Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly)(Jan. 28-Feb. 3, 2021)

Published 28 January 2021

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31743

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार - ब

गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ फेब्रुवारी ३, २०२१/माघ ८-१४ , शके १९ ४२

वर्ष ७, अंक ४ ]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ जानेवारी २०२१

वाचा: शासन आदेश समक्रमांक , दिनांक २४ जानेवारी २०२० व १० जुलै २०२० .

शासन आदेश

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन ) अधिनियम , १ ९ ६३ आणि नियम, १ ९ ६७ .

क्रमांक कृबास-०१२० / प्र.क्र . १ ९ / २१-स. ज्याअर्थी, कोरोना विषाणू ( कोविड-१ ९ ) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता , कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात दिनांक २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू होता , त्यामध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली होती . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी न होता , वाढत जाऊन कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती . कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी असलेल्या अनेक उपायांत Social Distance पाळणे महत्त्वाचे व आवश्यक असल्यामुळे , राज्यातील ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका नियत झाल्या आहेत अशा कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका दिनांक १० जुलै २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत .

ज्याअर्थी , कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्यात प्रबळ अंमलबजावणी सुरू आहे . तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार आहे . कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीकरिता, ग्रामपंचायत सदस्य आणि कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था येथून निवडून आलेले सदस्य हे मतदार आहेत. परंतु, या कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था यांच्या निवडणूका दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणूका घेणे उचित होणार आहे .

(१)

भाग चार-ब-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ फेब्रुवारी ३ , २०२१ / माघ ८-१४, शके १९ ४२ ज्याअर्थी , महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन ( विकास व विनियमन ) अधिनियम , १ ९ ६३ मधील कलम ५ ९ मध्ये शासनास प्राप्त अधिकारानुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचे अधिकार शासनास आहेत . तसेच कोरोना विषाणू (कोविड-१ ९ ) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, सध्या विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्यात गंभीर अंमलबजावणी सुरू आहे. तसेच राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषि पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था यांच्या निवडणूका दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेता राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका पुढे ढकलणे क्रमप्राप्त झाले असल्याचे शासनाचे मत झाले आहे .

त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन ( विकास व विनयमन ) अधिनियम, १ ९ ६३ मधील कलम ५ ९ च्या तरतुदीअन्वये प्राप्त अधिकारांनुसार महाराष्ट्र शासन असे आदेश देत आहे की,-

" ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका नियत झाल्या आहेत. अशा कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका दिनांक २४ जानेवारी २०२१ पासून आणखी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात येत आहेत. "

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

का. गो. वळवी, शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 . EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.