Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Extra-Ordinary Gazette No. 88, Dated 31st March 2021 Revenue and Forests Department Notification No. Mudrank-2021/UOR. 12/CR. 107/M-1 (Policy), Stamp Duty

Published 31 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

बुधवार , मार्च ३१, २०२१ /चैत्र १० , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ४१ ]

[पृष्ठे ४ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ८८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय ,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च २०२१

आदेश

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.

क्रमांक मुद्रांक -२०२१/ अनौ.सं.क्र. १२/प्र.क्र. १२/ म-१ ( धोरण) . - ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, लोकहितास्तव , कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाकरीता, 'महिला खरेदीदार आणि कोणताही विक्रेता किंवा दस्त तथा संलेख निष्पादित करणारा अन्य पक्षकार' यांच्या दरम्यान निष्पादित केलेल्या किंवा निष्पादित करण्यात येत असलेल्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्री करारपत्राबाबतच्या दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम ( १ ९ ५८ चा ६० ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे ) यास जोडलेल्या अनुसूची-१ च्या अनुच्छेद २५ च्या खंड (ब) अन्वये अन्यथा आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क १ टक्केने कमी करण्याचे ठरविले आहे ;

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ९ च्या खंड ( अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , लोकहितास्तव तसे करणे आवश्यक आहे , अशी महाराष्ट्र शासनाची खात्री पटल्यामुळे, याद्वारे , दिनांक १ एप्रिल २०२१ पासुन कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाकरीता, 'महिला खरेदीदार/खरेदीदारांचे आणि कोणताही विक्रेता किंवा दस्त तथा संलेख निष्पादित करणारा अन्य पक्षकार' यांच्या दरम्यान निष्पादित केलेल्या किंवा निष्पादित करण्यात येत असलेल्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्री करारपत्राबाबतच्या दस्तावर (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त संलेख " असा करण्यात आला आहे) उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-१ च्या अनुच्छेद २५ च्या खंड (ब ) अन्वये अन्यथा आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क पुढील अटी तथा शर्तीच्या अधीन राहून १ टक्केने कमी करीत आहे : -

भाग चार-ब- ८८-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मार्च ३१ , २०२१ /चैत्र १० , शके १९ ४३

अटी तथा शर्ती :-

(१ ) हा आदेश, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी, उक्त संलेखाशी संबंधित कोणत्याही पक्षकाराने अगोदरच मुद्रांक शुल्क भरले असेल त्याबाबतीत, कोणताही परतावा देण्यात येणार नाही .

( २ ) सदर आदेशाखाली मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेतलेल्या कोणत्याही महिला खरेदीदाराला /खरेदीदारांना उक्त दस्तामध्ये नमूद रहिवासी घटक उक्त रहिवासी घटकाच्या खरेदीच्या दिनांकापासुन पुढे १५ वर्षांच्या कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदाराला विकता येणार नाही , उक्त अटी तथा शर्तीची पुर्तता करण्यात कसुर केल्यास , जणूकाही सुरवातीपासुनच मुद्रांक शुल्कामध्ये सुट देण्यात आली नाही, असे गृहित धरुन , उक्त रहिवासी घटकाची संबंधित महिला विक्रेता/विक्रेत्यांकडुन उक्त कमी भरलेले १ % मुद्रांक शुल्क व लागु होणारा दंड भरण्यास पात्र असेल.

परंतु, आणखी असे की , उक्त रहिवासी घटकाशी संबंधित महिला खरेदीदार /खरेदीदारांचे निधन झाल्यास अशा प्रकरणी तिच्या वारसदारांच्या नावे उक्त रहिवासी मालमत्ता हस्तांतरीत झाल्यास अशा प्रकरणी वर नमुद अटीचे बंधन राहणार नाही.

स्पष्टीकरण: -

सदर आदेशान्वये देण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ हा केवळ एक किंवा अनेक महिला खरेदीदार असलेल्या केवळ कोणत्याही प्रकारच्या रहिवाशी घटकाशी संबंधित जसे की, फ्लॅट किंवा वैयक्तिक बंगला किंवा रो -हाऊस किंवा कोणतेही स्वतंत्र घर किंवा कोणत्याही प्रकारची सदनिकाच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीकरारपत्राच्या संलेख तथा दस्तांवर देय राहील .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रितमकुमार व. जावळे, शासनाचे कार्यासन अधिकारी .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मार्च ३१ , २०२१ /चैत्र १० , शके १ ९४३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralya ,

Mumbai 400 032 , dated the 31st March 2021

ORDER

MAHARASTRA STAMP АСТ .

No. Mudrank -2021/UOR . 12/CR . 107 /M - 1 ( Policy) .- Whereas , the Government of Maharashtra in the public interest , has decided to reduce the stamp duty by One per cent . , as otherwise chargeable under clause ( b ) of Article 25 of Schedule - I appended to the Maharashtra Stamp Act, (LX of 1958 ) (hereinafter referred to as " the said Act" ) , on the document or instrument of Conveyance or Agreement to Sell of any type of residential unit , executed or being executed between, " the Woman/ Women Purchaser/ s and any Seller or other executant of the said document or instrument " ;

Now, therefore , in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the said Act , the Government of Maharashtra , being satisfied that it is necessary to do so in the public interest , hereby reduces the stamp duty from 1st of April , 2021 by One per cent . , as otherwise chargeable under clause (b) of Article 25 of Schedule - I appended to the said Act, on the document or instrument of Conveyance or Agreement to Sell of any type of residential unit ( hereinafter referred to as " the said instrument" ) , executed or being executed between, " the Woman / Women Purchaser / s and any Seller or other executant of the said document or instrument " , subject to the following conditions , namely : -

Conditions, -

(1) No refund shall be granted where the stamp duty has already been paid by any of the parties to the Said instrument , prior to the date of publication of this Order in the Maharashtra Government Gazette .

( 2) Any Woman/Women Purchaser/ s of the Said instrument availing of remission in the Stamp duty provided by this Order shall not sell any such type of residential unit to any subsequent Male Purchaser/ s with in the period of 15 years from the date of purchase of any such type of residential unit , On failure to abide by this condition , such Woman/Women Seller/s of such type of residential unit shall be liable to pay the remitted One per cent . Stamp duty and penalty , as changeable , as if there was no remission in the stamp duty from the beginning .

Provided further that , no such restriction will apply in case of transfer by heirship in case of death of such Woman/Women purchaser /s .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मार्च ३१, २०२१ /चैत्र १० , शके १ ९ ४३

Explanation : -

The benefit of reducation in stamp duty provided by this order shall be applicable only for the documents or instruments of Conveyance or Agreement to Sell of any type of residential unit i.e. the flat or individual bungalow or row house or any independent house or any type of tenement where Woman/Women are the Only Purchaser/ s of such type of residential unit .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

PRITAMKUMAR V. JAWALE , Desk Officer to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 31 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.