RNI No. MAHBIL/2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी मंगळवार, मार्च २ , २०२१/ फाल्गुन ११ , शके १ ९ ४२
वर्ष ७ , अंक १५]
[ पृष्ठे २ , किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी , रायगड- अलिबाग यांजकडून
वाहतूक बंदी अधिसूचना
क्रमांक गृह/ एमएजी -१ / वाहतूक बंदी वरंध घाट/ २०२१ . ज्याअर्थी , कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी उपोद्घातातील अ.क्र. ३ कडील पत्रान्वये या वर्षाच्या पावसाळ्यामध्ये या विभागाच्या अखत्यारीतील बाणकोट म्हाप्रळ - महाड - भोर - पंढरपुर रस्ता प्ररामा-१५ भाग राजेवाडी फाटा ते वरंध घाट या रस्त्यावर दिनांक १३ ऑगस्ट २०२० रोजी अतिवृष्टीमुळे कि.मी. ८०/२०० मध्ये दरडी व संरक्षक भिंती कोसळून रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या कडा तुटून गेल्या आहेत . त्यामुळे या रस्त्यावरून फक्त लहान वाहनांची वाहतुक सुरू आहे . शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये सदर दुरुस्तीच्या कामाला रुपये ५४०.५५ लक्ष रक्कमेला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे . तद्नंतर सदर कामाचे अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे . वरंध घाटातील सदरचे काम करावयाची जागा ही अतिदुर्गम सह्याद्री पर्वत रांगामध्ये आहे. सदर ठिकाणी एकावर एक असे तीन Tier मध्ये रस्ते आहेत . रस्त्याची रुंदी ही सर्वसाधारणतः सात ते नऊ मीटर आहेत. संरक्षक भिंतीचे काम करताना खोलवर खोदाई करावी लागणार आहे. तसेच कामासाठी लागणारी यंत्रे जसे पोकलेन्ड, जेसीपी , इंप्पर मिक्सर इत्यादीसाठी लागणारी जागा व बांधकाम साहित्य जसे खडी, वाळ , सिमेंट , सेन्ट्रींगसाठी लोखंडी अँगल , प्लेटस व पाणी साठविण्यासाठी लागणारी जागा अपुरी आहे . जुन्या दगडाच्या व काँक्रीटच्या भिंती पाडतांना दगडांचा ढिग खालच्या रस्त्यांवर पडण्याची शक्यता आहे . त्याकरिता सदर रस्त्यावरील सर्व वाहतुक ही दिनांक १० फेब्रुवारी २०२१ ते दिनांक ३० एप्रिल २०२१ या ८० दिवसांच्या कालावधीत पूर्णता बंद करून बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे . तरी बाणकोट- म्हाप्रळ - महाड- भोर -पंढरपुर रस्ता प्ररामा -१५ भाग राजेवाडी फाटा ते वरंध घाट येथील वाहतुक दिनांक १० फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या ८० दिवसांच्या कालावधीत पूर्णतः बंद करण्याचे आदेश होण्यास विनंती केलेली आहे.
आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग , महाड यांनी उपरोक्तप्रमाणे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतुक शाखा , रायगड यांनी उपोद्घातातील अ.क्र . ४ अन्वये बाणकोट - म्हाप्रळ - महाड - भोर -पंढरपुर रस्ता प्ररामा -१५ भाग राजेवाडी फाटा ते वरंध घाट येथील वाहतुक बंद केल्यास , प्रकरणी पोलादपुर मार्गे आंबेनळी घाट मार्गे महाबळेश्वर असा पर्यायी मार्ग व माणगांव- निजामपुर - ताम्हाणी घाट मार्गे पुणे असे पर्यायी मार्गावरून वाहतुकीस मार्गस्थ करता येईल असे अभिप्राय सादर केलेले आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु. )- २१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , मार्च २ , २०२१ / फाल्गुन ११ , शके १ ९ ४२ आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग , महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार बाणकोट- म्हाप्रळ - महाड- भोर -पंढरपुर रस्ता प्ररामा १५ भाग राजेवाडी फाटा ते वरंध घाट येथील सर्व प्रकारची वाहतुक, सदर रस्त्याच्या दुरुस्तीकरीता तसेच कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद करणेबाबत माझी खात्री झाली आहे .
त्याअर्थी, मी , निधी चौधरी , जिल्हादंडाधिकारी , रायगड उपोद्घातातील अ.क्र . १ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत बाणकोट - म्हाप्रळ -महाड- भोर - पंढरपुर रस्ता प्ररामा -१५ भाग राजेवाडी फाटा ते वरंध घाट येथील सर्व प्रकारची वाहतुक पूर्णतः बंद करणेबाबतचे आदेश जारी करीत आहे .
रागयड ,
निधी चौधरी, जिल्हादंडाधिकारी, रायगड .
दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .