RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक १७] सोमवार, मार्च ८, २०२१/फाल्गुन १७, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण यांजकडून
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे
कलम ११ नुसार.
क्रमांक कलम ११/एलएक्यू/एसआर/१८५/२०१९.— ज्याअर्थी, भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी,२०१५ ( यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचीत केले आहे की उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्हयातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्हयाचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या रत्नागिरी जिल्हयाच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचीत करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीची विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहे.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे.
आणि ज्याअर्थी, कलम ४३ पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे.
त्याअर्थी आता, असे घोषित करणेत येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (११), पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. भाग एक (को. वि. पु.) २५—१ (१)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ८, २०२१/फाल्गुन १७, शके १९४२परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करून अशा मालकास उक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरण काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) आणि मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक/ भूसं/समन्वय/कार्या-१/अधिकार प्रत्यर्ापित/२०२१, दिनांक २ मार्च २०२१ अन्वये, समूचीत शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी समूचीत शासन उप-विभागीय अधिकारी चिपळूण यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन गावाचे नाव गांग्रई, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी
| अ.क्र. (१) | भूमापन क्रमांक (२) | संपादित क्षेत्र ( हे.आर.) (३) |
| १ | ३४९ पै | ०३.३२.०० |
| २ | ३५८ पै | ००.४०.०० |
| ३ | ३७१ पै | ००.१३.३० |
| ४ | ३७२ | ०१.०५.०० |
| ५ | ३७३ | ००.२०.०० |
| ६ | ३७४ | ००.३७.०० |
| ७ | ३७५ | ००.३६.०० |
| ८ | ३७६ पै | ००.२६.५० |
| ९ | ३७७ | ०२.६७.०० |
| १० | ३७८ पै | ००.३०.०० |
| ११ | ३८० पै | ००.०१.०० |
| १२ | ३८२ पै | ००.१४.०० |
| १३ | ३८३ पै | ००.१९.९० |
| १४ | ३८४ पै | ००.२१.३० |
| १५ | ३८५ पै | ००.१६.६० |
| १६ | ३८६ पै | ००.०६.०० |
| १७ | ३९६ पै | ००.०२.०० |
| १८ | ३९८ पै | ००.३१.४० |
| १९ | ३९९ | ००.८९.०० |
| २० | ४०० पै | ०३.६४.०० |
| २१ | ४०१ पै | ०२.५५.०० |
| २२ | ४०२ पै | ००.२६.६० |
| २३ | ४०४ पै | ००.२७.०० |
| २४ | ४०५ पै | ०२.१६.०० |
| २५ | ४०६ पै | ००.३८.१० |
| २६ | ४०७ पै | ००.७८.२० |
| २७ | ४०८ पै | ००.३९.८० |
| २८ | ४०९ पै | ००.४२.९० |
| २९ | ४१० पै | ००.४७.०० |
| (१) | (२) | (३) |
| ३० | ४११ पै | ००.४५.१० |
| ३१ | ४१२ ब पै | ००.०५.०० |
| ३२ | ४१२ क | ००.६१.०० |
| ३३ | ४१३ अ | ०१.००.०० |
| ३४ | ४१३ ब | ००.२०.०० |
| ३५ | ४१४ | ००.५०.३० |
| ३६ | ४१५ पै | ००.०५.०० |
| ३७ | ४१६ पै | ००.६७.४० |
| ३८ | ४१७ पै | ०१.३६.०० |
| ३९ | ४१८ पै | ००.०७.६० |
| ४० | ४१९ पै | ००.१५.१० |
| ४१ | ४२० पै | ००.०२.०९ |
| ४२ | ४२१ पै | ००.०८.१० |
| ४३ | ४२३ पै | ००.०९.२० |
| ४४ | ४२६ पै. | ००.३९.६० |
| ४५ | ४२७ अ पै | ००.०६.०० |
| ४६ | ४२९ पै | ००.२१.५० |
| ४७ | ४३२ पै | ००.४३.२० |
| ४८ | ४४१ पै | ००.२७.७० |
| ४९ | ४४२ पै | ००.०७.९० |
| ५० | ४४३ पै | ००.१५.४० |
| ५१ | ४५३ पै | ००.२५.९० |
| ५२ | ४५७ पै | ००.१०.४० |
| ५३ | ४६३ पै | ००.०७.३० |
| ५४ | ४६४ पै | ००.०६.०० |
| ५५ | ४६५ पै | ००.०४.०० |
| ५६ | ४६६ पै | ००.०४.३० |
| ५७ | ४७१ पै | ००.२०.५० |
| ५८ | ४७२ ब पै | ००.०८.०० |
| ५९ | ४७५ पै | ००.०९.६० |
| ६० | ४७६ पै | ००.१०.४० |
| ६१ | ४७८ पै | ००.०९.४० |
| ६२ | ४७९ पै | ००.१०.०० |
| ६३ | ५५१ पै | ००.१०.०० |
| ६४ | ६००/अ पै | ००.०४.५० |
| एकूण भूसंपादित क्षेत्र | ३०.७६.०९ |
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव - मौजे गांग्रई, ता.चिपळूण, जि. रत्नागिरी येथील साठवण तलाव योजनेच्या सी मुख्य कामे अंतर्गत धरणतळ, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा विमोचक व पोहोच रस्तासाठी भूसंपादन.
प्रकल्पकार्याचे वर्णन - मौजे गांग्रई, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील साठवण तलाव योजनेच्या सी मुख्य कामे अंतर्गत धरणतळ, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा विमोचक व पोहोच रस्तासाठी भूसंपादन करण्यासाठी ३०.७६.०९ एवढे क्षेत्र संपादित होणार आहे.
समाजाला मिळणारे लाभ - भविष्यात नदी नाल्यांना, विहीरींना पाण्याचा स्त्रोत वाढेल. शेती बागायतींना धरणाच्या पाण्याचा फायदा होईल.
त्यामुळे र्आथिक परिस्थिती सुधारेल.
अनुसूची-तीन
बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
निरंक
अनुसूची चार
(समाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश) या कार्यालयाचे पत्र क्र. भू.सं./एसआर. १८५/२०१९, दिनांक ०८ एप्रिल २०१९ चे पत्राने भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना अधिनियम, २०१३ अंतर्गत सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास (SIA ) करणेसाठी भाकर सेवा संस्था, लांजा यांजकडे त्यांचेकडील पत्र क्र. एसआयए/२२३/२०२०, दिनांक ०४ मार्च २०२० ने सामाजिक परिणाम निर्धारण अहवाल प्राप्त झाला आहे. सदरचे अहवालानुसार या प्रकल्पामुळे कोणतेही सामाजिक दुष्परिणाम दिसून येत नसलेबाबत अहवालात नमूद केलेले आहे.
अनुसूची-पाच नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील लागू नाही.
सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याच्या कलम ११ चे उप-कलम (१) खाली अधिसूचित करण्यात आले आहे त्याविरुद्ध आक्षेप नोंदविण्याचे असल्यास, प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उप विभागीय अधिकारी, चिपळूण तथा भूसंपादन अधिकारी, चिपळूण यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.
टिप- संपादित जमिनींच्या आराखडयाचे उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
चिपळूण, दिनांक ०३ मार्च २०२१.
चिपळूण.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.