RNI No. MAHBIL /2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७ , अंक ९ ]
शुक्रवार , फेब्रुवारी १२ , २०२१ / माघ २३, शके १ ९ ४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
खालापूर नगरपंचायत , खालापूर
जाहीर सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९ ६६ चे कलम २१ ( २ ) च्या अनुषंगाने कलम २३ ( १ ) नुसार खालापूर नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.
क्र. नपंखा/विकास योजना/ १६१५ / २०२०-२१
शासनाने , नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्र . एमसीओ / २०१४/प्र.क्र. २०६/नवि-१ ९ , दिनांक २६ जून २०१५ अन्वये खालापूर नगरपंचायत स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम २१ ( २ ) अन्वये नगरपंचायत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे .
सबब , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २१ ( २ ) च्या अनुषंगाने कलम २३ ( १ ) अन्वये खालापूर नगरपंचायतीने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी प्रशासकीय ठराव क्र . ०१ , दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ अन्वये मान्यता दिली आहे . त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २१ ( २ ) नुसार खालापूर नगरपंचायतीचा विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या कार्यालयात , कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे .
ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/ हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० ( साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/ हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल .
सुरेखा रामदास भणगे ,
मुख्याधिकारी ,
ठिकाण : खालापूर,
खालापूर नगरपंचायत.
दिनांक १२ फेब्रुवारी २०२१.
(१)
भाग दोन- १५-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी १२ , २०२१ / माघ २३ , शके १९ ४२
KHALAPUR NAGARPANCHAYAT , KHALAPUR
Notice
Declaration of Intention to prepare Development Plan of Khalapur Nagarpanchayat as per section 23 ( 1) read with section 21 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
क्र. नपंखा/विकास योजना/ १६१५/ २०२०-२१
Government of Maharashtra in Urban Development Department , vide its Notification No. MCO/ 2014 /Ref. No. 206/N.V-19 , dated 26th June 2015 constituted Khalapur Nagarpanchayat . It is necessary to prepare the Development Plan for the area of Khalapur Nagarpanchayat as per section 21 ( 2 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 for planned development of the said area .
Hence , the Khalapur Nagarpanchayat by its resolution No. 01 , dated 11th February 2021 has given consent to declare its intention to prepare Development Plan , as per provision of section 23 ( 1 ) read with section 21 ( 2 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 . Accordingly , this notice is being published .
The plan showing boundary of the area included in Development Plan of Khalapur Nagarpanchayat is kept open for inspection by the public on office working days , during office hours at the Office of the Khalapur Nagarpanchayat , as required under section 23 (2 ) of the Maharashtra Regional & Town Planning Act , 1966 .
Any suggestion/objection of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer , Khalapur Nagarpanchayat within a period of 60 ( sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette . The suggestion/objection shall be duly considered while preparing the Development Plan .
SUREKHA RAMDAS BHANAGE ,
Chief Officer ,
Place : Khalapur ,
Dated 12th February 2021 .
Khalapur Nagarpanchayat .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .