महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७, अंक ६] बुधवार, फेब्रुवारी ३, २०२१ / माघ १४, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
तळा नगरपंचायत, तळा
जाहीर सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३(१) नुसार तळा
नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.
क्रमांक ७३/२०२०-२१
शासनाने नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एमयुपी-२०१४/प्र.क्र.२०६/नवि-१९, दिनांक २६ जून २०१५ अन्वये नगरपंचायत स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) अन्वये नगरपंचायत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.
सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) अन्वये तळा नगरपंचायतीने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी ठराव क्र. १ दिनांक १ फेब्रुवारी २०२१ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) नुसार तळा नगरपंचायतीचा विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.
ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, तळा नगरपंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात विकास योजना तयार करताना त्या सूचना/ हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ३, २०२१ / माघ १४, शके १९४२ TALA NAGARPANCHAYAT, TALA NoticeDeclaration of Internation to prepare Development Plan of Tala Nagarpanchayat as per
section 23 (1) read with section 21 (2) of Maharashtra Regional and Town Planning
Act, 1966.
No. 73/2020-21
Government of Maharashtra in Urban Development Department, vide it's Notification No. Urban Development Department MUP-2014/206/Navi-19, Date 26th June 2015 Constituted Tala Nagarpanchayat It is necessary to prepare the Development Plan for the area of Nagarpanchayat as per section 21 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 For planned Development of the said area.
Hence, the Tala Nagarpanchayat by its resolution No.01 Dated 1st February 2021 has given consent to declare its intention to prepare Development plan, as per provision of section 23 (1) read with section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Accordingly, this notice is being published.
The Plan Showing boundary of the area included in Development Plan of Tala Nagarpanchayat is kept open for inspection by the public on office working days during office hours at the office of the Nagarpanchayat, as required under section 23 (2) of the Maharashtra Regional & Town Planning Act,1966.
Any suggestion/objection of the public in this regard may be forwarded in writing to the Chief Officer Tala Nagarpanchayat within a period of 60 (sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette. The suggestion/objection shall be duly considered while preparing the Development Plan.
SMT. MADHURI P. MADKE, Chief Officer,
Place : Tala, dated the 2nd February 2021. Tala Nagarpanchayat, Tala.