Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (कोविपू) असा. क्र. 17 (18-02-2021) जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांजकडून, वाहतूक बंदी अधिसूचना, क्रमांक गृह/एमएजी-1/ वाहतुक बंदी आंबेत पूल/2021

Published 18 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १८, २०२१/माघ २९, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक १२] गुरूवार, फेब्रुवारी १८, २०२१/माघ २९, शके १९४२ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांजकडून

वाचले.----- (१) मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६.

(२) शासन, गृह विभागाकडील अधिसूचना क्र.एमव्हीए ०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२, दिनांक १९ मे १९९०.

(३) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील दिनांक ३ ऑक्टोबर २०१९, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९, दिनांक २६ नोव्हेंबर २०१९, दिनांक २९ फेब्रुवारी २०२० व दिनांक १७ मार्च २०२० रोजीचे पत्र.

(४) या कार्यालयाकडील दिनांक ४ ऑक्टोबर २०१९, दिनांक ११ नोव्हेंबर २०१९, दिनांक १३ डिसेंबर २०१९, दिनांक २३ मार्च २०२० व दिनांक २७ एप्रिल २०२० रोजीचे आदेश.

(५) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र जा.क्र.मवि/का-३ (२)/१७५३, दिनांक ९ जुलै २०२०.

(६) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्र.गृह/एमएजी-१/अवजड वाहतूक बंदी आंबेत पूल/२०२०, दिनांक १५ जुलै २०२०.

(७) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र जा.क्र.मवि/का-३ (२)/२६२४, दिनांक ५ ऑक्टोबर २०२०.

(८) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्र.गृह/एमएजी-१/अवजड वाहतूक बंदी आंबेत पूल/२०२०, दिनांक २६ ऑक्टोबर २०२०.

(९) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र जा.क्र.मवि/का-३ (२)/३७७, दिनांक २२ जानेवारी २०२१.

(१०) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील पत्र जा.क्र.मवि/का-३ (२)/४६२, दिनांक ८ फेब्रुवारी २०२१.

(११) या कार्यालयाकडील मंजूर टिपणी दिनांक ९ फेब्रुवारी २०२१. (१) भाग एक (को.वि.पु.)--१७-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १८, २०२१/माघ २९, शके १९४२ वाहतूक बंदी अधिसूचना

क्रमांक गृह/एमएजी-१/वाहतूक बंदी आंबेत पूल/२०२१.------ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपोद्घातातील अ.क्र. ३, ५, व ७ कडील पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील उपोद्घातातील अ.क्र. ४, ६ व ८ कडील अधिसूचनेद्वारे त्यामध्ये नमूद कालावधीकरीता म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा. १०१) सावित्री खाडीवरील कि. मी.०/८०० मधील आंबेत पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व अवजड वाहतूक जसे बस, ट्रक, टेम्पो इ. वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपोद्घातातील अ.क्र.१० कडील पत्रान्वये ""म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा.१०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पूल हा एकूण ३७६ मी. लांबीचा मोठा पूल आहे. हा पूल कुमकुवत झाल्याने अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल) यांनी सुचविल्याप्रमाणे पुलाच्या दुरुस्तीसाठी या कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश दिनांक २० जून २०१९ अन्वये मे. संरचना स्ट्रक्चरल स्टेंदनीग प्रा.लि., ठाणे यांना देण्यात आलेले असून, त्यांनी सदर पूल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पूल दुरुस्ती दरम्यान सदरचा पूल कुमकुवत झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजीच्या आदेशान्वये दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पासून पुढील तीन महिन्यांसाठी पुलावरील अवजड वाहतूक बंद करणेसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. सदर अधिसूचनेची मुदत दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी पूर्ण झाली आहे. सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करणेसाठी ठेकेदारास कार्यादेशाच्या दिनांकापासून १२ महिने इतकी मुदत देण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत पुलाच्या Pier Cap Bracket च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. लिफ्टींग ट्रस् फॅब्रीकेशनचे काम प्रगतीत आहे. आता पुलाच्या बेअरिंग बदलणे व पेडस्टलची दुरुस्ती करणेसाठी पुलाच्या गर्डर सहित स्लॅब उचलणे आवश्यक आहे. या बेअरिंग बदलणे, पेडस्टलची दुरुस्ती करणे, एक्स्पान्शन जॉइर्ंट बदलणे या कामासाठी सुमारे चार महिने इतका कालावधी आवश्यक आहे. या कालावधीत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करणे गरजेचे आहे. या कामासाठी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केल्यानंतर प्रवासी व विद्याथ्यार्ंची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी आंबेत पुलाजवळ सावित्री खाडीमध्ये पर्यायी जलवाहतूक सेवा सुरू करणेसाठी मा. पालकमंत्री, रायगड यांचेकडे आग्रणी मागणी केली होती. त्यानुसार मा. पालकमंत्री महोदयांनी दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली व दिनांक १४ जानेवारी २०२० रोजी मंत्रालय येथे त्यांच्या दालनात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन आंबेत पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करणेपुर्वी पर्यायी जलवाहतूक सेवा सुरू करणेबाबत आदेश दिले होते. पर्यायी प्रवासी/रो-रो जल वाहतूक सेवा सुरू करणेसाठी सावित्री खाडीच्या दोन्ही बाजूस उतरत्या धक्क्याचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून पूर्ण झाले आहे. आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पासून फेरी बोट सेवा सुरू होत आहे. पुलाचे स्लॅबसहीत गर्डर उचलून बेअरींग बदलणे व पेडस्टल दुरुस्ती करणे या कामांसाठी सुमारे ३० मे २०२१ पयर्ंतचा कालावधी जाणे अपेक्षित आहे. तरी कृपया आंबेत पुलावरुन अवजड वाहतूक बंद करून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक आता जशी चालू आहे, तशी पुढील ९ फेब्रुवारी, २०२१ पयर्ंत चालू ठेवणे व दिनांक १० फेब्रुवारी २०२१ ते दिनांक ३० मे २०२१ या कालावधीत पूर्णत: वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जारी होणेस, विनंती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपरोक्त प्रमाणे सादर केलेल्या प्रस्तावानुसार कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने व पुलाच्या दुरुस्तीकामी म्हाप्रळ आबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आबेत पूल हा दिनांक १० फेब्रुवारी २०२१ ते दिनांक ३० मे २०२१ पयर्ंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे ;

त्याअर्थी मी, निधी चौधरी, जिल्हादंडाधिकारी, रायगड उपोद्घातातील अ.क्र. १ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पूल दिनांक १० फेब्रुवारी २०२१ ते दिनांक ३० मे २०२१ पयर्ंत सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद ठेवण्याचे आदेश जारी करीत आहे.

रायगड, दिनांक ९ फेब्रुवारी २०२१.

निधी चौधरी, जिल्हादंडाधिकारी, रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.