Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ex. No. 30 (25th March 2021) जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, वाहतूक बंदी अधिसूचना, क्रमांक गृह/एमएजी-1/वाहतूक बंदी/पाताळगंगा नदी पूल/2021.

Published 25 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी

गुरुवार , मार्च २५ , २०२१/चैत्र ४ , शके १ ९ ४३ [ पृष्ठे ३ , किंमत: रुपये ११.०० वर्ष ७ , अंक २२]

असाधारण क्रमांक ३०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांजकडून

वाहतूक बंदी अधिसूचना

क्रमांक गृह / एमएजी-१ /वाहतूक बंदी / पाताळगंगा नदी पूल/ २०२१.- ज्याअर्थी , कार्यकारी अभियंता , मरारविम ( मर्या. ) , मुंबई यांनी उपोद्घातातील अ.क्र.३ कडील पत्रान्वये रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई- पुणे एक्सप्रेस वरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र . १०८ ( खालापूर कनेक्टर ) वरील पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पुलाचे दुरुस्तीच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजीच्या पत्रान्वये मे. जयहिंद रोड बिल्डर्स यांना प्रदान करण्यात आले आहेत. सदरहू कामाअंतर्गत पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील Pier- २ चे पाडकाम व नव्याने बांधकाम करणे प्रस्तावित आहे . तसेच हे काम करीत असताना सदर पुलाच्या Span क्र . २ व ३ चे Slab Hydraulic Jack च्या सहाय्याने वर उचलण्याचे नियोजित आहे . हे काम करीत असताना या पूलावरील वाहतूक दिनांक २२ मार्च २०२१ ते दिनांक ७ मे २०२१ या दरम्यान पत्रात प्रस्तावित मार्गे वळविणे आवश्यक आहे . पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पुलाचे दुरुस्तीच्या कामाच्या कालावधीमध्ये राज्य मार्ग क्र.१०४ वरील सावरोली ते खालापूर दरम्यानच्या लांबीसाठी पत्रात प्रस्तावित नियोजित वळण मार्गाची संयुक्त पाहणी ह्या कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांचे समवेत पोलीस अधीक्षक , महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र , पोलिस निरीक्षक महामार्ग पोलीस पनवेल विभाग , उप अभियंता मरारविम पुणे , M/ S.STUP Consultants Pvt . Ltd. (स्वतंत्र अभियंता यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) , M/s . IRBMPEPL ( सवलतदार यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग ) व मे . जयहिंद रोड बिल्डर्स यांनी दिनांक ३ मार्च २०२१ रोजी केली असून , या नियोजित वळण मार्गासाठी पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र यांनी सहमती दर्शविली आहे. या पाहणीत खोपोली शहरातील पुणेकडून येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर एकेरी वाहतूक असलेल्या अस्तित्वातील पुलाच्या ठिकाणी पुलाच्या मध्यभागी प्लॅस्टिक बॅरीकेड्स ( डिवायडर ) बसवून हा पूल दुहेरी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात खुला करण्यासाठी सूचना केली आहे. वरील सूचनेनुसार पाताळगंगा पुलाचे दुरुस्तीचे कालावधी दरम्यान प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येणार आहे . वरील पुलाच्या दुरुस्तीकरिता कराव्या लागणाऱ्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक ते माहिती फलक, दिशादर्शक फलक , बॅरीकेड्स , पुरेशे मनुष्यबळ (Traffic Warden ) इ. सुविधा कामाचे संबंधित ठेकेदार मे . जयहिंद रोड बिल्डर्स यांचेमार्फत करण्यात येणार आहे. तरी पाताळगंगा नदीवरील पुलाचे दुरुस्तीचे कालावधी दरम्यान ( दिनांक २२ मार्च २०२१ ते दिनांक ७ मे २०२१ ) वरील नियोजित वाहतूक वळविण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळावी अशी विनंती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी , कार्यकारी अभियंता , मरारविम (मर्या. ) , मुंबई यांनी उपरोक्तप्रमाणे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक , रायगड यांनी उपोद्घातातील अ.क्र. ४ अन्वये मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरून खालापुर मार्गे पुणेकडे जाणारी हलकी व अवजड वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र . ४८ वरील फॉरेस्ट चौकी , शिळफाटा , खोपोली येथील इंदिरा चौकाजवळच्या पुलाजवळील एकेरी मार्गाने खालापुर नाका या

