RNI No. MAHBIL /2009/ 35530
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ७ , अंक ४ ( २ ) ]
शुक्रवार , मार्च १२, २०२१/फाल्गुन २१ , शके १९ ४२
[पृष्ठे २ , किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४. - महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे , श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१ यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम. पृष्ठे १-२ दिनांक १० मार्च २०२१ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे , प्रसिद्ध करण्यात येत आहे .
भूपेन्द्र मु. गुरव, प्रभारी सचिव ( विधि विधान) , महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ .
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक १२ मार्च २०२१ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम. )
महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे , श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम, २००१ यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
२००१ चा ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी , महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व महा . २७. नियंत्रण ) अधिनियम , २००१ यामध्ये सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या बहात्तराव्या वर्षी, याद्वारे , पुढील अधिनियम करण्यात येत आहे: -
१. या अधिनियमास, महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे , श्रेणीवाढ व नियंत्रण) ( सुधारणा) संक्षिप्त नाव. अधिनियम , २०२१ , असे म्हणावे .
(१)
भाग चार-५-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , मार्च १२ , २०२१ / फाल्गुन २१ , शके १९ ४२
सन २००१ चा
२००१ चा
महा . २७ .
२. महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे , श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम , २००१ याच्या कलम ३ महाराष्ट्र मधील, पोट- कलम ( १ ) मध्ये, -
अधिनियम क्रमांक
२७ याच्या कलम
३ ची सुधारणा.
(क) " १ जानेवारी २००१ रोजी " या मजकुराऐवजी, " ३१ डिसेंबर २०२० रोजी " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
( ख ) दुस -या परंतुकामधील, खंड ( क ) मध्ये, " १ जानेवारी २००१ नंतर , " या मजकुराऐवजी , " ३१ डिसेंबर २०२० नंतर, " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .