Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Extra Ordinary Gazette No. 2, Dated 9th February 2021 Revenue and Forests Department, Maharashtra Ordinance No. I of 2021

Published 09 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, फेब्रुवारी ९, २०२१/माघ २०, शके १९४२ १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ७, अंक २] मंगळवार, फेब्रुवारी ९, २०२१/माघ २०, शके १९४२ [पृष्ठे ५, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १.------ महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश पृष्ठे १-५

महसूल व वन विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्रुवारी २०२१.

MAHARASHTRA ORDINANCE No. I OF 2021.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STAMP ACT.

सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही;

१९५८ चा ६०.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे;

(१)भाग चार-२---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, फेब्रुवारी ९, २०२१/माघ २०, शके १९४२ त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राीकरण) अध्यादेश, २०२१, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

१९५८ चा ६०.

२. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (यात यापुढे ज्याचा निर्देश, "मुख्य अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ५ ऐवजी, पुढील कलम दाखल करण्यात येईल आणि ते, ११ ऑगस्ट २०१५ पासून दाखल करण्यात आल्याचे मानण्यात येईल :-----

सन १९५८ चा अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम ५ याऐवजी नवीन कलम दाखल करणे. अनेक विविध बाबींशी किंवा व्यवहारांशी संबंधित असणारे संलेख.

""५. अनेक विविध बाबींचा किंवा संव्यवहारांचा समावेश असणाया किंवा अशा बाबींशी किंवा संव्यवहारांशी संबंधित असणाया कोणत्याही संलेखावर, अशा बाबींपैकी किंवा संव्यवहारांपैकी एका बाबीचा किंवा संव्यवहाराचा समावेश असणाया अथवा एका बाबीशी किंवा संव्यवहाराशी संबंधित असणाया, प्रत्येक स्वतंत्र संलेखावर, या अधिनियमान्वये जी शुल्के आकारण्यायोग्य असतील त्या शुल्कांची एकुणातील रक्कम आकारण्यात येईल."".

३. मुख्य अधिनियमाच्या अनुसूची एक मधील,-----

(क) अनुच्छेद ६ मध्ये,-----

सन १९५८ चा अधिनियम क्रमांक ६० याच्या अनुसूची एकची सुधारणा.

(एक) खंड (१) मधील, उप-खंड (ब) मधील, स्तंभ (२) मध्ये, ''०.२ टक्के '' या मजकुराऐवजी, ''०.३ टक्के '' हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) खंड (२) मधील, उप-खंड (ब) मधील, स्तंभ (२) मध्ये, ''०.२ टक्के '' या मजकुराऐवजी, ''०.३ टक्के '' हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(तीन) खंड (२) नंतर, पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल :-----

"(३) या अनुच्छेदांतर्गत येणारा संलेख, पाचशे रुपये.";

जेव्हा सांपर्ाशि्वक किंवा सहाय्यकारी किंवा अतिरिक्त प्रतिभूती म्हणून निष्पादित केला असेल तेव्हा आणि जेव्हा या अनुच्छेदांतर्गत प्रमुख किंवा मूळ प्रतिभूतीवर योग्य शुल्क प्रदान करण्यात आले असेल त्याबाबतीत.

(ख) अनुच्छेद ४० मध्ये, खंड (ब) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-----

"(ब) जेव्हा उपरोक्तप्रमाणे कब्जा दिलेला नसेल किंवा देण्याचे मान्य केले नसेल तेव्हा,-----

(एक) जर अशा विलेखाद्वारे प्रतिभूत केलेली शंभर रुपयांच्या किमान मर्यादेस अधीन रक्कम पाच लाख रुपयांहून अधिक नसेल राहून, अशा विलेखाद्वारे प्रतिभूत केलेल्या तर,

रकमेच्या ०.१ टक्के ;

(दोन) इतर कोणत्याही प्रकरणी, दहा लाख रुपयांच्या कमाल मर्यादेस

अधीन राहून, अशा विलेखाद्वारे प्रतिभूत केलेल्या रकमेच्या ०.३ टक्के.".

