महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक १७] सोमवार, फेब्रुवारी ८, २०२१/माघ १९, शके १९४२ [पृष्ठ १, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४३ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ अधिसूचना
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक सेप्रनि-२०२०/प्र.क्र.११३/गृनिभू. — महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (१९७७ चा महा.२८) यांच्या कलम १८४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एक) आणि कलम १९ च्या पोट-कलम (५) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा तसेच त्याबाबतीत समर्थ करणाया सर्व इतर अधिकारांचा वापर करून व याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील " भू-व्यवस्थापक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ " या पदावरील सेवा प्रवेश विनियमित करणारे पुढील नियम करीत आहे, ते असे :—
१. या नियमांना, " महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील भूव्यवस्थापक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (सेवा प्रवेश) नियम, २०२०" असे म्हणावे.
२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, — (अ) " शासन " याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे. (ब) " प्राधिकरण " म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (१९७७ चा महा. २८) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण.
(क) " विभाग " म्हणजे महाराष्ट्र शासनाचा गृहनिर्माण विभाग असा आहे.
३. प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "भू-व्यवस्थापक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ" या पदावरील नियुक्ती, महसूल विभागातील जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख किंवा तत्सम समकक्ष पदावर कार्यरत असणाया अधिकायामधून, शासनाच्या प्रतिनियुक्ती धोरणानुसार तसेच विभागाने वेळोवेळी शासन निर्णय/ परिपत्रक/ आदेश इत्यादी अन्वये विहित केलेल्या प्रतिनियुक्तीच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.
शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागाकडून अथवा कार्यालयाकडून या पदावर गृहनिर्माण विभागाच्या मान्यतेशिवाय/ संमतीशिवाय परस्पर नियुक्ती देता येणार नाही.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. कों. धनावडे, शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब-४३-१ (१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.