RNI No. MAHBIL /2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
गुरूवार, फेब्रुवारी २५ , २०२१ / फाल्गुन ६ , शके १९ ४२
वर्ष ७ , अंक १३]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
तलासारी नगरपंचायत, तालुका तलासरी, जिल्हा पालघर
सूचना
क्रमांक १७६२/ २०२०-२१
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २१ ( २ ) च्या अनुषंगाने कलम २३ (१ ) नुसार तलासरी नगरपंचायत , क्षेत्राची विकास योजना त्यात करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत .
शासनाने, नगर विकास विभागाकडील निर्णय क्र.एमयुपी-२०१४/प्र.क्र.१ ९७ / १४/ नवि -१९ , दि. ७ मे २०१६ अन्वये तलासरी नगरपंचायत स्थापन केलेली आहे . महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २१ ( २ ) अन्वये नगरपंचायत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.
सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २१ ( २ ) च्या अनुषंगाने कलम २३ ( १) अन्वये तलासरी नगरपंचायतीने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. ०१ , दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे .
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम २१ ( २ ) नुसार तलासरी नगरपंचायतीच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी , कार्यालयीन वेळेत नागरिकांना अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे .
ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/ हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी , तलासरी नगरपंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करतांना त्या सूचना/ हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.
दयानंद गोरे ,
तलासरी ,
मुख्याधिकारी,
दिनांक २५ फेब्रुवारी २०२१.
तलासरी नगरपंचायत, तलासरी .
(१)
भाग दोन- २२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी २५ , २०२१ / फालगुन ६ , शके १ ९ ४२
TALASARI NAGAR PANCHAYAT , TALASARI , DISTRICT PALGHAR
Notice
No. 1762 / 2020-21
Declaration of intention to prepare Development Plan of Talasari Nagar Panchayat as per section 23(1) read with section 21(2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Government of Maharashtra in Urban Development Department, vide it's Notification No. MUP- 2014 / CR -197 / 14/UD - 19 , dated 7th May, 2016 constituted Talasari Nagar Panchayat.. It is necessary to prepare the Development Plan for the area of Nagar Panchayat as per section 21 (2) of Maharashtra Regional Town Planning Act , 1966 of planned development of the said area .
Hence , the Talasari Nagar Panchayat by its resolution No.01 dated 4th February 2021 has given consent to declare its intention to prepare Development Plan . As per provision of section 23 ( 1 ) read with section 21 (2 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. Accordingly this notice is being published .
The plan showing boundary of the area included in Development Plan of Talasari Nagar Panchayat is kept open for inspection by the public on office working days , during office hours at the office of the Nagar Panchayat , as required under section 23 (2 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
Any suggestion / objection of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer Talasari Nagar Panchayat within a period of 60 ( Sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette . The suggestion/ objection shall be duly considered while preparing the Development Plan .
Talasari ,
DAYANAND GORE ,
ChiefOfficer,
dated the 25th February 2021 .
Talasari Nagar Panchayat , Talasari .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .