महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ६] सोमवार, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
क्रमांक उपजिभूक्र. ७/भूसं/मुंउजि/एलएक्यू ८४२-ए/२०२१.----- मौजे विक्रोळी, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर येथील " भूमिसंपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ " अंतर्गत न.भू.क्र. ५१अ व १अ चे भूसंपादन.
ज्याअर्थी, मौजे विक्रोळी, तालुका कुर्ला येथील न.भू.क्र. ५१अ व १अ या जमिनीचे ३९,२५२ चौ.मी. क्षेत्र " मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प " करिता संपादन करणेचा प्रस्ताव नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि. कडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही करणेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक १० जून २०१९ रोजीचे आदेशान्वये उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ७ यांना प्राधिकृत केले आहे. प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ रोजी व कलम १९ (१) ची अधिसूचना दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
आणि ज्याअर्थी, भू्मिसंपादन अधिनियम, २०१३ चे कलम २५ मधील परंतुकान्वये जिल्हाधिकारी कलम १९ अन्वये घोषणा प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांच्या कालावधीत निवाडा देईल आणि जर त्या कालावधीत निवाडा देण्यात आला नाही तर, जमीन संपादनाची संपूर्ण कार्यवाही रद्द होईल. परंतु त्याचे समर्थन करणारी परिस्थिती अस्तित्वात असेल तर, समुचित शासनाला १२ महिन्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा अधिकार असेल.
आणि ज्याअर्थी, प्रारूप निवाडा मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांसकडे मंजुरीसाठी सादर केला असून अद्याप मंजुरी प्राप्त झालेली नाही. तरी कलम १९(१) ची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १२ महिन्यांचा कालावधीत म्हणजेच दिनांक २० जानेवारी २०२१ पयर्ंत निवाडा जाहीर करणे शक्य नाही. प्रकरणी सद्य:स्थितीत सदर वाढीव मुदत न दिल्यामुळे जर हा निवाडा रद्द झाला तर सदर प्रकरणात पुन्हा कलम १९ ची अधिसूचना प्रसिद्धी, संयुक्त मोजणी, प्रारूप निवाडा, अंतिम निवाडा ही कार्यवाही करण्यासाठी वेळ जाऊन शासनाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याअर्थी, उपरोक्त कलम २५ च्या अधिसूचनेद्वारे प्राप्त वाढीव कालावधीच्या मुदतीत झालेल्या विलंबास समर्थन करणारी परिस्थिती असून सदर मुदतीत निवाडा करणे शक्य नसल्याची माझी खात्री झाली असून समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, या नात्याने प्रकरणात १२ महिन्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा असलेला अधिकार वापरून खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण्यास १२(बारा) महिन्यांची वाढीव मुदत मंजूर करत आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ अनुसूची--एक जमिनीचे वर्णनमौजे विक्रोळी, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर
अ.क्र. न.भू.क्र. आवश्यक जमिनीचे क्षेत्र (चौ.मी.)
(१) (२) (३)
१ ५१अ १५१४९.६०
२ १अ २४१०२.४०
एकूण . . ३९२५२.००
सार्वजनिक प्रयोजन.---" मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प " करिता भूसंपादन.
मिलिंद बोरीकर,
मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२१.
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.