Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (मउवि) असा. क्र. 4 (03-02-2021) सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक डीआयपी-2021/प्र.क्र. 17/30, माजी मंत्री श्री. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाबाबत.

Published 03 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31745

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग

बुधवार , फेब्रुवारी ३ , २०२१/ माघ १४ , शके १९ ४२

वर्ष ७ , अंक ४]

[पृष्ठे २, किंमत: रुपये ४.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ फेब्रुवारी २०२१

अधिसूचना

क्र.डीआयपी -२०२१/प्र.क्र.१७/३०.- " माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री. विलासराव पाटील -उंडाळकर यांचे सोमवार, दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी सातारा येथे झालेल्या दुःखद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रध्दांजली अर्पण केली.

माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री . विलासराव पाटील- उंडाळकर यांचे सोमवार, दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी सातारा येथे निधन झाले. श्री . विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे . त्यांच्या निधनाने राज्याच्या कृषी, सहकार , ग्रामविकास यांसह सामान्यांच्या जीवनाशी निगडीत अशा विविध विषयांतील गाढा अभ्यास असणारे अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे.

श्री. पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील उंडाळे (ता. कराड) येथे १५ जुलै १ ९ ३८ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. वडील आणि थोर स्वातंत्र्यसेनानी बाळकृष्ण तथा दादासाहेब उंडाळकर यांच्याकडून त्यांनी समाजकारणाचा वारसा घेतला. त्यांचे शिक्षण बी.ए. ,एलएल. बी. असे झाले होते. त्यांनी ग्रामीण शिक्षण संस्था उंडाळेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले. स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीतर्फे मुलींचे वसतिगृह सुरू केले. श्री. पाटील १९ ६७ ते १ ९ ७२ सातारा जिल्हा परिषदेचे आणि १ ९ ६८ ते १ ९ ७२ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे अधिसभा सदस्य होते . १ ९ ६८ पासून ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. तसेच श्री. पाटील यांनी या बँकेचे १ ९ ७० ते १ ९ ७६ व १ ९ ७७ ते १ ९ ८० या कालावधीत उपाध्यक्षपद आणि १ ९ ८० ते १९ ८२ अध्यक्षपद भूषविले होते . ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचेही संचालक होते. कराड तालुक्यातील शेवाळवाडी येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी संस्थापक- अध्यक्ष म्हणून मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे राज्यस्तरीय अधिवेशन, विविध साहित्य संमेलने, कृषी प्रदर्शने तसेच, अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रम, उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.

श्री. पाटील यांनी १ ९ ८० ते २०१४ असा प्रदीर्घ काळ म्हणजेच सलग सात वेळा निवडून येऊन कराड दक्षिण मतदारसंघाचे विधानसभा सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात जून १ ९९ १ ते नोव्हेंबर १ ९९ २ पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री , नोव्हेंबर १ ९९ २ ते मार्च १ ९९ ३ पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय व माजी सैनिकांचे कल्याण खात्याचे मंत्री आणि ऑक्टोबर १ ९९९ ते जानेवारी २००३ विधि व न्याय , पुनर्वसन व मदत कार्य, माजी सैनिकांचे कल्याण खात्यांचे मंत्री त्याचप्रमाणे जानेवारी २००३ ते जुलै २००४ वस्त्रोद्योग , पुनर्वसन आणि माजी सैनिकांचे कल्याण खात्यांचे मंत्री व जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ या कालावधीत सहकार खात्याचे मंत्रीपद भूषविले होते.

भाग एक (म.उ.वि. )-४--१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक मध्य उप- विभाग , फेब्रुवारी ३ , २०२१/माघ १४ , शके १ ९ ४२ श्री. विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दुःख व्यक्त करीत आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे . त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची ताकद पाटील कुटुंबीयांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. "

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय कुमार, मुख्यसचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.