RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १०, अंक - ४ ]
मंगळवार , फेब्रुवारी ९ , २०२१ / माघ २० , शके १९ ४२
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हादंडाधिकारी यांजकडून
अधिसूचना
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक डीसीबी-३ /प्र . क्र. ३१/आरआर-१११ /२०२१ .-- अर्जदार ( १ ) श्री. तात्यासाहेब रामकृष्ण भोसले, ( २) श्री. हरीभाऊ धोंडोपंत कुलकर्णी , (३ ) सौ . शांता कमलाकर येळंबकर , सर्व रा . सोलापूर यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेला असल्यामुळे महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय क्रमांक विकाअ/१११५/प्र . क्र. ८८/५ , दिनांक ३१ डिसेंबर २०१५ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती होणेबाबत विनंती केली आहे. अर्जदार हे महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभाग , मंत्रालय , यांचेकडील शासन निर्णय दिनांक ३१ डिसेंबर २०१५ मधील परिच्छेद २.४ मधील सर्व तरतुदी पूर्ण करीत आहेत . तसेच संबंधिताविरुद्ध कोणत्याही प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल नाही अथवा बेकायदेशीर कृत्य केलेबाबत अथवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नसल्याचे आढळून आले आहे . त्यामुळे त्यांची शासन निर्णय दिनांक ३१ डिसेंबर २०१५ मधील परिच्छेद ६ (५) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ते दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता विशेष कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत राहणेस मंजुरी देणेत येत आहे. सदर नियुक्ती ही शासन निर्णय दिनांक ३१ डिसेंबर २०१५ मधील परिशिष्ट -४ मध्ये दिलेल्या खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून देणेत येत आहे.
(१ विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन / वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(२ ) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या " साक्षांकनाचे अधिकार " असतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये . त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर सत्यप्रत म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या परिणामांकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.
(३ ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने त्यांच्या घरावर/ दुकानावर/कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .
(१ )
एच-३१७ , भाग एक-असा . (पु.वि.पु.)- ४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ९ फेब्रुवारी २०२१ / माघ २० , शके १ ९४२ (४) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू नये.
(५) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देऊ नये .
( ६ ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी राहील व त्यानंतर पुनर्निनियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी, सोलापूर काढतील . सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आढळल्यास , त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास , त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवायसुद्धा, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.
अनुसूची
अ. क्र.
पत्ता
विशेष कार्यकारी अधिकारी पदाकरिता मुदतवाढ दिलेल्या उमेदवारांची नावे
१ २
३
विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीबाबत मुदतवाढ दिलेला कालावधी ४
१ श्री. तात्यासाहेब रामकृष्ण भोसले
दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ .
रा . १६ , एन . जी. मिल चाळ , मुरारजी पेठ , सोलापूर .
२ श्री . हरीभाऊ धोंडोपंत कुलकर्णी
दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ .
रा. एन. जी. मिल चाळ, घर नंबर ८३ , मुरारजी पेठ , सोलापूर.
३ सौ. शांता कमलाकर येळंबकर
दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५.
रा . फ्लॅट नंबर ८ , संजिता अपार्टमेंट , किनारा हॉटेलसमोर , होटगी रोड , सोलापूर .
मिलिंद शंभरकर,
भा. प्र. से. ,
जिल्हादंडाधिकारी, सोलापूर .
सोलापूर , २५ जानेवारी २०२१.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .