RNI No. MAHBIL /2009/35574
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक ७]
गुरुवार , मार्च २५ , २०२१/चैत्र ४ , शके १ ९ ४३
[ पृष्ठे २ , किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त ) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूका जिल्हादंडाधिकारी , रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक गृहशाखा एमएजी. ३ / विशेष कार्य अधिकारी / २०२१ .- शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील उपोद्घातातील अ.क्र.१ कडील निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून , मी , निधी चौधरी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रायगड पनवेल महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीत प्रभाग क्र.१ ९ ब मधून निर्वाचित झालेल्या सदस्या श्रीमती रुचिता गुरुनाथ लोंढे यांची पदसिद्ध " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती खालील अटी व शर्तीच्या अधिनतेने करीत आहे .
( १ ) सदरची पदसिद्ध नियुक्ती ५ वर्षाकरीता अथवा पुढील आदेशापर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. राज्य शासनास / जिल्हाधिकारी यांना पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्तीवरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही कोणतेही कारण न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील . तथापि, ही मुदत संपताच किंवा नियुक्ती त्यापुर्वीच संपुष्टात आणण्यात आल्यास पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात तात्काळ जमा करण्यात यावे .
( २ ) उपोद्घातातील शासन निर्णयाद्वारे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्त्या मानसेवी असल्यामुळे पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांना सोपविण्यात आलेल्या कामाबाबत कोणतेही मानधन वेतन/ भत्ते अनुज्ञेय राहणार नाहीत.
( ३ ) पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीमुळे केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार प्राप्त होतील व मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. तसेच साक्षांकन करतांना विहित रबरी शिक्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करणे बंधनकारक राहील .
(४) मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर साक्षांकन करता येणार नाही. जर वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर सत्यप्रत म्हणून साक्षांकन केल्यामुळे व होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणांमाकरिता पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . तसेच अशी घटना उघडकीस आल्यास पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येऊन पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील.
(१)
भाग एक- अ (को.वि.पु)- ८-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, मार्च २५ , २०२१/चैत्र ४ , शके १ ९ ४३ ( ५ ) पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीमुळे घरावर दुकानावर / कार्यालयावर स्वतःच्या नावासह पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी असा फलक लावणे बंधनकारक आहे. तथापि , त्यांच्या कुठल्याही वाहनांवर पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये . तसेच पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढणे बंधनकारक आहे.
( ६ ) पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीमुळे ओळख परेड तसेच मृत्युपुर्व जबानी यासाठी उपस्थित राहता येणार नाही.
(७ ) पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही .
(८ ) नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल , याची नोंद घ्यावी.
(९ ) नियुक्तीच्या कालावधीत किंवा कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद आढळल्यास त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार ( Bankrupt ) जाहीर केले असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपुर्व रद्द करण्यात येईल .
निधी चौधरी,
अलिबाग,
दिनांक २२ मार्च २०२१ .
जिल्हादंडाधिकारी , रायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND
BY DIRECTOR , CHARNI ROAD , PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .