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी ठाणे येथे जारी करण्यात आला आहे.

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

भाग एक (को.वि.पु.)-----१अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ १७

पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांजकडून

मनाई आदेश

क्रमांक कोरोना/मनाई आदेश/४५१२/२०२०.—ज्याअर्थी, जागतिक, आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, नवी मुंबई शहरात गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणू (COVID 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७, दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे.

ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणुचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार ब्रिटनपुरता मर्यादित न राहता इटली, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत फैलावला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना विषाणू हा अगोदर आढळलेल्या कोरोना विषाणुपेक्षा ७० टक्के अधिक घातक व वेगाने फैलावतो आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन नोटिफिकेशन क्र. DMU/ 2020/CR.92/DisM-1, dated the 21st December 2020. अन्वये दिनांक ५ जानेवारी २०२१ पयर्ंत नाईट कफ्यर्ु लागू केलेला आहे. त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम, १४४ खालील तरतुदीच्या अनुषंगाने जनतेस खालील व्यक्ती आस्थापना यांना उद्देशून आदेश काढणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झाली आहे.

(२) ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग - १ मध्ये उप विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक ३ मधील पान क्र. ४ मधील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चा क्र. एमएससी १२७४/ फि-एफ मधील आदेशाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ (II १९७४)चे कलम २१ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करून कलम, १४४ चे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत.

(३) त्याअर्थी, मी डॉ. जय जाधव पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दिनांक १ एप्रिल १९७४ चे अधिसूचनेद्वारे प्राधिकृत अधिकारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम, १४४ (१) (३) अन्वये मनाई आदेश परिच्छेद क्र. ५ मधील नमुद सुचनांच्या अधिन राहून दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजीचे २३-०० वा. पासून दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजीचे २४-०० वा. चे दरम्यान १५ दिवसांकरिता खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र व पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्री २३-०० वा. पासुन ते सकाळी ०६-०० वाजेपयर्ंत संचारबंदी लागू राहील.

• संचारबंदी कालावधीत खालील बाबी चालू राहणार नाहीत.

➢ सर्व प्रकारच्या आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणे, विरंगुळयासाठी फिरणे, सायकल, मोटारसायकल, मोटार वाहनातून विनाकारण फेरफटका मारणे, अनावश्यक व विनाकारण होणारी वाहतूक.

➢ इमारतीच्या किंवा सोसायटीच्या आवारात किंवा गच्ची येथे साजरे होणारे खाजगी समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा, हॉटेल आस्थापना, पब्ज, क्लब, रिसॉर्ट इत्यादी.

➢ नमुद कालावधीत धर्ामिक उत्सव किंवा कार्यक्रम साजरा करावयाचा असल्यास कार्यक्रम आयोजकांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून त्याबाबत विशेष परवानगी घेणे आवश्यक राहील.

• संचारबंदी कालावधीत खालील बाबी चालू राहतील.

➢ सदर आदेशामुळे यापुर्वी शासनाने ज्या आस्थापना सुरू ठेवणेबाबत परवानगी दिलेली आहे त्या वैद्यकिय सेवा पुरविणाया आस्थापना, अत्यावश्यक सेवा बजाविणारे, अत्यावश्यक किंवा तातडीची वैद्यकिय गरज तसेच अत्यावश्यक सेवा उदा. दुध, भाजीपाला यांची वाहतूक व पुरवठा इत्यादी.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२

(४) सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

(५) उपरोक्त ठिकाणे / कार्यक्रम येथील संबंधित ट्रस्टी व आस्थापना व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रकिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहायक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदरचा आदेश माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी दिलेला आहे.

डॉ. जय जाधव, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३०, शके १९४२ १९

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांजकडून

जाहीर सूचना

क्रमांक ०१/सीपी/कक्ष-१०(श. व दा.)/विल्हेवाट/२०२०.----पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी शस्त्र कायदा, १९५९ मधील कलम-२१ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि शस्त्र अधिनियम, २०१६ मधील नियम क्रमांक ४७, १०३, १०४ अंतर्गत तरतुदीच्या अधीन राहून सन १९५३ ते सन १९८० या कालावधीत पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे कार्यालयातील शस्त्रागारात सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्यात आलेल्या खालील नमूद १४ शस्त्रांची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने सदर शस्त्रे शासनजमा करण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यवाहीमुळे ज्यांच्यावर परिणाम होण्याचा संभव असेल अशा नमूद १४ शस्त्रांबाबत संबंधित व्यक्तींच्या हरकती याद्वारे मागविण्यात येत आहेत. या विषयी सर्व संबंधित व्यक्तींनी सदरची नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत त्यांच्या हरकती पोलीस उप आयुक्त, मुख्यालय-१, मुंबई यांचेकडे नोंदवाव्या. उक्त नमूद कायद्याच्या कलम २१ मधील पोट-कलम ४ सह नियम ४७ मधील पोट-नियम (७) अन्वये सदरची नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून हरकती ३० दिवसांत प्राप्त न झाल्यास सदर शस्त्रांची विल्हेवाट लावण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येईल.

सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्यात आलेल्या शस्त्रांची विल्हेवाट लावण्याकरीता शासनजमा करण्यात येणाया

शस्त्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे

अ. क्र. सुरक्षा ठेव वर्ष

शस्त्र जमा करणायाचे नाव

शस्त्राचा प्रकार क्रमांक

(१) (२) (३)

(४)

(५) १ 338 20.09.1961 ए. एच. शेख, बरमन कमरुद्दीन स्ट्रीट, मुंबई (१) .315 बोर SBBL रायफल क्रमांक 10064 (मॅचे) २ 951 26.11.1968 सिताराम एच. चव्हाण, C/o. एन. आर. गोष्टे, (१) 12 बोर SBBL गन क्र. 1108 व्हिक्टोरिया मेमोरियल, ताडदेव, मुंबई.

३ 1234 04.1972 एस. एस. जाधव, न्यु. म्युनिसिपल नं. ५/८, (१) 12 बोर DBBL गन क्र. नाही बापुराव जगताप मार्ग, मुंबई ११.

४ 1257 18.07.1975 एफ. ए. अलमेडा हाऊस नं. १२१, विलेपार्ले, मुंबई ५६ (१) 12 बोर DBBL गन क्र. 142111 ५ 1940 06.03.1980 महमद रसिया दरवान, खेतवाडी, मुंबई ०४ (१) 12 बोर DBBL गन क्र. 901174 ६ 1944 01.04.1980 एस. क्रेडिबोट, लेक व्ू, मरोळ, मुंबई ५९ (१) 12 बोर DBBL गन क्र. 01

आर्मी व नेव्ही

७ 1968 14.10.1980 ए. सी. सोमण, सोमण हाऊस, वाधवाणी व्हिलेज, (१) .30 बोर रायफल क्र. 765940 चेंबूर, मुंबई.

८ 2032 पी. बी. गुप्ता, १९५/१५, बालाजी गरोडीया नगर, (१) 12 बोर DBBL गन क्र. 5104/ घाटकोपर, मुंबई ७७.

इटली.

९ 1976 20.12.1980 रामजननी बराहबुद्दीन शेख, ग्रीन फिल्ड, पहिला माळा, (१) 12 बोर DBBL गन क्र. 42775/ प्लॉट नं. ८, खैरानी पार्क, मुंबई १२. B.S.A.

१० 905/ 1964 श्री. जे. एच. कामा, २४/२६, छल्ज्ञल् स्ट्रीट, मुंबई-१ (१) .30 बोर पिस्टोल स्टार्टर पिस्टोल क्रमांक 21.08.1964

नाही संपूर्ण खराब. मॅग्झिन नाही.

११ 1176/ 1969 एफ. डी. बाटलीवाला, ""डी"" ब्लॉक, मफतलाल पार्क, (१) .38 बोर रिव्हॉल्व्हर क्र. 477587/ 15.06.1969 वॉर्डन रोड, मुंबई. H & R, बॅरेल रस्सी.

१२ 1231/ 1970 ए. डी. सबनीस, ""सी/१३"", गणेश दर्शन, गोल्डन रोड, (१) .38 बोर रिव्हॉल्व्हर क्र. 566705/ 03.03.1970 मुंबई ७.

बॅरेल रस्सी.

१३ 1645/ 1975 ताराचंद मेहता आणि कंपनी, बी/३५, सिताराम बिल्डींग, (१) .22 बोर रिव्हॉल्व्हर क्र. 19145/ 10.10.1975 मुंबई ३. H & R, बॅरेल रस्सी.

10.12.1976

१४ 1737/ 1976 एफ. डी. रूची, एफ १५, विरेंद्र बिजे रोड, बांद्रा, मुंबई ५० (१) .38 बोर पिस्टोल क्र. 30815/कोल्ट, बॅरेल रस्सी अॅक्शन जाम, एक ग्रीप नाही.

बृहन्मुंबई, दिनांक ३१ डिसेंबर २०२०.

एन. अंबिका, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय १, बृहन्मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.