महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक २७] शुक्रवार, मार्च १९, २०२१/फाल्गुन २८, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ मार्च २०२१.
अधिसूचना
वक्फ अधिनियम, १९९५.
क्रमांक वक्फ २०१६/प्र.क्र.१९७/कार्यासन-४.— त्याअर्थी, वक्फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३) यामधील कलम २३ च्या उप-कलम (१) व (२) तसेच, महाराष्ट्र वक्फ नियम, २००३ या मधील नियम क्रमांक ७ च्या उप-नियम (१) मधील पोट-नियम (ब) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या व यासंबंधी प्राप्त असलेल्या सर्व शक्तींचा वापर करून व यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना व आदेश अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे श्री.अनिस शेख, सेवानिवृत्त उप सचिव, महाराष्ट्र शासन, ज्यांच्या नावाचा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने सुचविलेल्या दोन नावाच्या पॅनेलमध्ये समावेश आहे, यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पनचक्की, औरंगाबाद म्हणून, ते सदर पदाचा पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून तीन वषार्ंच्या कालावधीकरिता नियुक्ती करत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दिनेश मा. सोनवणे, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १९, २०२१/फाल्गुन २८, शके १९४२ MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th March, 2021.
NOTIFICATION
WAQF ACT, 1995.
No.Waqf 2016/C.R.197/Desk-4.— In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 23 of the Waqf Act, 1995 (43 of 1995) read with clause (b) of sub-rule (1) of Rule 7 of the Maharashtra Waqf Rules, 2003 and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all earlier notifications or orders issued in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints Shri Anees Shaikh, retired Deputy Secretary to the Government of Maharashtra, whose name is included in the panel of two names suggested by the Maharashtra State Board of Waqfs, to be the Chief Executive Officer of the Maharashtra State Board of Waqfs, having its headquarter at Panchakki, Aurangabad for a period of three years from the date he assumes office.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DINESH M. SONAWANE,
Deputy Secretary to Government.