विधिग्राीकरण. ४. (१) कोणत्याही न्यायालयाचा कोणताही न्यायनिर्णय, हुकूमनामा किंवा आदेश यांमध्ये किंवा मुख्य अधिनियमामध्ये एतद्विरुद्ध काहीही अंतभर्ूत असले तरीही, मुख्य अधिनियमाच्या कलम ५ आणि अनुसूची एक मधील अनुच्छेद ६ व ४० च्या तरतुदींन्वये असे मूल्यनिर्धारण, बसवणे व वसुली या अनुषंगाने उक्त अधिनियमाखालीलमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, फेब्रुवारी ९, २०२१/माघ २०, शके १९४२ ३ २०२१ चा महा. अध्या. १

प्राधिकायांनी, केलेली किंवा करण्याचे अभिप्रेत असलेली कोणतीही कारवाई यांसह मूल्यनिर्धारित केलेले, बसविलेले आणि वसूल केलेले मुद्रांक शुल्क हे महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राीकरण) अध्यादेश, २०२१ (यात यापुढे या कलमात ज्याचा निर्देश "सुधारणा अध्यादेश" असा केला आहे) याद्वारे सुधारणा केलेल्या, उक्त कलम ५ आणि अनुच्छेद ६ व ४० च्या तरतुदी जणू काही सर्व महत्वाच्या वेळी निरंतर अंमलात होत्या असे समजून, कायद्यानुसार विधिग्रारीतीने बसविण्यात व वसूल करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि त्यानुसार,----

(अ) मुद्रांक शुल्क बसविण्याच्या आणि वसूल करण्याच्या संबंधात मुख्य अधिनियमान्वये प्राधिकायांनी केलेल्या किंवा हाती घेतलेल्या सर्व कारवाया, कार्यवाह्य किंवा गोष्टी, सर्व प्रयोजनांसाठी, मुख्य अधिनियमाच्या तरतुदींनुसार करण्यात आल्या असल्याचे किंवा हाती घेण्यात आल्या असल्याचे मानण्यात येईल;

(ब) अशाप्रकारे बसविलेल्या आणि वसूल केलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्यासाठी उक्त प्राधिकायांविरुद्ध कोणत्याही न्यायालयात कोणताही दावा किंवा इतर कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही किंवा चालविता येणार नाही;

(क) कोणतेही न्यायालय किंवा इतर कोणताही प्राधिकारी, अशाप्रकारे बसविलेल्या किंवा वसूल केलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्याचा निदेश देणाया कोणत्याही हुकूमनाम्याची किंवा आदेशाची अंमलबजावणी करणार नाही.

(२) शंका निरसनार्थ, याद्वारे, असे घोषित करण्यात येते की, पोट-कलम (१) मधील कोणत्याही गोष्टीमुळे, एखाद्या व्यक्तीला,------

(अ) पोट-कलम (१) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या मुद्रांक शुल्काच्या अशा कोणत्याही निर्धारणास, पुर्ननिर्धारणास, बसवण्यास किंवा वसुलीस, सुधारणा अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या, मुख्य अधिनियमाच्या तरतुदींनुसार हरकत घेण्यास; किंवा

(ब) सुधारणा अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या, मुख्य अधिनियमान्वये मुद्रांक शुल्काच्या मार्गाने तिच्याकडून देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक असलेल्या, मुख्य अधिनियमान्वये तिने भरणा केलेल्या कोणत्याही मुद्रांक शुल्काच्या परताव्याची मागणी करण्यास,

प्रतिबंध होतो, असा अन्वयार्थ लावण्यात येणार नाही.

भाग चार-२---२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, फेब्रुवारी ९, २०२१/माघ २०, शके १९४२

निवेदन

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा ६०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ५ मध्ये अशी तरतूद आहे की, अनेक विविध बाबींमध्ये समाविष्ट असणाया किंवा संबंधित असणाया कोणत्याही संलेखावर, अशा बाबींपैकी एक बाब समाविष्ट असणाया किंवा एका बाबीशी संबंधित असणाया प्रत्येक स्वतंत्र संलेखावर, त्या अधिनियमान्वये जी शुल्के आकारण्यायोग्य असतील, त्या शुल्कांच्या एकुणातील रक्कम आकारण्यात येईल. विभिन्न संव्यवहारांचा समावेश असणाया किंवा त्याच्याशी संबंधित असणाया संलेखाचा देखील समावेश असलेले सन २००७ मध्ये सुधारणा केलेले, गुजरात मुद्रांक अधिनियम, १९५८ चे कलम ५ माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे, २०१५ चे दिवाणी अपील क्रमांक ६०५४ यामध्ये दिलेल्या आपल्या दिनांक ११ ऑगस्ट २०१५ च्या न्यायनिर्णयामध्ये कायम करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने, २०१९ ची रीट याचिका क्रमांक ८०१४ मध्ये, उक्त अधिनियमाच्या कलम ५ चा अन्वयार्थ लावताना, दिलेल्या दिनांक ११ सप्टेंबर २०१९ च्या आदेशान्वये असा निर्णय दिला आहे की, "विभिन्न बाबी" ही संज्ञा "विभिन्न संव्यवहार" या संज्ञेशी समतुल्य आहे.

