Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I KDS Ext. No. 12 (Feb. 11, 2021) Mangaon क्र. उविअमा/भूसं/कात-२/एसआर ९८/२०१२

Published 11 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ११, २०२१/माघ २२, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ९]

गुरुवार, फेब्रुवारी ११, २०२१/माघ २२, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, माणगांव यांजकडून

क्रमांक-उविअमा-भूसं/कात-२/एस आर ९८/२०१२.— ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम एक, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली व दिनांक ४ जुलै २०१९ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र, भाग चार ब पृष्ट क्र. १ ते २ वर प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक ४ जुलै २०१९ ची शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आय डीसी/२०१९/ (प्र.क्र ३७०)/उ-१४, उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचित विर्िनदिष्टी करण्यात आलेल्या क्षेत्रात जुलै २०१९-महिन्याच्या चौथ्या दिवसांपासून अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या क्षेत्रात लागू करण्यात आले आहे व त्या सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या जमिनी समाविष्ट आहेत ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये ज्या क्षेत्रात उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ लागू करण्यात आले आहे. त्या क्षेत्रातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास औद्योगिक किंवा उपरोक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी संपादन करण्यास अधिकार महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/१८९२(१७४४१)/उद्योग १४, दिनांक ११ जून १९९३ अन्वये प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/२१०६/(४८५)/उ-१४, दिनांक १० नोव्हेंबर २००६ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६२ च्या नियम २८ ने जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले उपरोक्त नियमाची कलमे ३२, ३६ व ३८ चे अधिकार आणि नियमाचे कलम २(क) अन्वये उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांना कार्यान्वित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ज्याअर्थी सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या क्षेत्राची महामंडळास नियोजित दिल्ली-मुंबई इंडस्टि्रयल कॉरीडोर अंतर्गत दिघी पोर्ट प्रकल्प पाणसई औद्योगिक क्षेत्रासाठी जमिनी संपादन करण्याची जरुरी आहे, असे उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांना वाटते ;

आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे पत्र क्र.आयडीसी २०१६/(प्र.क्र.१९०) उद्योग १४, दिनांक ४ डिसेंबर २०२० अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२ पोट-कलम (१) च्या तरतुदी लागू करण्याबाबत शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचित नमूद केलेल्या जमीन मालकांनी व हितसंबंधीत असणायांनी दाखविलेल्या कारणांचा व ज्यांनी स्वखुषीने जमिनी देण्यास लेखी स्वरूपात संमतीपत्र दाखल केलेली आहेत त्यांचा विचार करून महाराष्ट्र विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) अन्वये या जमिनी संपादन करण्याचा निर्णय उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांनी घेतला आहे. (१) भाग एक-(को.वि.पु.)----१२--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ११, २०२१/माघ २२, शके १९४२ त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून अनुसूचित नमूद केलेल्या जमिनी उपरोक्त कारणासाठी संपादित केल्या असून त्याबाबत उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव ही नोटीस प्रसिद्ध करत आहेत.

अनुसूची

पाणसई औद्योगिक क्षेत्र

जिल्हा रायगड, तालुका माणगांव, गांव कालवण

अ. क्र. स.नं/गट नं. हिस्सा नं एकूण क्षेत्र (हे.आ) (१) (२) (३) (४)
१ १२६ ० १३.२३०
१३.२३०

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगाव.

माणगाव, दिनांक १० फेब्रुवारी २०२१.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.