(१)

भाग एक (को.वि.पु. )-३०-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च २५ , २०२१ /चैत्र ४ , शके १९ ४३ पर्यायी मार्गाने वळविली तर वाहतुकीची कोंडी निर्माण हाईल , तसेच खोपोली - पेण रोडवर शिळफाटा ते पाली फाटा या रोड दरम्यान रस्त्याचे काम चालू असून खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील शिळफाटा येथे नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. मुंबई - पनवेल बाजुकडून पुणेकडे जाणारी हलकी व जड वाहनांची वाहतूक जर कोनब्रिज शेडुंग येथून मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवे रोडने व पुणेकडून मुंबईकडे जाणारी जड वाहने ही एक्सप्रेस हायवे खालापुर टोलनाका पार करून सरळ पुढे मुंबई बाजुकडे वळविण्यात आली तर शिळफाटा खोपोली येथे वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही . खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील शिळफाटा चौक ते राज्यमार्ग क्र . ८८ मार्गे इसांबा फाटा या भागाचा समावेश होतो . सदरचा सर्व हा दाटीवाटीच्या वस्तीचा असून बाजारपेठ एस.टी. महामंडळाचा बस स्टॉप असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा वगैरे भागात जाणाऱ्या व येणाऱ्या एस.टी. बसेसची मोठी वाहतूक सुरू असते . खोपोली शहरातून पनवेल, नवी मुंबई व मुंबई या भागात जाणारी व येणारी सर्व वाहतूक ही शिळफाटा इंदिरा चौक येथूनच होते. तसेच खालापुर आणि पाताळगंगा रसायनी या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व खोपोली शहरात राहणाऱ्या कंपनी कामगारांच्या बसेस मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात , शिळफाटा चौक ते इंसाबा फाटा संपूर्ण परिसरात एकेरी मार्ग असून रस्ता अरुंद आहे . त्यामुळे कामगार कामावर जाण्याच्या व येण्याच्या वेळी वाहतुकीची समस्या निर्माण होत असते . जेएनपीटी कोन येथून अवजड वाहनांची वाहतूक जरी कोन येथील उड्डाणपुलाच्या उतारावरून द्रुतगती महामार्गावर वळविली तरी ही खालापूर व पेण औद्योगिक वसाहती मधील टाटा , उत्तम स्टिल वगैरे कंपन्यांमध्ये वाहनांद्वारे विशेषता ट्रेलरद्वारे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक करण्यात येते. त्यामुळे कोनमार्गे ही वाहने शिळफाटा खोपोली येथे येतात, तसेच खालापुर खोपोली , पेण, पाली या परिसरातील औद्योगिक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने व टॅन्कर्स वाहतूक होणार आहे . ही सर्व वाहने शिळफाटा, इंदिरा चौक , इसांबा फाटा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येणार आहे . शिळफाटा, इंदिरा चौक , इसांबा फाटा या परिसरात अवजड वाहने एस.टी. महामंडळाच्या बसेस, कंपनीच्या बसेस व खोपोली शहरातील स्थानिक नागरिकांची वाहनामुळे होणारी वाहतूक या सर्व बाबींचा तेथील भौगोलिक परिस्थितीच्या पार्श्वभूमी व एकेरी रस्त्याच्या पार्श्वभूमीवर विचार करता सदर ठिकाणी प्रचंड प्रमाणात हलकी, जड व अवजड वाहने येणार असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे . वरील सर्व बाबींचा विचार करता MSRDC यांनी दिलेल्या पर्यायी मार्गाच्या अनुषंगाने " शिळफाटा, इसांबा फाटा , इंदिरा चौक या परिसरात केवळ रात्री २१-०० वाजल्यापासून ते सकाळी ६-०० वाजेपर्यंतचे कालावधीत जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात यावी . तसेच सकाळी ६-०० वाजल्यापासून ते रात्री २१-०० वाजेपर्यंतच्या कालावधीत जड व अवजड वाहतुक बंद ठेऊन केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात यावी " असे अभिप्राय सादर केलेले आहेत.

आणि ज्याअर्थी , पोलीस अधीक्षक , रायगड यांनी या कार्यालयाकडे उपोद्घातातील अ.क्र. ४ अन्वये वरीलप्रमाणे सादर केलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता , मरारविम (मर्या.) , मुंबई यांनी उपोद्घातातील अ.क्र . ५ कडील पत्रान्वये रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई - पुणे एक्सप्रेस वरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र. १०८ (खालापूर कनेक्टर ) वरील पाताळ गंगा नदीवरील अस्तित्वातील पुलाचे दुरुस्ती कामाबाबत सुचविलेल्या वाहतूक वळविणेबाबतचा सुधारित प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर केला आहे व त्यानुसार सदर पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी , निधी चौधरी , जिल्हादंडाधिकारी रायगड उपोद्घातातील अ.क्र. १ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई- पुणे एक्सप्रेसवरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र. १०८ (खालापूर कनेक्टर ) वरील पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पुलावरील वाहतूक दिनांक २२ मार्च २०२१ ते दिनांक ७ मे २०२१ या कालावधी दरम्यान खालील पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जारी करीत आहे.

( १ ) पेण, जिल्हा रायगड ते खालापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ ह्या अस्तित्वातील राज्य मार्ग क्र . १०४ वरील हलक्या वाहनांची वाहतूक खालापूर पथकर स्थानकाजवळील इंडिया बुल्स वसाहती पासून राज्य मार्ग क्र. ८८ मार्गे खोपोली शिळफाटा चौक वरून अनुक्रमे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ मार्गे पुणे खालापूर , मुंबईकडे जाण्यासाठी वळविण्यात येत आहे. सदर मार्गावरून केवळ रात्री ९ -०० ते सकाळी ६-०० या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील. सदर मार्गावरुन सकाळी ६-०० वाजल्यापासून ते रात्री ९ -०० वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येत असून, सदर कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक ही पेण-पनवेल- कोन मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर मार्गस्थ करण्यात येत आहे .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च २५ , २०२१ /चैत्र ४ , शके १९ ४३ (२ ) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून खालापूर मार्गे पेण जिल्हा रायगडकडे जाणारी हलक्या वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील खोपोली शिळफाटा चौक पासून राज्य मार्ग क्र. ८८ मार्गे इसांबा ते सावरोली ते राज्य मार्ग क्र. १०४ ते पेण , जिल्हा रायगड अशी वळविण्यात येत आहे . सदर मार्गावरून केवळ रात्री ९ -०० ते सकाळी ६-०० या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील . सदर मार्गावरून सकाळी ६-०० वाजल्यापासून ते रात्री ९ -०० वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येत असून , सदर कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून कोन -पनवेल -पेण या मार्गे मार्गस्थ करण्यात येत आहे .

(३ ) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून खालापूर मार्गे पुणेकडे जाणारी हलक्या वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील खोपोली शिळफाटा चौकापासून राज्य मार्ग क्र. ८८ मार्गे इसांबा ते सावरोली ते राज्य मार्ग क्र. १०४ ते खालापूर पथकर स्थानक मार्गे पुणे अशी वळविण्यात येत आहे. सदर मार्गावरून केवळ रात्री ९ -०० ते सकाळी ६-०० या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील. सदर मार्गावरून सकाळी ६-०० वाजल्यापासून ते रात्री ९ -०० वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येत असून , सदर कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक ही वरील कोन येथील पुलापासून द्रुतगती मार्ग ते खालापूर पथकर स्थानक मार्गे पुणेकडे मार्गस्थ करण्यात येत आहे .

(४ ) जे.एन.पी.टी ( JNPT ) ते कोन ते खालापूर मार्गे राज्य मार्ग क्र . १०४ वरून खालापूर पथकर स्थानकामार्गे पुणेकडे जाणारी हलकी व अवजड वाहनांची वाहतूक कोन येथील उड्डाणपूलाच्या उतारावरून ( Ramp ) यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाला मिळून खालापूर पथकर स्थानकामार्गे पुणेकडे वळविण्यात येत आहे .

अलिबाग ,

दिनांक २१ मार्च २०२१ .

निधी चौधरी, जिल्हादंडाधिकारी, रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.