अनेक विविध संव्यवहारांचा समावेश असणाया किंवा त्याच्याशी संबंधित असणाया कोणत्याही संलेखांच्या बाबतीत, मुद्रांक शुल्क आकारण्याबद्दल उक्त कलम ५ च्या तरतुदींमध्ये स्पष्टता आणण्याच्या दृष्टीने, गुजरात मुद्रांक अधिनियम, १९५८ मध्ये केलेल्या सुधारणेच्या धर्तीवर, त्यात विशेषरीत्या "विभिन्न संव्यवहारांचा" समावेश करण्यासाठी, उक्त कलम ५ मध्ये यथोचित सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

२. मालकी हक्क विलेखांचा निक्षेप करून त्याद्वारे गहाण दर्शविणारे संलेख व साधे गहाणखत यांच्या बाबतीतील मुद्रांक शुल्क, उक्त अधिनियमाच्या अनुसूची एक मधील अनुक्रमे, अनुच्छेद ६(१) व ४० यांनुसार आकारणीयोग्य आहे. उक्त अनुच्छेद ६(१) अन्वये, संलेखावर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क हे, उक्त अनुच्छेद ४० अन्वये आकारणीयोग्य असलेल्या मुद्रांक शुल्कापेक्षा कमी आहे.

सन २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये नोंदणी केलेल्या दस्तऐवजांवरून असे निदर्शनास येते की, मालकी हक्क विलेखांचा निक्षेप करून त्याद्वारे गहाण दर्शविणाया दस्तऐवजांची संख्या वाढत आहे.

मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यातील फरकामुळे, काही वेळा दस्तऐवजांचा मसुदा अशा पद्धतीने तयार केला जातो की, दस्तऐवजाच्या नावातून, मालकी हक्क विलेखाचा निक्षेप करून त्याद्वारे गहाण केल्याचे दर्शविले जात असले तरी देखील साधे गहाण समाविष्ट करण्याचा प्रयत्न असतो. असे दस्तऐवज, उक्त अधिनियमान्वये त्यांच्या बाबतीत आकारण्यायोग्य असलेल्या योग्य मुद्रांक शुल्काची रक्कम अभिनिर्णीत करताना अडचणी निर्माण करतात.

मालकी हक्क विलेख निक्षेप करून त्याद्वारे गहाणाशी संबंधित असणाया कराराचे निष्पादन करणे शक्य होण्याच्या दृष्टीने, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ (१८८२ चा ४) याच्या कलम ५८ च्या खंड (फ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र राज्याने, वेळोवेळी विवक्षित नगरे अधिसूचित केलेली आहेत. तथापि, वाढत्या संव्यवहारांमुळे, उक्त कलम ५८ च्या खंड (फ) च्या प्रयोजनार्थ, नवीन नगरे अधिसूचित करण्याची गरज भासत असते. जेथे उक्त खंड (फ) अन्वये नगर अधिसूचित केले जात नाही तेथील नागरिकांना, मालकी हक्क विलेख निक्षेप करून त्याद्वारे गहाण करण्याऐवजी ज्यासाठी उक्त अधिनियमान्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क अधिक आहे अशा साध्या गहाण खताचे निष्पादन करण्याचा पर्याय स्वीकारण्याचा भार पडतो.

वरील वस्तुस्थिती लक्षात घेता, अनुक्रमे, उक्त अनुच्छेद ६ व ४० यांन्वये मालकी हक्क विलेख निक्षेप करून त्याद्वारे गहाण दर्शविणाया संलेखांवर व साध्या गहाण खतावर आकारणीयोग्य असलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये एकरूपता आणणे इष्ट आहे असे वाटत आहे. या प्रयोजनासाठी उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची एक मधील उक्त अनुच्छेद ६ व ४० यांमध्ये यथोचित सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, फेब्रुवारी ९, २०२१/माघ २०, शके १९४२ ५

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही, आणि, उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा ६०) यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई, दिनांक ५ फेब्रुवारी २०२१.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. नितीन करीर, शासनाचे अपर मुख्य सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.