RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १० , अंक ७ ] गुरुवार ते बुधवार , मार्च ११ - १७ , २०२१ / फाल्गुन २० २६ , शके १ ९ ४२
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
मुख्याधिकारी यांजकडून
इस्लामपूर नगरपरिषद , इस्लामपूर
इस्लामपूर नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी नियुक्ती संदर्भ : ( १ ) महाराष्ट्र शासन राजपत्र- असाधारण भाग चार, रोज- मंगळवार, दिनांक १३ मार्च २०१२ (सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २) .
(२ ) मा. प्रधान सचिव ( २ ) नगर विकास विभाग यांचेकडील क्रमांक कडोमपा-१००६/प्र . क्र. १ ९ २/२००६/नवि-२८ दिनांक २ मार्च २००९.
( ३ ) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ७४ , भाग एक - मध्य उप - विभाग नगर विकास विभाग अधिसूचना , दिनांक २ डिसेंबर २०२० .
आदेश
क्रमांक इनपा/कार्या-३/८८४/२०२१. ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ अन्वये इस्लामपूर नगरपरिषदेची स्थापना झालेली आहे आणि ज्याअर्थी , इस्लामपूर नगरपरिषद क्षेत्रासाठी अ, ब , क वर्ग नगरपरिषद क्षेत्र यांच्या मंजूर विकास योजनांसाठी लागू असलेली सुधारित प्रमाणित एकत्रित विकास नियंत्रण नियमावली दिनांक २ डिसेंबर २०२० पासून अमलात आलेली आहे.
त्याअर्थी, अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ५२ ते ५५ मध्ये असणाऱ्या तरतुदी लागू आहेत , तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम १८ ९ ते १ ९९ मध्ये असणाऱ्या अधिकारानुसार मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणण्यासाठी त्या तरतुदींच्या अनुषंगाने अंमलबजावणीसाठी खालील नमूद क्षेत्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून संदर्भीय आदेशाचे अधीन राहून घोषित करीत आहे.
परिशिष्ट
पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे नाव
अ. क्र.
सोपविण्यात आलेले कार्यक्षेत्र १
४ २
हुद्दा ३
१
सहा . नगररचनाकार
श्री. निखील अशोक भुरे
संपूर्ण नगरपरिषद क्षेत्र वेळोवेळी मुख्याधिकारी यांनी निर्गमित केलेल्या विवक्षित आदेशामध्ये नमूद केलेल्या कार्यक्षेत्रासाठी उपरोक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या कालावधीत या अधिसूचनेनुसार पदनिर्देशित अधिकारी समजण्यात येईल . अनधिकृत बांधकाम केल्यामुळे इमारत ढासळणेसारख्या घटना घडून लोकांना आपले प्राण गमावावे लागू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे .
(१)
एच-३४१ , भाग एक-अ ( पु.वि.पु. )- ७ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ १७ , २०२१ /फाल्गुन २० - २६, शके १९४२ त्या अनुषंगाने अशी अनधिकृत बांधकामे व त्यावर करावयाची कार्यवाही महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १ ९ ६६ व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमानुसार आवश्यक ती कारवाई करणे.
(१) बांधकाम थांबविणे.
(२) बांधकाम पाडणे.
(३ ) अशा बांधकामास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर खटला भरणे .
(४) घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या बांधकामामुळे लगतच्या इतर इमारतीस वायुविजन , प्रकाश इत्यादी मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणारी बांधकामे किंवा परिसरात हानी पोहचविण्यास असणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करणे.
वरील पदनिर्देशित अधिकारी यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करावी .
नमूद पदनिर्देशित अधिकारी यांच्या बदलीनंतर किंवा अन्य कारणाने त्यांचे रिक्त पदावर नियुक्ती होणारे कर्मचारी यांचेवर संबंधित कामाची जबाबदारी राहील.
अरविंद माळी,
मुख्याधिकारी,
इस्लामपूर नगरपरिषद,
इस्लामपूर , जिल्हा सांगली.
इस्लामपूर , २ मार्च २०२१.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .